वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश ; – भाग नववा

आपण ही गोष्ट अनेकवेळा ऐकलेली आहे. तरीपण ती इथे पुन्हा एकदा सांगविशी वाटते कारण. आजचा मुद्दा समजून घेण्यासाठी ही गोष्ट अगदी समर्पक आहे. एका शेतकऱ्याने आपल्या घरी एक बोकड, एक कोंबडा आणि एक कबुतर पाळलेला होता. शेतकऱ्यांचं घर. अन्नधान्य वगैरे भरपूर असतात त्यामुळे उंदरांचा सुळसुळाट असणारच. उंदीर फार झाले म्हणून एकेदिवशी शेतकऱ्याने उंदीर पकडण्याचा चिमटा आणला. ते उंदराने पहिले. धोका ओळखून उंदीर कबुतराकडे गेले आणि म्हणाले, “भाऊ मालकाने उंदीर पकडण्याचा चिमटा आणलेला आहे.”
कबुतर म्हणाले “त्याचे मला काय? मी थोडाच सापडणार आहे त्या चिमट्यात?”
उंदीर कोंबड्याकडे गेले आणि म्हणाले ” भाऊ मालकाने उंदीर पकडण्याचा चिमटा आणलेला आहे “
कोंबडा म्हणाला ” मला काय फरक पडणार आहे? मी थोडाच सापडणार आहे त्या चिमट्यात? “
त्यानंतर बिचारे उंदीर बोकडाकडे गेले आणि म्हणाले ” भाऊ मालकाने उंदीर पकडण्याचा चिमटा आणलेला आहे “
बोकड म्हणाले, ” मग मी काय करू? मला काय त्याचे? ” तो तुझा प्रश्न आहे ते तुझं तू बघून घे “

बिचारा उंदीर निराश होऊन परतला. कोणीही सहकार्य करायला तयार नाही. मोठ्या विवन्चनेत तो बिळात लपून बसला. मध्यरात्र झाली सगळीकडे सामसूम. सर्वजन गाढ झोपेचा आनंद घेत होते. उंदीर मात्र एकटाच जागा होता. एवढ्यात खाडकन आवाज आला. घरमालकीणबाई उठली. तिला वाटले उंदीर चिमट्यात अडकला. घाईघाईने ती चिमट्याकडे धावली. थोडासा अंधार असल्यामुळे तिला नीट दिसलें नाही. एवढ्यात मालकीणबाईच्या पायाला जोराचा फटका बसला. ती ओरडत सुटली. काय झाले म्हणून घरमालक उठला. लाईट लावला. पाहतात तर काय तिथे चिमट्यात एक साप अडकलेला…. घरमालकाने आरडाओरडा केला. शेजारी जमले. एकजन म्हणाला साप चावलेल्या ठिकाणी कबुतराचे रक्त लावा विष उतरते. मग काय? बिचारा कबुतर गाढ झोपेत होता तो जगण्या अगोदर च त्याची मान कापली गेली. उपचार सुरु झाला.

मालकीणबाईला तोपर्यंत दवाखान्यात दाखल केले. बाई वाचली. दुसऱ्या दिवशी पाहुण्या रावळ्यांची घरी गर्दी झाली. बायको वाचली म्हणून सर्व पाहुण्यांना कोंबडा पार्टी करण्यात आली. काही दिवसांनी बाई पूर्ण बरी झाली. खुशी खुशीत कुलदैवताला बोकडाचा बळी देण्यात आला……… आणि सारेच प्राणी संपले

आता ही गोष्ट मी का सांगतोय? तर मित्रांनो

आज देशभरामध्ये आरक्षणावर उलट सुलट चर्चा चालू आहेत. मराठा आरक्षण हे सरकार पक्ष आणि विपक्ष या दोघांसाठी फार अवघड विषय होऊन बसलेला आहे. गावागावत कालपर्यंत एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होत असलेल्या गावाकऱ्यात आज एक मोठी दरी निर्माण झालेली आहे. ही दरी आता शाळेतील वर्गा वर्गात पोचलेली आहे. अशा स्फोटक परिस्थितीत आम्ही काय केलं पाहिजे? आमचे काही मित्र म्हणतात की दोघांच्या भांडणात तिसरा कशाला? आपलं काय देणे घेणे? ते दोघे पाहून घेतील….. पण मित्रांनो हा विषय तुम्ही म्हणता तेवढा सहज नाही. सरकार पक्षातील काही लोक म्हणतात की *आम्हाला नाही तर कुणालाच नाही* ही प्रवृत्ती घातक आहे. गावाला लागलेली आग आपल्या घरापर्यंत येऊनये म्हणून शाजाऱ्याचे घर जळणार नाही याची काळजी नव्हे खबरदारी घेतली पाहिजे. नाहीत शेजाऱ्याच्या घराला लागलेल्या आगीत आपले घरही बेचिराख होऊ शकते. अशावेळी गावा गावात सामाजिक सलोखा राहावा. सरकार आणि विपक्ष यांचा गाव पेटविण्याचा मानसूबा हाणून पाडण्यासाठी म्हणून आज वंचिताच्या बाजूने बाळासाहेब आंबेडकर मुसळधार पावसात महाराष्ट्रभर फिरत आहेत.

 

कोणी कोणाची भाकरी हिसकावून न घेता प्रत्येकाच्या हिशाला भाकरी कशी देता येईल हा फॉर्मुला बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे आहे. यावर सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. केवळ आंबेडकर म्हणतात म्हणून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे देशासाठी घातक ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेल्या देश हिताच्या अनेक गोष्टीकडे केवळ ते आंबेडकर सुचवितात म्हणून दुर्लक्ष करण्यात आले आणि आज त्याचे परिणाम आपला देश भोगतोय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुचविलेला नदीजोड प्रकल्प, विदेश नीती, आर्थिक नियोजन या गोष्टीकडे त्यावेळी सरकारने लक्ष दिले असते तर दुष्काळाचा प्रश्न, भारत, पाकिस्तान, भारत चीन सीमा प्रश्न केव्हाच निकाली निघाला असता. पण आमचं दुर्भाग्य की या सर्व सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुचविल्या. आंबेडकरांच्या सूचना अमलात अनिल ती काँग्रेस कसली?

आजही बाळासाहेब म्हणतात तर सर्व समाजाने त्यांच्या सोबत उभे राहिले पाहिजे. लोक म्हणतात बाळासाहेबांनी भूमिका बदलली पण हे अभ्यास नसलेल्यांची वरपांगी प्रतिक्रिया आहे. मंडल आयोगापासूनचा बाळासाहेब आंबेडकर यांची OBC आरक्षणासाठीची भूमिका आजही तीच आहे तेव्हा ही आंबेडकर होते आताही आंबेडकर आहेत. ते सर्व घटकातील वंचित समूहाचा लढा लढत राहून सर्वांना आपले हक्क अधिकार मिळवून देतील.. फक्त आंबेडकर नावाचा तिरस्कार करण्यापेक्षा आंबेडकरांच्या सर्वव्यापी भूमिकेचे स्वागत केले पाहिजे ….. सर्वांनी एकत्र येऊन जनरेटा निर्माण केला पाहिजे. मला नाही तर कुणालाच नाही ही भूमिका सोडून सर्व वंचित घटकांना सामान न्याय कसा देता येईल. यासाठी सर्व समदुःखी एकत्र येणे गरजेचे आहे

 

काही विद्वान म्हणतात की दलित राजकारण bjp ला पोषक आहे. मग काँग्रेसला पोषक होण्यासाठी काय करावं लागेल? काँग्रेसची गुलामी? मागे बाळासाहेब म्हणाले होते की जो आम्हाला सत्तेत 10% वाटा देईल त्याच्यासोबत जाऊ. काँग्रेसला प्रत्येक मतदार संघातून दलितांची मते हवी आहेत. पण सत्तेत भागीदार नको आहे. तर विचारवंतांनी काँग्रेसला म्हटलं पाहिजे की तुम्हाला सत्तेत जायचे असेल तर वंचितांना योग्य वाटा द्या…..
आम्हाला द्विपक्ष पद्धती मान्य नाही. भारतात बहुपक्ष पद्धती आहे ती कायम राहिली पाहिजे. नाहीतर काँग्रेस, bjp वाले सत्ता वाटून घेतील आणि वंचितांना बेदख्खल करतील. पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे ऋतू होतात कुठे हिवाळा तर कुठे उन्हाळा असतो. अमुक एकाला थंडी फार वाजते म्हणून किंवा अमुक एकाला गर्मी फार होते म्हणून पृथ्वी आपली गती बदलत नाही तसे वंचितांचे राजकारण भीमसूर्याभोवती आपल्या गतीने परिभ्रमण करते. कोणाच्या फायद्यासाठी किंवा कोणाच्या तोट्यासाठी ते आपली गती बदलत नाही..

 

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *