*कंधार प्रतिनीधी -*
पुणे येथे मराठा चेबर हॉल मध्ये आयोजित दैनिक चालु वार्ता चा तृतीय वर्धापन दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये पत्रकार क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा वृतसंकलन व लिखाणाबद्दल उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
हा पुरस्कार २८ जुलै रोजी पुणे येथील मराठा चेंबर्स सभागृहात पुणे महानगरपालिकेच्या प्रथम महिला तथा पुणे शहर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्या कमल व्यवहारे , प्रशांत गांधी ( सरचिटणीस राष्ट्रवादी ) पुणे शहर , दै.चालु वार्ता चे मुख्य संपादक डी.एस.लोखंडे पाटील,बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले,माजी महापौर प्रशांत जगताप, इस्कॉस टेम्पल चे अध्यक्ष श्री.प्रभुजी, आम आदमी पक्षाचे चे नेते अनेक राजकीय, सामाजिक नेते या मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र, शाल देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आले.दै.चालु वार्ता च्या ३ ऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून पुरस्कार वितरण व सत्कार सोहळाचे आयोजन या वेळी करण्यात आले होते.
दै. चालु वार्ताचे संपादक डी एस लोखंडे पाटील ,कमल व्यवहारे,अभिजीत बिचुकले,प्रशांत जगताप,श्री.प्रभुजी ,प्रशांत गांधी यांच्या हस्ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जाणते राजे तथा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,
तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार तथा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले , पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण करुन शाल, पुष्पहार श्रीफळ सदर महापुरुषांच्या आदर्शवत अशा कार्यप्रणालीवर प्रकाश टाकला गेला. दैनिक चालु वार्ता या मराठी दैनिकाच्या उन्नतीसाठी आणि येणाऱ्या काळात ब्रँड बनविण्यासाठी संपादक डी.एस. लोखंडे पाटील यांनी बहुमूल्य असे मार्गदर्शन केले. सुमारे दहा लाख वाचकांकडून वाचले जाणारे आपले वृत्तपत्र आगामी काळात घराघरांत पोहोचले गेले पाहिजे, असाही मौलिक सल्ला दिला. त्याचबरोबर गोर-गरीब, रंजले गांजले, शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सर्वसामान्य नागरिक यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक प्रतिनिधींनी सज्ज राहून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव तत्पर प्रयत्न केले पाहिजे. शासन-प्रशासन स्तरावर योग्य ते पुरावे असूनही दाद मिळत नसेल तर दिवसा रात्री मला फोन केला तरी त्यासाठी मी प्रथम स्थानी राहून न्याय मिळवून देईन असे अभिवचन ही लोखंडे पाटील यांनी दिले.
दैनिक’चालु वार्ता’ या मराठी दैनिकाचे
कंधार तालुका प्रतिनीधी माधव गोटमवाड यांचा प्रशांत गांधी ( सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर ) यांच्या हस्ते दि. २८ जुलै २०२४ रोजी ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला .
कागने कोचिंग क्लासेस कंधार येथे मिळालेल्या पुरस्कारा बद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी उपस्थित संचालक परमेश्वर कागने, अंतेश्र्वर कागने, विकास चव्हाण , गावंडे सर उपस्थित होते..माधव गोटमवाड यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक , राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या..
यावेळी उत्कृष्ट पत्रकारितेमध्ये अनेक पत्रकारांचा यथोचित मान-सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाच्या समारोपानंतर उपस्थित मान्यवर आणि समस्त पत्रकारांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.