कंधार ; प्रतिनिधी
स्मशान भुमिस जाण्यासाठी रस्ता खुला करून देण्यात यावा यासाठी कंधार तालुक्यातील पेठवडज येथिल मातंग समाज बांधवाच्या वतीने आज दि.१४ ऑगस्ट रोजी पासून कंधार तहसिल कार्यालया समोर अमरण उपोषण पुकारण्यात आले . दरम्यान या आमरण उपोषणाला सौ. प्रणिताताई देवरे चिखलीकर यांनी भेट दिली यावेळी मारोती मामा गायकवाड , भाजपा तालुकाध्यक्ष किशन डफडे , गंगाप्रसाद यन्नावार , मधु पाटील डांगे आदीची उपस्थिती होती .
मौजे पेठवडज ता.कंधार येथील मातंग समाजाच्या स्मशान भुमीला जाणारा रस्ता उपलब्ध नसल्यामुळे अंत्यविधी प्रेत नेण्यासाठी अडथळा निर्माण होत असुन..
सदरील परंपरागत असलेल्या स्मशान भुमीस अंत्यविधीस जाण्यासाठी कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा..
मौजे पेठवडज ता. कंधार येथील समाज बांधवानी याबाबत यापूर्वी 14 ऑगष्ट 2024 रोजी पासुन आमरण उपोषण करणे बाबत दि. 15/07/2024 रोजी मातंग समाजा च्या वतीन इशारा देण्यात आला होता .मौजे पेठवडज ता. कंधार येथील मातंग समाजाच्या स्मशान भुमिस जाण्यासाठी रस्ता उपलब्ध नसल्यामुळे अंत्यविधी प्रेत नेण्यासाठी अडथळा निर्माण होत असुन सदरील परंपरागत असलेल्या स्मशान भुमिस जाण्यासाठी श्रीमती. उर्मिलाताई उदयसिंह नाईक यांच्या उभ्या पिकातून जावे लागत आहे. त्यामुळे सदरील शेतकट्यालाही त्रास होत आहे.
तरी परंपरागत असलेल्या स्मशानभूमीला अंत्यविधीसाठी जाणारा कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करूप देण्यास मातंग समाजाने विनंती केली . पण प्रशासनाणे याकडे लक्ष दिल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे दि. 13 ऑगष्ट 2024 पर्यंत मातंग स्मशान भूमीला जाणारा रस्ता खुला करून नाही दिल्यास नाइलाजाने दि.14 ऑगष्ट 2024 रोजी दुपारी 01:00 वाजतापासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला होता . दिलेल्या निवेदनावर
दत्ता गायकवाड ,नामदेव गायकवाड ,शंकर गायकवाड ,गुरुनाथ गायकवाड , संभाजी गायकवाड ,समाधान इंगळे ,धोंडिबा गायकवाड , व्यंकटी गायकवाड , बाबू इंगळे , शिवाजी गायकवाड ,चंद्रकांत गायकवाड ,सोनाबाई वाघमारे ,इंदरबाई गायकवाड ,भामाबाई घोरपडे ,ललिताबाई गायकवाड , गंगासागर गायकवाड , आदीच्या स्वाक्षरी आहेत .