नांदेड जिल्ह्याच्या विकासार्थ गती देण्यासाठी समाज आणि प्रशासन एकत्र येऊन कार्य करु, असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी जिल्हा प्रशासन बैठकित नांदेड येथे केले. “विकासार्थ नांदेड” ही अभिनव संकल्पना त्यांनी यावेळी मांडली. जिल्हा अथिकारी कार्यालयात विविध सामाजिक संस्थांचे प्रमुख एकत्र आले होते. जिल्हा प्रशासनास जिल्ह्यातील नागरिकांचे अधिक सहकार्य मिळावे म्हणून सर्व समाज घटकांनी एकत्रित प्रयत्न करु असा निर्धार उपस्थित प्रतिनिधींनी केला.
नांदेड जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी, अवैध व्यवसायास आळा बसावा, महिला मुलींना सार्वजनिक ठिकाणी सुरक्षितता अनुभवता यावी, नांदेड हे तीर्थक्षेत्र पर्यटन स्थळा सोबतच शैक्षणिक, वैद्यकीय केंद्र झाले आहे.
येथे रहदारी, पार्किंग समस्या निवारण करणे, पयाभूत सुविधा अनेक प्रकारचे विकास कार्य, “नमामि गंगे” च्या धरतीवर “नमामि गोदावरी परियोजना” सुरु करणे आदी विषय खा. अजित गोपछडे यांनी मांडले.
जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत, जि. पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोटाटे, मनपा आयुक्त श्री महेश कुमार डोईफोडे यांनी या सर्व विकास कार्याबाबत सद्यस्थिती विषद केली. समाजाचे आवश्यक त्या ठिकाणी सहकार्य घेऊ असे सांगितले.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण विकास अधिक गतीमान करण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करणवाल यांचे सोबत बैठक घेतली. शिक्षण, आरोग्य, पेयजल सुविधा याविषयी चर्चा झाली. पुढे दिसभर जिल्ह्यातील विविध अधिकारी यांचे सोबत विकसार्थ नांदेड साठी बैठक घेऊन विकासकार्याचा आढावा घेतला. आवश्यक त्या सूचना करुन अधिक लोकाभिमुख होऊन विकास कार्य गतीमान करावे असे आवाहन खा. डॉ. अजित गोपछडे यांनी केले.