राजकीय पुढात्यांनी मुस्लिम समाजाच्या मताचा केवळ वापर केला…! मौलाना आझाद योजनेचा लाभ घेतलेला लोहा -कंधार मतदार संघात एकही लाभार्थी नाही दुर्दैवी बाब- प्रा . मनोहर धोंडे

 

 

कंधार  ; प्रतिनीधी

लोहा कंधार मतदार संघात मुस्लिम समाजाची मतदारांची संख्या 24 हजाराहून अधिक आहे. असे असतानाही येथील राजकीय पुढाऱ्यांनी केवळ मुस्लिम समाजाच्या मताचा केवळ वापर करून घेतला आहे. या मतदार संघांमध्ये आज घडीला मुस्लिम समाजातील मौलाना आझाद अल्पसंख्यांक योजनेचा एकही लाभार्थी नाही ही अत्यंत दुर्देवी बाब आहे . मुस्लिम समाज जागृत झाला पाहिजे व या शासनाच्या योजनेचा तरुणांना लाभ घेता यावा यासाठी सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्रा. मनोहर धोंडे यांच्यावतीने भव्य स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कंधार तालुक्यातील तरुणांनी पुढाकार घेऊन या योजनेचा मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ घ्यावा असे आव्हान प्रा. मनोहर धोंडे यांनी केले.

दिनांक 30 जुलै रोजी कंधार शहरातील सलमान फंक्शन हॉल येथे सेवा जनशक्ती पार्टीचे पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मुस्लिम समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरासाठी प्रा. मजरोदिन यांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केले. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. गुलाम गफार, प्रा मोहम्मद शहाबुद्दीन, प्रा शेख गोरेपाशा, सरपंच अजिमोद्दीन निजामोद्दीन,शेख हैदर, सामाजिक कार्यकर्ते शेख हब्बुभाई, ॲड शेख मोहदिन, ॲड शेख मगदुम ॲड शेख इम्रान,शिकुर चौधरी,निहाल अहेमद, सय्यद असद, आधी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. मनोहर धोंडे म्हणाले की, लोहा कंधार मतदार संघामध्ये मुस्लिम समाजाच्या मताचा राजकीय पुढाऱ्याने केवळ वापरच करून घेतला आहे. एवढ्या मोठी संख्या असतानाही तालुक्यातील एकही लाभार्थी नाही ही दुर्दैवाची बाब आहे. येणाऱ्या काळात लोहा कंधार तालुक्यातील तरुणांना मौलाना आझाद या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्न करणार असून तरुणांच्या हाताला काम देणार आहे. महाराष्ट्रात मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळासाठी 500 कोटीचा निधी आहे. परंतु हा निधी मुस्लिम पर्यंत जातच नाही. आज पर्यंत या लोहा कंधार मतदार संघातून आमदार खासदार यांनी मुस्लिम समाजाचे मते घेतली परंतु त्यांना मौलाना आझाद आर्थिक महामंडळाच्या योजनेचा काला मिळवून दिला नाही. असा सवाल हे त्यांनी केला. कंधार तालुक्यातील सर्व मुस्लिम तरुणांनी व्यापाऱ्यांनी बांधवानी एकजूट करून मौलाना आझाद या योजनेचा लाभ घ्यावा. ज्या लोकांना या संदर्भात माहिती नसेल अशा लोकांनी संपर्क कार्यालयात येऊन फॉर्म भरून घ्यावे मी ते फॉर्म मंजूर करण्याची जबाबदारी मी स्वतः घेणार असल्याचे प्रतिपादन प्रा. मनोहर धोंडे यांनी यावेळी बोलताना केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अयुबखांन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *