कंधार; प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन मिळावे या प्रमुख मागणीसह आदी मागण्यासाठी 9 ऑगस्ट क्रांती दिना पासून महाराष्ट्रात पुन्हा एसटीची चाके थांबणार असून यासाठी प्रत्येक आगारात कृती समितीने आक्रमक भूमिका घेऊन हा बेमुदत संप पुन्हा होणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे त्यासाठी या कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्वरित मागणी कराव्या अशी प्रवाशातून ही मागणी होत आहे .
मागील वर्षी सहा महिन्याचा कार्यकाळ एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यासाठी संप पुकारला होता यामध्ये शासनाने कर्मचाऱ्यांना राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढ चा दिलासा न दिल्याने पुन्हा एकदा एसटीची चाके थांबणार असून या संदर्भात एस टी महामंडळ प्रशासनाला महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत राज्यव्यापी धरणे आंदोलनाच्या संदर्भात नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून विविध मागण्यासाठी निवेदने दिली आहे प्रत्येक आगारात गेट जवळ सर्व कर्मचारी हे बेमुदत संप पुकारणार आहेत यामध्ये मान्यताप्रा प्राप्त संघटनासह तेरा संघटना सहभागी झाले असून यासंदर्भात कर्मचाऱ्यांना आगार पातळीवर कृती समितीच्या वतीने नियोजन करण्यात आले .
त्याची बैठक सहा ऑगस्ट रोजी चालक वाहक यांत्रिक व प्रशासकीय कर्मचारी सोबत कंधार आगारात झाली असून यावेळी शिवसेनेचे प्रादेशिक सचिव सुधीर भाऊ पटवारी मान्यताप्राप कामगार संघटनेचे विभागीय सचिव विनोद पांचाळ शिवसेना विभागीय सचिव चंद्रकांत कदम शिवसेनेचे विभागीय अध्यक्ष जय कांबळे मान्यताप संघटनेचे कार्यशाळेचे सचिव मनमथं स्वामी विभागीय कार्यशाळेचे संघटक सचिव चंद्रकांत पांचाळ यांच्यासह कृती समितीचे 13 संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कर्मचाऱ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत या संघटनेत सहभागी होण्यासाठी आश्वासन दिले त्यामुळे 9 ऑगस्ट पासून एसटीचे चाके पुन्हा थांबणार आहे असे चित्र दिसून येत आहे कर्मचारी ही अभी नही तो कभी नाही आमच्या मागण्या मान्य केल्यास आम्ही सरकारसोबत आहोत असे आश्वासन यावेळी दिले .