काल मी घरी लाल भोपळ्याच्या पुऱ्या केल्या होत्या.. आमच्याकडे कोकणात तांदुळाच्या पिठापासून करतात त्यामुळे त्याला घारगे म्हणतात.. एकदम हेल्दी खाऊ आहे..
करुन ठेवल्या तर ३/४ दिवस खाताही येतात .. त्यात मी तीळ घालते त्यामुळे कॅल्शीअम मिळतं.. गुळातुन लोह मिळतं.. तीळ आणि गुळ उष्ण त्यामुळे वेलदोडा स्वाद आणि थंडही आहे.. भोपळ्यात खुप जास्त घटक आहेत जे आरोग्यासाठी उत्तम आहेत…
पुऱ्या केल्यावर माझ्या काही मित्रांना फोन केला.. दोन जण येउन खाऊन गेले.. एकाने मेसेज केला , सोनल मला फुगलेली पुरी आवडते हा.. ठेउन दे .. मी उद्या येइन.. त्यावरुन सहज मनात विचार आला कि , आपल्याला भाकरी ट्म्म फुगलेली आवडते.. पुरी फुगलेली आवडते.. पण बायको किवा प्रेयसी फुगली की यांना का आवडत नाही ??.. दोन्ही फुगण्यामधे फरक असला तरी आम्ही पण प्रेमाने कधीतरी फुगतो , रुसतो, रागावतो.. पण मग तुम्ही मनवावं अशी अपेक्षा असते.. आमच्या २७ वर्षांच्या संसारात मी सुरुवातीला एकदा काही कारणाने रुसले होते .. सचिन च्या ही गोष्ट लक्षातच आली नाही .. त्यादिवशी मी ठरवलं काहीही झालं तरी फुगुन बसायचं नाही.. सोप्पा मार्ग निवडला आणि स्वतःला बदललं.. कारण अपेक्षा आल्या की दुख आलच..
काल डिनर ला चार पुऱ्या प्लेटमधे घेउन बसले आणि फुगलेल्या पुरीचा वरचा पापुद्रा काढला आणि खरपुस पापुद्र्याने खाण्याची मज्जा वाढवली .. राहिलेला खालचा भाग लोणच्यासोबत खाल्ला तेव्हा जाणवलं की आपले आयुष्यही या पुरीसारखेच आहे ना..तरुण किवा मध्यम वयात आपण त्या पापुद्रयासारखे असतो.. अगदी खमंग आणि खुसखुशीत आणि उतारवयात त्या लोणच्यासारखं तोंडी लावणं लागतं नाहीतर उर्वरित आयुष्य बेचव वाटतं.. मग त्यात मुलं, नातवंडाच्या रुपाने किती का गोडवा ( गुळासारखा ) असेना..
किवा तिळासारखी गरम बायको का असेना तिला थंड ठेवायला वेलची रुपात मैत्रीण लागतेच.. मैत्रीण रुपी स्वादाशिवाय संसारात काय मज्जा.. भले ती पुरीसारखी फुगली तरी आवडते.. कारण तो खमंग पापुद्रा असतो…
आम्हा स्त्रीयांनी हे सहज स्वीकारलं तर फुगण्या ऐवजी पुरीचा आस्वाद उत्तम घेता येइल आणि उत्तम खाऊही घालता येइल.. ज्याने ही फुगलेली पुरीची डिमांड केली तो त्याच्या बायको कडे ही डिमांड करतो की नाही माहीत नाही पण अशा खास डिमांड या मैत्रीणीकडेच करायच्या असतात कारण लक्षात ठेवा मित्रांनो पापुद्रा कायम खमंग लागतो.. त्याला लोणच्याची गरज नाही..
आपलं स्वयंपाकघर हे आपल्याला कसं जगावं हे शिकवतं आणि एखादी खास व्यक्ती का जगावं हे शिकवते.. सगळं आपल्या अवतीभवती आहे.. कस्तुरीमृग न होता प्रत्येक क्षणाचा आनंद घेउन भरभरून जगा.. अगदी फुगलेल्या पुरीसारखं.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist