लोहा शहरातील व आठवडी बाजारातील छोट्या- मोठ्या व्यापाऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध ; सौ. आशाताई शिंदे

 

 

लोहा; प्रतिनिधी;

लोहा शहरात मोंढा परिसरात दर मंगळवारी आठवडी बाजार भरत असतो, मंगळवार दिनांक 9 जुलै रोजी शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे यांनी मंगळवारच्या आठवडी बाजारामध्ये भाजीपाला विक्रेते व विविध छोटे- मोठ्या व्यापाऱ्यांच्या आठवडी बाजारा मध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेऊन या व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयामध्ये आठवडी बाजारातील व शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन या सर्व व्यापाऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेऊन या समस्या सोडवण्यासाठी लोहा-कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय,कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे व लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर या व्यापाऱ्यांच्या समस्यांचे प्राधान्याने लवकरात लवकर सोडवणूक करण्यासाठी मी सदैव कटिबद्ध असल्याचे यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी आठवडी बाजारातील व शहरातील छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांशी बोलताना आश्वासन दिले,

 

यावेळी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सौ. आशाताई शिंदे यांचा शाल,श्रीफळ,पुष्पहार देऊन भव्य सत्कार करण्यात आला ,यावेळी लोहा खरेदी विक्री संघाचे उपसभापती श्याम अण्णा पवार, बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील पवार, शेकापचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे हरबळकर, बाजार समितीचे सचिव आनंद पाटील घोरबांड, बोरगाव चे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील बोरगावकर, संचालक बंडू पाटील पवार, संचालक भाउराव कंधारे, पारडीचे माजी सरपंच दिगंबर पाटील डिकळे ,लोहा समन्वय समितीचे सदस्य सिद्धू पाटील वडजे, शेकाप लोहा तालुका अध्यक्ष नागेश पाटील हिलाल,सरपंच माधव पाटील अण्णकाडे, काबेगावचे सरपंच दुलेखान पठाण, चिंचोलीचे माजी सरपंच गोविंदराव पाटील जाधव ,खांबेगावचे सरपंच संदीप पाटील पौळ,प्रसाद पाटील जाधव,धनाजी पाटील ढगे, सुभाष पाटील सूर्यवंशी, सचिन कल्याणकर सह लोहा आठवडी बाजारातील व शहरातील छोटे मोठे व्यापारी सह कार्यकर्ते, पदाधिकारी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *