सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सातव्या वेतन आयोगाचे हप्ते लवकरच जमा होणार -मीनल करणवाल ,मुख्य कार्यकारी

 

दिनांक 26 /07/2024 रोजी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना जिल्हा शाखा नांदेड च्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी त्यांनी सातव्या वेतन आयोगाचे सर्व थकीत हप्ते , जानेवारी 2022 महागाई भत्ता फरक एरियर्स, फेब्रुवारी 2023 महागाई भत्ता फरक एरियर्स, सेवानिवृत्तांचे सेवानिवृत्ती अंशदान, अंशराशीकरण , सेवानिवृत्त मुख्याध्यापक व शिक्षण विस्तार अधिकारी यांचे रजा रोखीकरण व सेवानिवृत्तांचे गट विमा योजना तसेच सेवानिवृत्तांचे भविष्य निर्वाह निधी अंतिम अदायेगी च्या रकमा इत्यादी सर्व थकीत रकमा शासनाचे शिक्षण उपसंचालक पुणे अंदाज 2024/25 वेतन अनु 201/4985 यांचा आदेश क्रमांक या आदेशाद्वारे माहे जुलै पेड इन ऑगस्ट 2024 ला करण्याचे आश्वासन देण्यात आले .

सेवानिवृत्तसाठी निधी कमी पडल्यास शासनाकडे अधिकची अतिरिक्त निधीची मागणी करण्याची आश्वासन ही यावेळी देण्यात आले .या वेळी मा शिक्षणाधिकारी सविता बिरगे मॅडम यांनी जिल्ह्यातील उपस्थित शंभर ते दीडशे सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे प्रलंबित प्रश्न समजून घेऊन प्रत्यक्ष विभागाच्या कर्मचाऱ्यास बोलावून घेऊन त्यांना जबाबदारीने सर्व सेवानिवृत्तांचे प्रलंबित प्रश्न ऑगस्ट महिन्यात सोडविण्याचे आश्वासन दिले .

सोबतच सर्व गटशिक्षणाधिकारी यांना त्वरीत सातव्या वेतन आयोगाचे दुसरा, तिसरा व चौथा तसेच पाचवा हप्ता व थकीत सर्व पुरवणी देयके ऑफलाईन व ऑनलाईन बिले तयार करून त्यासाठी लागणाऱ्या एकत्रित निधी ची यादी करून पेन्शन विभाग जिल्हा परिषद नांदेड यांचेकडे दाखल करण्या बाबत लेखी पत्र काढण्याचे आश्वासन दिले.

नांदेड गटशिक्षणाधिकारी कार्यालयातील काही कर्मचारी सेवानिवृत्त कर्मचारी यांना उद्धट बोलणे थकीत हप्ते बिले न करणे, न स्विकारणे , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सहानुभूतीची वागणूक न देणे याबाबत संघटनेने मागील कालावधीत लेखी तक्रार केलेली होती ,यापुढे असे झाल्यास गंभीर दखल घेणार असल्याचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषद नांदेड ह्या घेणार असल्याचे सांगण्यात आले .
वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड 12 विभागाचे कामकाज चालत असून सोळा तालुक्याचे जिल्ह्यातील सर्व विभागाचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कामकाज एकाच कर्मचाऱ्यावर चालते गेल्या अनेक वर्षापासून या कार्यालयात ज्या कर्मचाऱ्यांचा अधिकृत संबंध नसताना कामकाज व फाईल हाताळतांना दिसत आहेत .

कार्यालयात खुर्चीवर बसून हे सर्व कामकाज करत असल्याचे दिसत आहे. यामुळे धनलक्ष्मीचा लाभ होतो की काय ❓अशी शंका येते .
सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या हक्काचे आर्थिक लाभ किमान चार सहा महिने होत नसल्याचे अनुभवास येत आहे, त्यामुळे सेवानिवृत्तांचे आर्थिक नुकसान होत असून अनियमितता होत आहे.
यासाठी सहाय्यक कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी वित्त विभाग जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे लेखी करण्यात आली आहे.

सेवानिवृत्त शिक्षक, मुख्याध्यापक ,केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी यांना चटोपाध्याय श्रेणी व निवड श्रेणीचा लाभ व एम एस सि आय टी ची कपात केलेल्या रकमा शासनाच्या परिपत्रकानुसार परत करणे यावर चर्चा झाली. मा. शिक्षणाधिकारी( प्राथमिक )जि प नांदेड यांनी लवकरात लवकर परत करण्याचे आश्वासन दिले .
या वेळी महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटना राज्य उपाध्यक्ष सुधीर गोडघासे, राज्य संघटक बालाजी डफडे, शेख एम के ,जिल्हा सरचिटनिस रमेश गोवंदे , जिल्हा सल्लगार श्री मदन नायके , श्री नामेवार डी एम , पाठक के व्हि ,श्री शिंदे सी एम तालुका अध्यक्ष हदगांव, धोंडीराम गुंटूरे तालुका अध्यक्ष कंधार , एन एस गायकवाड तालुका सचिव मुखेड ,गुट्टे वैजेनाथ तालुका उपाध्यक्ष मुखेड एस बी उमाटे, प्रभाकर कमटलवार तालुका अध्यक्ष धर्माबाद , बाबुराव रामोड, बी एन गुडमेवार कंधार तालुका संघटक , राठोड शिवधन , वैजनाथ खेडकर , के एम सोलापूरे – लोहां,एम ऐ खान, . ,लोणे जी. जे. देगलूर, गोवंदे एस. एन. , पाटील डी. एम, रामोड बी एम , सुरेश कदम, पाडदे एन आर, जाधव व्हि डी ,जाधव बी , नवघरे बी जी , करपे बी एस ,दुरनाळे एन ए , गोंकडे व्हि एम. ,शिंदे सी एस, जी. कुष्णूरकर ,खान एस. ए .सह

निवेदन देतांना जिल्हा भरातून भर पावसात 100/150 सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकारी आपल्या थकित देयकासाठी उपस्थित होते. यावेळी शेवटी जेष्ठ सेवानिवृत् पूर्व केंद्रप्रमुख डी एम नामेवार यांनी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम जिल्हा परिषद नांदेड ,व मा.शिक्षणाधिकारी मॅडम जि प नांदेड यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *