जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते महाराखी,राख्या व सदिच्छापत्र सीमेकडे रवाना!

 

 

(नांदेड ; दिगांबर वाघमारे )

आपल्या प्राणप्रिय भारत मातेचे सीमेवर डोळ्यात तेल घालून रक्षण करणाऱ्या भारतीय वीर सैनिकांना मन्याड-गोदावरी खोऱ्यातील शालेय भगींनीच्या ३३३३ राख्या व सदिच्छापत्र सोबत १५ फुटाची विशालकाय महाराखी रक्षाबंधन सणाच्या निमित्य गेल्या ११ वर्षापासून अखंडित मन्याड व गोदावरी खोऱ्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार आणि राष्ट्रप्रेमी टीमच्या वतीने २६२ फिल्ड रेजिमेंट सहित १४ बटालियनला पाठवण्याचे कार्य अविरत सुरु आहे.गेली १० वर्ष पोलीस ठाणे कंधार येथुन पाठविण्यात आले.

 

नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.अभिजीत राऊत साहेब यांनी दि.०६ ऑगस्ट २०२४ रोजी ११ वेळ दिला.जिल्हाधिकारी साहेब यांना भारत-पाकिस्तान यांच्यातील कारगील युद्धात भारतीय जांबाज शूर सैनिकांनी युध्दात बजावलेल्या असीम शौर्याचे वर्तमान पत्रात येणारे छायाचित्रणाचे कात्रण संकलन करून भारतीय सैनिकाप्रतिचे प्रेम अनोख्या पध्दतीने व्यक्त करणाऱ्या गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजींचे कौतुक करतांना,हा अनमोल ठेवा डिजीटल युगाच्या आधाराने जपला पाहिजे असा अभिप्राय व्यक्त केला.

 

या प्रसंगी ऐतिहासिक कंधार शहरात राष्ट्रकुट सांस्कृतिक महोत्सव शासनाने घेऊन इतिहासातील उत्कृष्ट वास्तूकला राष्ट्रकुट कालिन कंधाराचा भुईकोट किल्ल्याचे जतन,जलविहार या सारखे उपक्रम राबवण्यासाठीचे सुंदर निवेदन डाॅ.रामभाऊ तायडे यांच्या स्वाक्षरीने दिले.दिलेल्या वेळे नुसार आमची सर्व टिम सर्वश्री शासकीय गुत्तेदार मा.वैजनाथ सादलापुरे,सुश्रुत रुग्णालय कंधारचे डाॅ.रामभाऊ तायडे,श्री शिवाजी काॅलेज शिवाजीनगर कंधारचे माजी शारिरीक शिक्षण विभाग प्रमुख तथा लोकमत पत्रकार,दररोज एक वृक्ष रोपण व संगोपन करणारे वृक्षमित्र शिवसांब घोडके,भारतीय सैनिक शिवहार कागणे भोजुचीवाडीकर, माजी मुख्याध्यापक जी.जी.रुमाले सर,सेवानिवृत्त कॅप्टन कस्तुरे नांदेड, प्रा.संजीव मेहेत्रे, मुख्यालयातील कार्यतत्पर दुलबा जायभाये,मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे,शिल्पा एमेकर/मानेकर,दै.बहुरगी वार्ताचे पत्रकार राजेश्वर कांबळे,छायाचित्रकार दृष्टांत एमेकर,संजय कंधारे सहित आदीजण यंदा मात्र मानव्य विकास विद्यालय देगलूर येथे उद्घाटन देगलूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक झुंजारे यांचे समर्थ हस्ते करण्यात आले.

 

साधाना हायस्कूल देगलूर, बालिका पंचायत राज मोहिम अग्रक्रमाची प्राथमिक शाळा
येरगी,एम.जे.पी.महाविद्यालय मुखेड,पब्लिक स्कूल कमळेवाडी,श्री शिवाजी हायस्कूल कंधार, म.फुले प्राथमिक शाळा संभाजी नगर, गणपतराव मोरे विद्यालय कंधार,नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय पानभोसी जि.प.प्राथमिक शाळा पानभोसी,जि.प.प्राथमिक शाळा वळसंगवाडी,श्री बसवेश्वर विद्यालय फुलवळ,शिवशंकर विद्यालय पांगरा,जि.प.प्राथमिक शाळा लालवाडी,
शिवाजी विद्यालय सिडको नांदेड, कुसुमताई विद्यालय सीडको नांदेड, गुजराती हायस्कूल नांदेड,सावित्रीबाई हायस्कूल नांदेड,शाकुंतल एक्सलन्स नांदेड, होलीसीटी इंग्लिश स्कूल नांदेड,श्री शिवाजी ज्युनियर काॅलेज नांदेड,

श्री बसवेश्वर विद्यालय रुई आदी नांदेड, देगलूर,मुखेड आणि कंधार या चार तालूक्यातील ज्ञानालयातील शालेय भगीनींनी सहभाग नोंदवत रक्षाबंधन सणानिमित्त सुंदर अक्षर कार्यशाळेच्या मन्याड-गोदा खोर्‍यातील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.गुजराती हायस्कूल नांदेड, शाकुंतल एक्सलन्स नांदेड, मानव्य विकास विद्यालय देगलूर, होलीसिटी इंग्लिश मीडियम स्कूल नांदेड ,कुसुमताई विद्यालय सीडको नांदेड, श्री शिवाजी हायस्कूल कंधार , महात्मा फुले प्राथमिक शाळा कंधार  अशा अनेक शाखेतील बहिनींनी सैनिक बांधवास हस्तकलेतून राख्या तयार करून भारतीय सैनिका प्रति आपली संवेदना तेवत ठेवली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *