अनधीकृत काय आणि अधिक्रुत काय ??.

अनधीकृत काय आणि अधिक्रुत काय ??.
काल एफसी रोडला शॉपिंग ला गेले होते.. आम्ही अनेकदा एफ. सी रोडला विंडो शॉपिंगलाही जातो किवा कॉफी कट्ट्यावर जातो .. कुठल्याही कारणाने तुम्ही तिथे गेलात तरी छानच वाटतं.. Alltime Happening place.. and one of my fav . tooo..
मित्र मैत्रीणीसोबत तर नक्कीच जास्त छान वाटतं.. काल खुप पाऊस होता.. तरीही शॉपिंगचा उत्साह कमी नव्हता.. वाडेश्वरला लागून आतमधे जो शॉपिंग एरीया आहे तिथे भरपूर बार्गेनिंगपण होतं आणि बऱ्याचदा वेगळी फॅशन पहायला मिळते.. नुकताच खुप पाऊस पडुन गेला होता आणि अनधिकृत असल्याने डोक्यावर असलेलं प्लॅस्टिक कव्हर कारवाइमधे काढून नेलं होतं.. धंदा झाला तर जेवायला मिळणार थोडक्यात काय तर हातावर पोट.. पाऊस थांबल्यावर कपडे झाकून ठेवुन पाणी काढत होते.. त्या दुकानान्मधे खुप पाणी साचलं होतं.. आमच्यासारखी मंडळी तिथून दुसऱ्या दुकानात जाऊन खरेदी करत होती.. म्हणजेच काय धंद्याच्या वेळेला त्यांना पाणी काढत बसावं लागलं होतं.. आणि थोड्या वेळात पुन्हा पाऊस येणार होताच.. आणि इथून पुढे तीन महिने पाऊस असणारच आहे.. एकीकडे शेतकरी खुश तर दुसरीकडे व्यापारी नाराज.. किती विरोधाभास आहे ना.
अनधिकृत किती गोष्टी आपण करत असतो ना.. अगदी विवाहबाह्य संबंध हेही अनधिकृत आहेत .. त्याला तर आता पेव फुटलाय.. मांसाहार करत असलेली मंडळी अनधिकृत रित्या प्राणी हत्या करतात त्याला तर भगवंताने परवानगीच दिलेली नाही.. अनेक पब , अनेक बार.. देशी दारु ,, ड्रग्ज , सिग्नल तोडल्यावर पावती नको हे ठेवा म्हणत अनधिकृत गोष्टीला आपणच खत पाणी घालतो.. अनेक होटेल्स पाडली जातात.. थोड्या दिवसाने पुन्हा ती तिथे उभी रहातात.. पैसे चारले जातात पण एखादी गरीब व्यक्ती रस्त्याच्या कडेला काही विकत असेल तर तिला धंदा करु दिला जात नाही.. न्याय कि अन्याय ??.. नक्की काय अधिक्रुत आणि अनधिकृत काहीही कळेना.. पाहून वाईट मात्र वाटतं..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *