फक्त भगवंतावर श्रध्दा आणि स्वतःवर विश्वास हवा..
व्हीसा नको.. तिकीट नको.. फार पैसे नकोत.. फार वेळही नको मग हवय काय ??.. फक्त इच्छाशक्ती आणि आनंद घ्यायची तयारी.. तेही चकटफु.. अहो खरच सांगतेय.. मी स्वित्झर्लंडला जाऊन आलेय पण आपल्या घराजवळ जे आहे ते तिथे नाही..
पुण्यापासून ७०/८० किलोमीटरवर आणि वेल्हेपासून २५ किलोमीटरवर मढेघाट आहे.. तिथे पावसाळ्यात स्वर्ग धरणीवर अवतरतो.. गाडी काढायची , घरुन डबा घ्यायचा आणि भिजल्यावर बदलायला कपडे घ्यायचे आणि १० वाजता घरातुन बाहेर पडायचं आणि स्वर्गात जाऊन ( स्वित्झर्लंड) म्हणजेच मढे घाटात जाऊन संध्याकाळी ६/७ वाजेपर्यंत घरी परत यायचं.. जाताना डोक्यात काहीही ठेवायचे नाही म्हणजेच पाऊस असेल का ??,, धबधबा असेल का ??.. भिजायला मिळेल ना असले कुठ्लेही प्रश्न मनात न येवु देता जायचे फक्त Law of Attraction हवच.. बाकी काहीही नको..
जाताना वाटेत म्हणजे पाबे घाटात फोटोसाठी स्पॉट आहेत.. तिथे फोटो काढायचे.. रील्स करायची..वाटेत भरपूर उन्ह असेल तरीही चिंता करायची नाही कारण पुणे आणि मढे घाट हवामानात जमीन आस्मानाइतका फरक असतो.. फक्त तुम्हाला हवं असलेलं आकर्षित करत जा.. फक्त ७० रुपये एंट्री फी आहे .. त्या ७० रुपयात तुम्ही ७0 करोड चा आनंद घेउ शकता.. तिथे गेल्यावर पार्कींग आहे.. कॉफी.. भजी.. मॅगी.. वडापाव .चहा.. गरमागरम कणीस सगळं काही मिळेल.. खाण्याची चिंता नाही पण मी घरुन टिफीन घेउन गेले होते..
गाडी पार्क केली की धबधब्याचा आवाज ऐकु येतो आणि आपण मंत्रमुग्ध होतो.. जवळ गेलो की मिनीटभरात रपारप पाऊस येतो आणि धुक्यात माणसे गायब होतात.. गार वारं अगदी हवसं .. आछादलेल्या धुक्यात धबधब्याला पहाताना श्रीकृष्णाची आठवण आल्याशिवाय रहात नाही कारण हे फक्त तोच करु शकतो.. जवळपास ३० फुटावरुन पडणारा धबधबा आपल्याला रोमांचित करुन टाकतो आणि स्वित्झर्लंडला गेल्याचा फील देतो.. मी काय वर्णन करु इतकं ते देखणं रुप असतं.. ते वाचायचं नसतं तर प्रत्यक्ष अनुभवायचं असतं.. निसर्गाचा सुगंध .. तो गारवा.. झाडांची गर्द दाटी.. झुळझुळणारं पाणी.. वरुन पडणारा पाऊस.. आणि हातात कॉफीचा मग घेउन त्या पाण्यात पाय सोडुन बसल्यावर येणारा
सुखाचा फील.. कॉफीच्या कपात वरुन पडणारे पावसाचे थेंब आणि त्याचा आलेला टुपुक असा आवाज.. आणि उत्तम कंपनी असेल तर अजून काय हवय ना.. आनंद घ्यायचा.. तिथे जाऊन प्लॅस्टिक फेकायचं नाही.. बाटल्या फोडायच्या नाहीत..
कृतज्ञता व्यक्त करायला विसरायचे नाही आणि आपल्यामुळे त्या सौंदर्याला हानी पोचणार नाही याची काळजी घ्यायची..
इतकं सगळं करुन सुखरूप घरी यायचं आणि नव्या श्वासाने.. नव्या उत्साहाने दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करायची.. जमेल ना इतकं करायला ??.. वाट कशाची पहाताय ??.. लवकरच प्लॅन करा आणि मढे घाटात जाऊन या.. गूगलवर सर्च करा आणि मस्त आनंद घ्या.. मी गेली ७ वर्षे पावसाळ्यात ३/४ वेळा जाते.. अजिबात मन भरत नाही इतकच सांगेन.
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist