कंधार :प्रतिनीधी
माजी सैनिक संघटनेने केलेल्या कामात आजपर्यंत माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी खोडा घातला आहे. विकास कामाच्या आड येणाऱ्या चिखलीकर यांना नांदेड लोकसभा निवडणुकीत माजी सैनिक संघटनेने पराभूत केले असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही माजी सैनिक संघटना चिखलीकर यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याची प्रतिक्रिया बालाजी चुक्कलवाड यांनी आज दि १० जुलै रोजी दिली .
माजी सैनिक संघटना हे सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहे. लोहा येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयास शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यासाठी माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला होता. या रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचे नाव देण्यास तत्कालीन खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सत्तेचा व पदाचा गैर उपयोग करून विरोध केला. या रुग्णालयाला आपल्या वडिलांचे नाव नगरपालिकेच्या वतीने ठराव घेतला. यावर माझी सैनिक संघटनेने मुंबईच्या मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला परंतु त्या ठिकाणी खोडा घातला. यांच्या या खोडसरपणामुळे आजपर्यंत या रुग्णालयाचा शहीद संभाजी कदम यांचे नाव मिळाले नाही.
त्याचबरोबर कंधार शहराचा विकास हवा यासाठी महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल पर्यंत चा रस्ता शंभर फुटाचा रस्ता करण्यात यावा ही मागणी माजी सैनिक संघटनेने केली होती परंतु यातही प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून हा रस्ता आज पर्यंत होऊ दिला नाही.
कंधार शहरातील हुतात्मा स्मारकास माणिकराव काळे यांनी जागा दिली होती या जागेत नगरपालिकेच्या वतीने उद्यान करण्यात आले एखाद्या हुतात्म्याचे नाव घेण्याच्या ऐवजी चिखलीकर यांनी त्यावेळी नगरपालिकेत असलेल्या सत्तेचा गैरवापर करून हुतात्म्याचे नाव काढून स्वतःच्या वडीलाचे गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान असे नाव देण्यात आले. या उद्यानास हुतात्माचेच नाव राहावे यासाठी माजी सैनिक संघटनेने पुढाकार घेतला होता परंतु चिखलीकर यांनी विरोध केला.
कंधार शहरातील महाराणा प्रताप चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शंभर फुटाचा रस्ता होत असताना. या रस्त्याच्या कामातही मोठी खेळी करून ग्रामीण रुग्णालयापासून शिवाजी चौकापर्यंत होऊ दिला नाही यातही कारणीभूत खास प्रताप पाटील चिखलीकर हेच आहेत.विकास पुरुष म्हणून घेणाऱ्या प्रताप पाटील चिखलीकर यांनी कंधार लोहा मतदारसंघाच्या विकासाबाबत कधीच विचार केला नाही. एखाद्या कामाचे श्रेय दुसऱ्याला मिळू नये यासाठी त्यांनी सतत कोणत्या ना कोणत्या कामात खोडा घालून विरोध केला आहे.
लोहा कंधार मतदार संघात माजी सैनिक संघटनेचे जवळपास पाच ते सहा हजार मतदान असून या विधानसभा निवडणुकीत ही त्यांना पराभूत करण्यासाठी माजी सैनिक संघटना आता चिखलीकर यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवार देणार असल्याची प्रतिक्रिया माजी सैनिक संघटनेचे जिल्हा अध्यक्ष बालाजी चुक्कलवाड यांनी आज दिली .