स्वगत हुतात्मा स्मारकाचे..!भारत देश स्वतंत्र झाल्या नंतर ही पारतंत्र्यात जवळपास 1 वर्ष 1 महिना 2 दिवस चालला होता लढा ….

===============================

आर्तकिंकाळी उपेक्षित हुतात्मा स्मारकांची!

 लेखन-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

=============================

कंधार

माझ्या भारताला इंग्रजांच्या गुलामगीरीतून स्वातंत्र्य झाला तरीही 

आमचा भाग निजामाच्या गुलामगिरीत 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाल्या नंतर ही पारतंत्र्यात जवळपास 1 वर्ष 1 महिना 2 दिवस होता. हैद्राबाद मुक्ती संग्रामात अनेक वीर योद्ध्यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला.

या लढ्यात कंधार व लोहा तालुक्यातील 59 हुतात्म्यांनी बलिदान दिले. पण मी फक्त कंधार व टेळकी या ठिकाणी प्रेरणा देत उभा आहे.ते ही मी मन्याडीचा ऐतिहासिक प्रवाह निरंतर प्रवाहीत ठेवणारे, ज्ञानभिष्माचार्य,विद्रोही विचारवंत, ज्येष्ठ स्वातंत्र्यता सेनानी डाॅ. भाई केशवरावजी धोंडगे व त्यांना साथ देणारे स्वातंत्र्य सैनिक भाई गुरुनाथराव कुरुडे या दोन मन्याड खोर्याच्या समाज सुधारकांनी आमच्या अस्तित्वाची लढाई सत्याग्रह करुन लढली आहे. कंधार व टेळकी येथील माझी दुरावस्था नमांडलेली बरी!कंधार येथील माझी अवस्था परिसरात बगीचा झाल्याने कांही प्रमाणात सुधारली पण…….त्या ठिकाणी नावाचे अतिक्रमण होते की काय? याची भीती मला वाटते आहे.

कारण म्हणतात ना सत्ये पुढे शहाणपणा चालत नाही.टेळकी येथील माझा वणवास संपलेला नाही.ज्या कल्हाळी नगरीने 35 शूर हुतात्मे दिले.हा त्यागाचा इतिहास शासन कर्त्यांना दिसत नाही. याचे शैल्य मनाला बोचते आहे.माझे अस्तित्व तेथे दिसत नाही. गेली अनेक वर्ष भाईंनी सत्याग्रह करुन माझ्याअस्तित्वासाठी शासनाला सनदशीर मार्गाने प्रयत्न केले. पण……..मला तेथे जाता येत नाही. त्याचे एकमेव कारण शासन होय! हैद्राबाद मुक्ती संग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांनी कोणतीही अभिलाषा न बाळगता गुलामगिरी विरोधात जीवाची पर्वा न करता लढा देवून घरावर तुळशी पत्र ठेवून हाती तिरंगा घेत प्राणांची आहुती दिली. हैद्राबाद मुक्ती संग्रामात कार्य करतांना साथ मिळाली ती स्वतंत्र भारताचे तत्कालीन गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांनी 13 सप्टेंबर 1948 रोजी पोलिस अॅक्शनची सुरुवात केली अन् 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा आमचा भाग भारतात विलीन झाला.तेव्हा माझे अस्तित्व नव्हते.

पण मला इतिहास वाचल्या नंतर कळले.गेली अनेक वर्षा पासून श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार च्या माध्यमातून डाॅ. भाई केशवराव धोंडगे हुतात्म्यांच्या व स्वातंत्र्य सैनिक यांच्या नातलगांचा गौरव करुन स्वातंत्र्य सैनिकांचा गौरव करतात. ही अभिमानाची बाब आहे. मला सुंदर अक्षर कार्यशाळा कंधारनी बोलके केले म्हणून आत्मव्यथा आपल्या सर्वांच्या पुढे व्यक्त करता आल्या. माझी एक राहिलेली इच्छा म्हणजे कल्हाळीत माझे अस्तित्व रहावे.आज घडीला माझ्या हुतात्म्यांचा लढा हा हैद्राबाद मुक्ती संग्राम होता पण आमच्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी सरकारनी यास मराठवाडा मुक्ती संग्राम असे नामकरण केल्याने हा लढा अगदी छोटा वाटतो! हे मला कळाले हुतात्म्यांना जर कळालेतर नक्कीच वाईट वाटेल………लढा देतांना हैद्राबाद मुक्ती संग्राम….अन् विजयी होताच त्याचे नामकरण हे मात्र विसंगत वाटते माझे अस्तित्व असतांना अतिक्रमणनाचा भस्मासूर आम्हाला त्रास दायकच! …जय हैद्राबाद स्टेट!…..जय मराठवाडा वंदे मातरम्! जय हिंद! जयक्रांति!

अरे हो………राहिलेच की दर वर्षी 13 सप्टेंबर व 14 सप्टेंबर या दोन दिवशी!! ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी डाॅ.भाई केशवराव धोंडगे साहेब संकल्पित व स्वातंत्र्य सैनिक भाई गुरुनाथराव कुरुडे यांचे सहकार्यात  रणयात्रेचे होत असते या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या वर्षीची रणयात्रा रद्द करण्यात आली! आयोजन पुर्वी अॅड मुक्तेश्वरराव धोंडगे व आता प्रा.डाॅ.पुरुषोत्तमराव धोंडगे यांच्या नेतृत्वाखाली  हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी निघत असते.

dattatrya yemekar
dattatrya yemekar

लेखन-दत्तात्रय एमेकर गुरुजी,क्रांतिभुवन बहाद्दरपुरा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *