नांदेड, दि. १० जुलै २०२४:
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न व पाठपुराव्याने भोकर विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह अनेक विकासकामांना नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात मंजुरी मिळाली आहे. या कामांच्या मान्यतेमुळे नागरिकांच्या काही मागण्यांची पूर्तता झाली असून, त्याबद्दल समाधान व्यक्त होते आहे.
राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात राज्यमार्ग क्र. २५१ धावरी, थेरबन,सोमठाणा, किनी, पाळज, दिवशी, लगळूद, रावणगाव, म्हैसा रोड ते तुराटीनजिक भोकर तालुक्याच्या सीमेपर्यंतच्या रस्त्याला मंजुरी देण्यात आली आहे. भोकर येथील उपजिल्हा रुग्णालयाचे निवासस्थान बांधकाम तसेच दुय्यम निबंधक श्रेणी-१, मुदखेड यांच्या कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा देखील या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आदिवासी विकास विभागांतर्गत भोकर ते चिदगिरी आणि वाकद ते मांडवा रस्त्याची सुधारणा, भोकर तालुक्यातील हरी तांडा (गोपीतांडा) ते बोरगांव रस्ता व पुलमोऱ्यांचे बांधकाम, नारवट येथील सी.सी.नाली बांधकाम तसेच स्मशान भूमीकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम आदी विकास कामांना देखील मान्यता मिळाली आहे.