माणसांचा कोरोना आणि जनावरांचा लंपी जाईना…!

कोरोना नावाच्या विषाणूजन्य आणि संसर्गजन्य रोगाने भारतासह संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडलेले आहे. अशातच देशभरातील पशुधनामध्ये लंम्पी रोगाचा विळखा वाढत चालला आहे. महाराष्ट्र राज्यात पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून ७० हजार पशुधन लंम्पी रोगबाधित असल्याची माहिती पुढे आली आहे. प्रत्यक्षात मात्र राज्यात दोन लाखाहून अधिक जनावरांना या रोगाची बाधा झाली असण्याची शक्यता आहे. अशी भीती पशुतज्ज्ञांनीच व्यक्त केली आहे. जगभरात हा रोग जवळपास १०० वर्षांपासून आढळत असला तरी भारतात मात्र हा रोग नवीनच असल्यानचे मानले जात आहे. कोरोना विषाणू संक्रमणाचा मानवाने धसका घेतला असतानाच जनावरांना विषाणूजन्य लम्पी स्कीन डिसीजचा धोका बळावला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात जनावरांना हा रोगसदृश लक्षणे आढळून आली आहेत.

जनावरांमध्ये या विषाणूंचे संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवड्यांपर्यंत रक्तामध्ये राहत असून त्यानंतर शरीराच्या इतर भागामध्ये संक्रमण होते. त्यामुळे नाकातील स्त्राव, डोळ्यातील पाणी व तोंडातील लाळेतून विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होते. प्रथम जनावरांच्या डोळे नाकातून पाणी येते, लसिका ग्रंथींना सूज येते. एक आठवडाभर भरपूर ताप येतो, दूध उत्पादन कमी होते. त्वचेवर हळूहळू १० ते ५० मि.मी. व्यासाच्या गाठी प्रामुख्याने डोके, मान, पाय, मायांग, कास इत्यादी भागात येतात. काही वेळा तोंड, नाक व डोळ्यात व्रण निर्माण होतात. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा चघळण्यास त्रास होतो. व्रणामुळे चिपडे येतात. दृष्टी बाधित होते. पायावरील व्रणांमुळे सांधे व पायामध्ये सूज येऊन जनावरे लंगडतात. प्रादुर्भावामुळे जनावरात फुफ्फुसदाह किंवा कायदाहाची बाधा होऊ शकते. रक्तातील पांढऱ्या पेशी व प्लेटलेटची संख्या कमी होते. हा विषाणूजन्य आजार असल्याने बाधित जनावरे अशक्त होतात. जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटते. प्रजनन क्षमतेवरही विपरीत परिणाम होतो. सुरुवातीस २ ते ३ दिवस जनावरास बारीक ताप जाणवतो. यानंतर जनावरांच्या सर्व शरीरावर कडक व गोल आकाराच्या गाठी येतात. या गाठी साधारणपणे पाठ, पोट, पाय व जननेन्द्रिय इ. भागात येतात. बाधित जनावरांच्या डोळ्यातून व नाकातून पाणी येते. तोंडातील व्रणामुळे आजारी जनावरांना चारा खाण्यास त्रास होतो. पायावरील गाठींमुळे जनावरे लंगडतात.
निमोनिया व श्वसन संस्थेची लक्षणे आढळतात. डोळ्यांमधील व्रणामुळे जनावरांच्या दृष्टीत बाधा होऊ शकते.अशक्तपणामुळे जनावरांना या आजारातून बरे होण्यास बराच कालावधी लागतो.

त्वचेवरील खपल्या गळून पडल्यानंतर त्यामध्ये विषाणू दीर्घकाळ जिवंत राहू शकतात. गाभण जनावरात प्रादुर्भाव झाल्यास गर्भपात किंवा रोगग्रस्त वासरांचा जन्म होण्याची शक्यता असते. हा रोग विषाणूजन्य असल्याने त्यावर प्रभावी औषध उपलब्ध नाही. तरीही इतर रोगांबरोबर गुंतागुंत होऊ नये म्हणून लक्षणांवर आवश्यक उपचार तातडीने केल्यास जनावर पूर्णपणे बरे होते. प्रतिजैविके, ज्वरनाशके, अ‍ॅण्टीहिस्टेमिनिक औषधे, रोगप्रतिकार शक्तीवर्धक जीवनसत्व अ व ई, तसेच त्वचेवरील व्रणासाठी अण्टीसेप्टिक/फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करण्यात येतो. तोंडात व्रण झाल्यास २ टक्के पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने धुवावे, त्यानंतर तोंडामध्ये बोरोग्लिसरीन लावावे. लम्पी स्कीन डिसीज हा रोग झुनोटिक रोग प्रकारातील नसल्याने जनावरांपासून माणसांमध्ये मुळीच प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे शेतकरी पशुपालकांनी या लम्पी स्कीन डिसीजला मुळीच घाबरून न जाता तत्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये संपर्क साधून आजारी जनावरांवर औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

या आजारावर औषध उपलब्ध नाही. परिणामी, शेतकरी आणि पशुपालक धास्तावले आहेत. शेतकरी, पशुपालकांनी घाबरून न जाता सतर्कता बाळगली पाहिजे.
लम्पी स्कीन डिसीज हा प्रामुख्याने गोवंशीय जनावरांना अर्थात गाई, बैल, वासरे यांना होणारा विषाणूजन्य साथीचा आजार आहे. कॅप्रिपॉक्स या प्रवर्गातील विषाणूमुळे हा आजार होतो. हा विषाणू शेळ्या मेंढ्यांमध्ये होणाऱ्या देवीच्या विषाणूंशी साधर्र्म्य असणारा असून सर्वसाधारणपणे देशी गोवंशापेक्षा संकरित जनावरे या विषाणूला लवकर बळी पडतात. हा रोग सर्व वयोगटातील गोवंशीय जनावरांना होतो. लहान वासरे या रोगास अधिक प्रमाणात बळी पडतात. उष्ण, दमट वातावरणामध्ये जेव्हा कीटकांची वाढ अधिक प्रमाणात होते. दरम्यान या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येतो. हिवाळ्यात थंड वातावरणामध्ये या रोगाचा प्रसार कमी प्रमाणात होतो. या आजाराचा प्रसार एका जनावरापासून दुसऱ्या जनावराला होत असून चावणाऱ्या माशा, डास, गोचिड, कीटक यांच्यामुळे याचा प्रसार होतो. या रोगामुळे जनावरांच्या मरतुकीचे प्रमाण नगण्य असले तरी, बाधित जनावरे अशक्त होत जातात. दूध उत्पादनात मोठी घट होऊन त्यांची कार्यक्षमता खालावते. काही वेळा बाधित जनावरांचा गर्भपात होत असून प्रजननक्षमतासुद्धा घटते. या रोगामुळे त्वचा खराब होत असल्याने जनावरे विकृत दिसतात.

सध्या गुरांना लम्पी स्किन आजाराची लागण होत आहे. तीन तालुक्यांमध्ये अनेक गुरे या आजाराने त्रस्त असून हळूहळू जिल्ह्यात पसरत असल्याने पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. हा आजार काळजी घेल्यास दूर होऊ शकतो. पशुपालकांनी गुरांचे गोठे स्वच्छ ठेवावे, तसेच या आजाराने गुरांच्या मृत्यूची संख्या फारच कमी असल्याने पशुपालकांनी घाबरण्याचे कारण नाही.  या आजाराने मृत्यूचे प्रमाण १ ते ५ टक्के आहे. लम्पी हा विषाणूजन्य साथीचा चर्मरोग आहे.हा रोग मुख्यत्व गायींमध्ये आढळतो. म्हशीवर क्वचीतच आढळतो. तसेच शेळी, मेंढींना हा आजार होत नाही. संकरीत आणि विदेशी गायींमध्ये या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. लहान वासरांसाठी हा रोग धोकादायक ठरू शकतो. या रोगाचा प्रसार उष्ण व दमट हवामानात जास्त होतो. पावसाळ्यात आजार पसरण्याची भिती अधिक आहे. हिवाळ्यात या आजाराचा प्रसार कमी होतो. 

गाई व म्हशी मधील सर्व वयाच्या जनावरांना लंपी स्कीन डिसीज हा त्वचारोग होऊ शकतो. परंतु लहान वयाच्या जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. आजाराचा संसर्ग होण्याचे प्रमाण साधारणतः १० ते २० टक्के असते. या विषाणूचे शेळ्या-मेंढ्यातील देवीच्या विषाणूशी साधर्म्य आढळून येत असले, तरी हा आजार शेळ्या-मेंढ्यांना होत नाही. देशी वंशाच्या जनावरांपेक्षा संकरित जनावरांना याचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. कीटकांमार्फत प्रसार होत असल्याने हा आजार उष्ण व दमट वातावरणात जास्त होतो. बाधित जनावराच्या त्वचेवरील व्रण, नाकातील स्राव, दूध, लाळ, वीर्य, इ. माध्यमामार्फत हा आजार निरोगी जनावरात पसरतो. संसर्गजन्य असल्याने या विषाणूचा प्रसार हा बाधित जनावरांपासून निरोगी जनावरास स्पर्शाद्वारे सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे बाधित जनावरे ही निरोगी जनावरांपासून वेगळे ठेवणे आवश्यक आहे. साधारणतः ४ ते १४ दिवस हा कालावधी या आजाराचा संक्रमण कालावधी असतो. संक्रमण झाल्यानंतर १ ते २ आठवडे हा विषाणू रक्तामध्ये राहतो. त्यानंतर शरीराच्या इतर भागात त्याचे संक्रमण होते. त्यामुळे जनावराचे विविध स्राव, जसे डोळ्यातील पाणी, नाकातील स्राव, लाळ, इत्यादींमधून हा विषाणू बाहेर पडून चारा व पाणी दूषित होऊन इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होते.
त्वचेवरील खपल्यांमध्ये हा विषाणू अंदाजे १८ ते ३५ दिवस जिवंत राहू शकतो. वीर्यामधूनही हा विषाणू बाहेर पडत असल्यामुळे कृत्रिम रेतन किंवा नैसर्गिक संयोगाद्वारेही याचा संसर्ग होऊ शकते.

भारतात सध्याच्या काळात या रोगाच्या नियंत्रणासाठी लस उपलब्ध नाही. त्यामुळे नियंत्रणासाठी विविध उपाययोजनेचा अवलंब करावा. बाधीत जनावरांना वेगळे करावे. बाधीत आणि निरोगी जनावरे एकत्रित चरावयास सोडू नयेत. बाधीत भागातून जनावरांची ने-आण बंद करावी. साथीच्या काळात गाव तसेच परिसरातून गोठ्यास भेटी देणाऱ्यांची संख्या मर्यादित असावी. बाधीत जनावरांची तपासणी करणाऱ्या पशुवैद्यकांनी योग्य पोशाख परिधान करावा. हात अल्कोहोलमिश्रित सॅनीटायझरने धुवून घ्यावेत. जनावरांची तपासणी झाल्यानंतर कपडे, फूटवेयर गरम पाण्यात धुवून निर्जंतुक करावेत. रोगाने बाधीत जनावरांच्या संपर्कात आलेले साहित्य जसे की, वाहन, परिसर इत्यादी निर्जंतुक करावे. रोग नियंत्रणासाठी माशा, डास, चिलटे व गोचीड इत्यादींचे निर्मुलन करावे. यासाठी गोठा व परिसर स्वच्छ ठेवावा. परिसरात पाणी साठणार नाही याची दक्षता घ्यावी. रोगाने बाधीत जनावरांच्या संपर्कातील जनावरांना आयव्हरमेक्टीनचे इंजेक्शन दिल्यास गोचीड नियंत्रण होवून रोगप्रसारास काही प्रमाणात आळा बसल्याचे दिसून आले आहे.

माणसांप्रमाणे आता जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन मेटेंन करुन बांधत आहेत. संपूर्ण राज्यात लंम्पी प्रभावित जिल्ह्यातील गाई, बैलासह हजारो जनावरे या आजाराच्या विळख्यात सापडले आहे. आता लम्पीच्या रुपाने नव संकट शेतकऱ्यांपुढे ऊभे ठाकलं आहे. योग्य माहितीच्या अभावाने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, घाबरायचे कुठले ही कारण नाही वेळीच उपचार केल्यानंतर हा आजार लवकर बरा होत असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. कोरोना रोगाच्या संकटामूळे मागील पाच महिन्यापासून दुधाचे भाव कमी झाले आणि जनावरांची खरेदी विक्रीसुद्धा बंद झाली आहे. तसेच जनावरांची खरेदी विक्रीवर परिणाम होत आहे. चोरुन चालू असलेली गोमांसविक्रीही संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकाचे खुप आर्थिक नुकसान होत आहे. ‘लम्पी स्कीन डिसीज’ या आजारावर पशुसंवर्धनने लस काढावी आणि सरकारने दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

रोगनिदानासाठी त्वचेवरील व्रणाच्या खपल्या, रक्त, रक्तजल नमुने गोळा करून त्याचे प्रयोगशाळेत परीक्षण करून निदान केले जाते. भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत याचे पक्के निदान पिसीआर या चाचणीद्वारे केले जाते. लंम्पीचा फैलाव रोखण्यासाठी पशुसंवर्धन विभाग युद्धपातळीवर प्रयत्न करीत असल्याचा दावा करत आहे. एकीकडे माणसांवर कोरोना विषाणूने हल्ला केला असताना गोवंशाना ‘लंम्पी स्कीन डिसीज’ या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग होत आहे. राज्यात हजारो जनावरे बाधीत झाली आहेत.‌ जनावरांनी अन्नपाणी सोडल्यामुळे जनावरे मरत आहेत. काही जनावरांचा या विषाणूजन्य आजारामुळे मृत्यूही झाला आहे. त्यामुळे गौपालकांनी खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या जनावरांना प्रतिबंधात्मक लस असलेली ‘गोट फॉक्स वॅक्सिन’ टोचून घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. ‘लम्पी स्कीन डिसीज’या विषाणूच्या प्रसाराला अटकाव घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शेष फंडातून ‘गोट फॉक्स’ ही प्रतिबंधात्मक लस खरेदी केली जात आहे. सध्या ही लस राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध असून सर्वत्र लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता आपली जनावरे तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात नेऊन उपचार करावा. परंतू या प्रक्रियेतही अनेक त्रुटी असून रोगाचा फैलाव राज्यात वाढतच आहे. कोरोनासारखीच जनावरांच्या महामारीनेही रौद्र रूप धारण करु नये ही अपेक्षा व्यक्त होत आहे. माणसांचा कोरोना आणि जनावरांचा लंपी जाईना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

गंगाधर ढवळे,नांदेड
संपादकीय –
१५/०९/२०२०.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *