(कंधार | धोंडीबा मुंडे )
कंधार येथील मातंग समाज हा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा कागदोपत्री वाटेकरी आहे.परंतु काही विशिष्ट एका जातीलाच या आरक्षणाचा लाभ होत असल्याने,उर्वरित जातीपैकी मातंग समाजाला सामाजिक,शैक्षणिक आरक्षणाचा फायदा होत नाही. या संदर्भात दि.१ जुलै २०२४ पासून लोकस्वराज्य आंदोलनाचे लोण संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्र भरांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड येथे बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्रा.भरांडे यांचे आमरण उपोषण हे गेल्या आठ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सुरू आहे. भरांडे यांची तब्येत सतत खालावत आहे.त्यामुळे सदरील उपोषणाला जाहीर समर्थनार्थ पाठिंबा दर्शवित वंचित घटकांना स्वतंत्र ‘अ ब क ड’ आरक्षण वर्गीकरणाचा निर्णय राज्य सरकारने तातडीने घ्यावा, या साठी दिनांक ८ जुलै रोजी कंधार येथे एक दिवसी उपोषण करण्यात आले आहे.
विविध मागण्या मान्य करण्यात याव्या या उपोषणादरम्यान मातंग समाजाची मागणी लहुजी साळवे आयोगाची तात्काळ आमलबजावणी करणे अन्य मागण्यासाठी कंधार तहसील कार्यालया समोर एक दिवस उपोषण करण्यात आले.
या उपोषणाला पाठींबा म्हणून तालुक्यातील तमाम मातंग समाजाच्या वतीने दि.८ जुलै रोज सोमवारी सकाळी ११.०० वाजता एकदिवशीय धरणे आंदोलन तहसिल कार्यालय कंधार येथे करण्यात आले.
या आंदोलनास बालाजी वाघमारे,राजू भंडारे,महेंद्र कांबळे,कैलास सूर्यवंशी,अभिजीत शिरशीकर,विकास गायकवाड,पंडित देवकांबळे,भाऊसाहेब कांबळे,संभाजी वाघमारे,बालाजी कांबळे,हनमंत घोरपडे आदींचा सहभाग होता.