तसं समजून घ्या मॅडम..

 

माझे वाचक , चाहते आणि काउंसीलींग साठी अप्रोच होणारी मंडळी अशी काही कॉमेडी करतात कि हसून हसुन पुरेवाट होते.. याच्याकडे कॉमेडी म्हणुन पहा .. मीही तेच करते आणि त्यांच्याच विनोदावर विनोदी अंगाने लिहीतेही…
दोन दिवसापुर्वी एका व्यक्तीने काउंसीलींग बाबत फोन केला.. फी विचारली आणि १०० रुपये पाठवले .. मग ४०० रुपये पाठवले ..आणि मेसेज केला मॅडम बस का हो ??.. मी त्यांना व्हॉइस मेसेज केला आणि म्हणाले , मी सांगितलेली पूर्ण फी पाठवा ना.. मग मी अपॉइंटमेंट देते.. अहो पैशाचं नाही हो काही मॅडम , पण मला लाज वाटते.. मी म्हटलं , कशाची लाज वाटते ??.. तर म्हणाले , तुमची भिती वाटते , त्यावर मी म्हटलं , अहो मी राक्षस नाही हो .. माणूस आहे.. मॅडम राहिलेले पैसे पाठवून देतो .. त्यांनी लगेच पैसेही पाठवले आणि म्हणाले , आता नकोय काउंसीलींग.. मी सांगेन तेव्हा करु.. माझ्या लक्षात आलं होतं त्यांना लैगिकतेवर काहीतरी समस्या आहे आणि त्याबाबत माझ्याशी बोलायचय.. पहिल्यांदा कंडोम मागणारा कसा मेडीकल मधे घुटमळत असतो तशी त्यांची अवस्था होती.. अगदी सहाजिकच आहे मी समजु शकते पण आपण जेव्हा डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याच्याशी बोललो नाही तर औषध कसं मिळेल ना .. फायनली काल रात्री त्यांनी काउंसीलींग घेतलं.. त्यांनी सुरुवातच अशी केली मॅडम मी तुमचे १५/२० व्हीडीओ यूट्यूब वर पाहिले पण तुमची भाषा माझ्या डोक्याच्या वरुन जाते हो..

यावर मीच चक्रावले.. त्यांना म्हटलं , तुमचे शिक्षण किती झालय तर म्हणाले , मी इंजीनियर आहे.. मग मात्र मी विचार करु लागले एकतर मी जास्तीतजास्त वेळा मराठीत बोलते.यांना नक्की कशाची अडचण असेल..??.. त्यांना मी मुद्दामच म्हटलं, अहो मला इंग्रजी येत नाही आणि हिंदीही येत नाही .. तसं नाही हो मॅडम , तुम्ही जे व्हीडीओत शब्द वापरता ना ते सगळे डोक्यावरुन जातात.. इंटरकनेक्षन का काय ते.. यावर मी मात्र पॉज घेतला आणि विचार केल्यावर जाणवलं त्यांनी इंटरकोर्स हा शब्द ऐकला असेल.. काउंसीलींग फोनवर सुरु असल्याने मला हसताही येइना आणि पुढे काहीही बोलता येइना.. इंजिनिअर असलेल्या माणसाला हा शब्द माहीत नसावा याचही नवल वाटलं.. लॉकडाउन मधे इंजीनियर झाला की काय अशी शंका आली म्हणुन त्यांना मी त्यांचं वय विचारलं , तर म्हणाले , असेल ३०/४० मधे.. मी म्हटलं , अहो तुमचं वय तुम्हाला माहित नाही का ??.. ते म्हणाले , ते समजून घ्या मॅडम.. असेल ३५/४० लय कॉमेडी राव.. मी त्यांना म्हटलं, अहो मी स्त्री असुन माझं वय सोशल मिडीयावर सांगते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ??..

त्यावर ते म्हणाले , मॅडम तुम्ही भविष्य सांगता ना.. हे पण समजून घ्या की . अरे देवा.. हे तर लयच भारी.. सध्या मी टेलीपॅथीक ॲनीमल कम्युनिकेशन शिकत आहे .. बहुधा यांच्याही मनातलं ओळखावं लागणार असं दिसतयअसं मनात म्हणत पुन्हा मनसोक्त हसले.. त्यांना म्हटलं , तुमची समस्या विचारा.. त्यांनी प्रश्न विचारल्यावर मी त्यांना म्हटलं , तुम्ही मॅरीड आहात का ??.. त्यावर ते म्हणाले , हो पण आणि नाही पण.. पण गर्लफ्रेंड आहे.. ती पण असेल ३०/३५ हे मात्र ते न विचारताच म्हणाले आणि मी बुचकळ्यात पडले. हो पण आणि नाही पण हे काय नक्की झेपलच नाही… मनात म्हटलं , या माणसाचं आयुष्यात काहीही होवु शकत नाही.. हे पण कॉमेडी अंगानेच म्हणाले कारण मी नकारात्मक विचार कधीही करत नाही.. पुढे ते म्हणाले , लिंगाला तुम्ही काय म्हणता हो ??.. मी म्हटलं, लिंगच म्हणते.. त्यावर ते म्हणाले , व्हीडीओत तुम्ही काहीतरी वेगळं बोलता , मी म्हटलं , पेनीज असेल .. बरोबर मॅडम , ऑरगॅनिक असं पण काहीतरी म्हणता..

ते डोक्यावरुन जातं.. मी म्हटलं , अहो ते ऑर्गॅझम आहे.. भगवंता या माणसाचं काय करु ??.. त्यांना म्हटलं , अहो गुगल करुन पहायचं म्हणजे अर्थ कळला असता त्यावर ते म्हणाले , शब्दच कळत नाहीत तर अर्थ कसा शोधणार.. आता मात्र हद्द झाली राव.. हसुन हसुन मी तर सोफ्यावरुन खाली पडले.. त्यांना जर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात पाठवलं ना तर कार्यक्रमाचा टीआरपी कुठल्या कुठे जाईल.. तेही एवढी कॉमेडी करत नसतील एवढी त्या व्यक्तीने केली.. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळाल्यानंतर त्यांनी फोन ठेवला आणि लगेच पुन्हा फोन केला आणि म्हणाले , तुमचे रेड साडीतले फोटो लय भारी हा मॅडम .. कसल्या हॉट दिसता त्यात.. हेच सांगायला पुन्हा फोन केला असं म्हणुन फायनली फोन ठेवला.. फोन ठेवल्यावर पुढे १५ मिनीटे मी फक्त हसत होते..

पण खरं सांगु का , हा विनोदी भाग सोडून देउ.. इतकी निरागस व्यक्ती मी माझ्या आयुष्यात पाहिली नसेल.. मनापासून ती व्यक्ती भावली. माझ्या आयुष्यात अशा प्रकारची छान माणसं आहेत म्हणुन मी लिहु शकते.. शेवटी लिखाण येतं कुठून ??… याच आणि अशाच अनुभवातून येतं.. आयुष्यात कॉमेडी हवीच आणि तीही अशा निरागस माणसासारखी हवी.. समोरच्याला कायम आनंदी ठेवायला अशी माणसे फार मोलाचा वाटा उचलतात पण अज्ञान नको..
अभ्यास करा.. वाचन करा. नवनवीन लोकांना भेटत रहा ..
#SonalSachinGodbole
#Sonalcreations
#SexEducation
#Proudtobeatranswoman
#Beyondsex
#fantacies_and_beauties_in_sex
#Anira
#Indradhanu
#13000km
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi
#Abhisarika
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *