*लोहा शहरातील कापूस व्यापाऱ्यांसाठी व्यापारी गाळे लवकरच उभारणार ; सभापती विक्रांत पाटील शिंदे*
लोहा; प्रतिनिधी;
लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयात गुरुवार दि. 11 जुलै रोजी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा सहचिटणीस विक्रांत पाटील श्यामसुंदर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मासिक बैठक संपन्न झाली, या बैठकीत विविध विषयावर सखोल चर्चा करण्यात आली, लोहा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कापूस व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या असल्याचे लक्षात घेऊन लवकरच येथे 30 टिनशेडचे व्यापारी गाळे उभारण्यात येतील व उपबाजार पेठ सोनखेड येथेही व्यापारी गाळे लवकरच उभारण्यात येतील असे सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी मासिक बैठकीत बोलताना सांगितले,
लोहा तालुक्यातील हजारो शेतकरी बांधवांच्या व हमाल,मापारी,व्यापारी बांधवांच्या हितासाठी व त्यांना बाजार समितीच्या माध्यमातून न्याय देऊन शेतकरी बांधवांचे आर्थिक हित जपण्यासाठी मी सभापती या नात्याने सदैव कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी सभापती विक्रांत पाटील शिंदे यांनी सर्व संचालक मंडळाला देऊन लोहा बाजार समितीला महाराष्ट्रात मॉडेल बाजार समिती म्हणून ओळख निर्माण करून देण्यासाठी व लोहा तालुक्यातील शेतकऱ्यांचे हित व आर्थिक उन्नती करण्याचा माझा मानसं व त्याच अनुषंगाने प्रामाणिक प्रयत्न राहणार असल्याचेही यावेळी सभापती विक्रांत पाटिल शिंदे यांनी बोलताना नमूद केले,
यावेळी लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अण्णाराव पाटील पवार, बाजार समितीचे सचिव आनंद पाटील घोरबांड, संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष तथा संचालक चंद्रसेन पाटील गौडगावकर, संचालक स्वप्निल पाटील उमरेकर, संचालक दत्ता पाटील दिघे, संचालक साहेबराव काळे, संचालक रघुनाथराव पवार,संचालक सौ.पुनम क्षिरसागर, संचालक केशवराव तिडके, संचालक बसवेश्वर धोंडे, संचालक सौ .लक्ष्मीबाई वाकडे, संचालक केरबा केंद्रे, संचालक मधुकर डाकोरे, संचालक केशवराव चव्हाण मुकदम , संचालक किरण सावकार वट्टमवार, संचालक भाऊराव कंधारे सह लोहा समन्वय समितीचे सदस्य सिद्धू पाटील वडजे, खरेदी विक्री संघाचे संचालक सुधाकर सातपुते, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य अशोक सोनकांबळे ,अजय शेळके, सचिन कल्याणकर सह बाजार समितीचे कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते ,यावेळी मासिक बैठकीची सांगता सामूहिक राष्ट्रगीताने करण्यात आली.