*मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड कंधार च्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा.*
*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, कंधारच्या वतीने नगरेश्वर मंदिर मंगल कार्यालयामध्ये दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष बालाजी पा. शिंदे युवा सेना जिल्हाप्रमुख नांदेड तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ. पुरुषोत्तम केशवरावजी धोंडगे अध्यक्ष श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार उपस्थित होते तर कार्यक्रमाला बालाजी पा. जाधव( जिल्हा अध्यक्ष संभाजी बिग्रेड नांदेड, विकास पा. गारोळे जिल्हा उपध्यक्षक संभाजी बिग्रेड नांदेड, विष्णू पा.जाधव शहर प्रमुख कंधार,विक्की घोरबांड तालुका अध्यक्ष विद्यार्थी आघाडी कंधार, शंकर पा भूते, संभाजी राहेरकर,योगेश पा. शिंदे,स्वप्निल पा. तळणीकर, योगेश मुंडे सर परमेश्वर जाधव,संभाजी पा. लाडेकर,अशोक पा. कदम, आप्पाराव पा. तोंडचिरे, सुभाष राहेरकर, व्यंकटराव राहेरकर, बाळासाहेब पा. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती
प्रा. वसंत हंकारे यांचे “अपेक्षांचा ओझं होणारा बाप या विषयावर व्याख्यान झालं” वरून कठोर वागणारा बाप मनातून आपल्या लेकरासाठी कसा झुरतो. आपल्या आई-वडिलांचे आपल्या जीवनात काय स्थान आहे प्रा. हंकारे यांनी आपल्या व्याख्यानातून पटवून दिले त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित मंत्रमुग्ध झाले तर अनेकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या.
आई वडिलांची अभिमानाने मान उंचावेल असे कार्य करा, आई-वडिलांची काळजी घ्या. आई-वडील हेच आद्य दैवत आहे. त्यांचे पूजन करा, प्रेमाने संवाद साधा असे उदगार समाज प्रबोधनकार वसंत हंकारे यांनी काढले.
तसेच तुम्ही कोण आहात? माझा बाप कोण आहे? माझा बाप माझ्यासाठी काय करतो? याचा विचार प्रत्येक मुलीने अंतर्मुख होऊन केला पाहिजे. एकदा तरी बाप झोपल्यावर रात्रीच्या दोन वाजता उठून त्याच्याकडे बघा. त्याच्या पॅन्ट व बनियनला चार जागेवर ठिगळं दिसतील .
मात्र तोच बाप तुम्हाला फॅन्सी व नवनवीन कपडे घालून शाळेत व कॉलेजला पाठवतो. आता आम्हाला प्रबोधनाची गरज नाही. असा विचार न करता. तुमच्या आयुष्यात जो बदल घडणार आहे, त्याला परिवर्तन म्हणतात. ते परिवर्तन झालं पाहिजे, प्रत्येक व्यक्ती बदलला पाहिजे, प्रत्येक लेकराच्या काळजामध्ये परिवर्तनाची आग लागली पाहिजे. २१ व्या शतकामध्ये मोबाईलमुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. शेवटी बोलताना हंकारे यांनी सांगितले की, शाळेत चार मार्क कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका असे मत बोलताना व्यक्त केले. काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परिवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले.
आपले माय – बाप आपल्या इच्छा,आकांक्षांना मारून लेकरांसाठी ज्याप्रमाणे त्याग करतात त्यांची सर जगात कशालाही येऊ शकत नाही असे ते म्हणाले आज आई-वडील आपल्या सोबत असल्याने आपल्याला त्यांची किंमत कळत नाही.आई-वडिलांची किंमत काय असते हे एखाद्या अनाथाला विचारा, असे सांगून त्यांनी भावनिक विषयांना हात घातला एखादी मुलगी आपल्या कुटुंबाला सोडून प्रियकरासोबत निघून जाते त्यावेळी त्या मुलींच्या बापाला काय त्रास सहन करावा लागतो हे त्यांनी यावेळी उपस्थित शाळकरी मुलींना आपल्या आई-वडिलांविषयी मंचावर कृतज्ञता व्यक्त करत अश्रूचा बांध मोकळा केला.
सावित्रीच्या लेकींनो स्वतःच्या मनाला विचारा स्वतः उपाशीपोटी उघडे नागड वावरत रक्ताचे पाणी करून तुम्हाला शिकवणारा तुमचा बाप समजून घ्याल का? खरंच तुम्हाला बाप समजला का? अशी काळजाला भिडणारी आर्त साद त्यांनी मुला-मुलींना घातली. शेवटी बोलताना प्रा. हंकारे यांनी सांगितले की शाळेत चार मार्च कमी पडले तरी चालतील पण वाघासारख्या बापाला आयुष्यात कधीही मान खाली घालायला लावू नका असे मत ते बोलताना व्यक्त केले. यावेळी शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच मोठ्या प्रमाणात माता पालक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
———————————————————————
काळजाला भिडणारे शब्द व प्रखर विचार आपल्या परीवर्तनवादी शब्दातून हंकारे यांनी मांडले. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी बहुसंख्य आलेला पालक वर्ग महिला अक्षरश: ढसाढसा रडत होत्या. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व मुला मुलींना डोक्यावर हात ठेवून डोळे बंद करायला लावले त्यानंतर आपल्या बापाला आठवा असे सागितले
“बाबा मी तुमची मान कधीच खाली होऊ देणार नाही समाजापुढे तुम्हाला माझ्यामुळे मान खाली घालून वागावे असे मी कधीच करणार नाही अशी शपथ प्रा. हंकारे यांनी यावेळी घ्यायला लावली.
____________________________________________
२१ व्या शतकामध्ये मोबाईल मुळे पूर्ण पिढी बिघडत चालली असल्याची भीती मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे कंधार तालुकाध्यक्ष संदीप तोंडचिरे यांनी आपल्या कार्यक्रमाच्या प्रस्ताविकेत मांडून उपस्थित मान्यवरांचे, पालकांचे,विद्यार्थ्यांचे आणि नागरिकाचे आभार मानले.