कंधार प्रतिनिधी :
शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात मागील राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले परंतु मा सर्वउच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे ती तात्काळ उठविण्यात यावी अशा मागणीचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले आहे .
गेल्या पंचवीस वर्षे शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न सुरू होते यासाठी शांततेच्या मार्गाने अनेक मूक मोर्चे काढण्यात आले व 50 पेक्षा अधिक मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहे या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर मा सर्वोच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडल्यामुळेच आज ही वेळ आली आहे त्यामुळे राज्यभरात सर्व मराठा समाजामध्ये भयंकर असंतोष पसरला आहे त्यांच्या तोंडी आलेला आरक्षणाचा खास राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळे हिसकावून घेण्यात आला आहे तरी मराठा समाजाचे आरक्षणाला देण्यात आलेली स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी अन्यथा मराठा महासंग्राम संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड राजकुमार पाटील सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व सध्याचे सरकार मधील मंत्रिमंडळातील मंत्र्यांना महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात पाय ठेवू देणार नाही याची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी असे निवेदन मराठा महासंग्राम संघटना नांदेड जिल्ह्याच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा उद्धवजी ठाकरे यांना मा जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत आज देण्यात आले आहे.
दिलेल्या सदरी निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर मराठा महासंग्राम संघटना नांदेड व हिंगोली जिल्हा संपर्कप्रमुख प्रदीप पाटील हुंबाड जिल्हाप्रमुख नांदेड ओमराजे पाटील शिंदे जिल्हा कार्याध्यक्ष नांदेड तिरुपती पाटील भागानगरे जिल्हा सल्लागार नांदेड भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाध्यक्ष नायगाव श्रीनिवास पाटील मुरके तालुकाप्रमुख बिलोली संदीप पाटील पवार जिल्हा सचिव नांदेड संभाजी पाटील पवळे तालुकाध्यक्ष कंधार शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव बजरंग पाटील हुंडे सदस्य नांदेड जिल्हा यांच्या स्वाक्षर्या आहेत
………….*****———————————————
सदर निवेदनात खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत
१ ) मराठा आरक्षणाला मा सर्वोच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती तात्काळ ठरविण्यात यावी
२ ) मराठा आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी
३ ) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात वस्तीग्रह निर्माण करण्यात यावेत
४ ) अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत कर्ज प्रकरणे करताना येणाऱ्या अडचणींची सोडवणूक करण्यात यावी व जाचक अटी रद्द करून त्यांचा लाभ मराठा समाजातील तरुणांना तात्काळ देण्यात यावा
५ ) ज्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या भरवशावर प्रवेश मिळालेला आहे अशा विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत देण्यात यावी तर आरक्षणा प्रमाणे 50% फि राज्य सरकारने भरावी
६ ) मराठा समाजाचा सरसकट ओबीसी या प्रवर्गात सामाविष्ट करण्यात यावे तसेच न्यायमूर्ती गायकवाड समितीच्या अहवालाचे काटेकोरपणे पालन व्हावे
७ ) आरक्षण मागणीच्या चळवळीतील हुतात्म्यांच्या कुटुंबियांनाही २० लाख रुपये तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी व सदरील कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत रुजू करून घेण्यात यावे
अशा विविध मागण्यांचे निवेदन मराठा महासंग्राम संघटनेच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत देण्यात आले आहे