संत सेवालाल महाराज सभागृहाचे आज भूमिपूजन ;  खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची फलश्रुती

 

नांदेड, दि. १६ ऑगस्टः

भोकर नगरपरिषदेच्या वतीने नियोजित श्री संत सेवालाल महाराज सामाजिक सभागृहाचे शनिवारी १७ ऑगस्ट रोजी दुपारी ४.१५ वाजता भोकर येथील किनवट रोडवर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी या स्मारकाच्या मंजुरीसाठी प्रयत्नशील राहिलेले माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण असणार आहेत.

नांदेड जिल्ह्यात विशेषतः भोकर तालुक्यामध्ये बंजारा समाजाची मोठी लोकसंख्या आहे. बंजारा समाजाचे अनेक जुने तांडे या तालुक्यात अजूनही दिसून येतात. भोकर येथे श्री संत सेवालाल महाराज यांचे स्मारक व सभागृह उभारण्याची मागणी स्थानिक बंजारा समाजाकडून केली जात होती. या मागणीला पाठिंबा देत खा. अशोकराव चव्हाण यांनी या स्मारकासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा चालवला होता. अखेर राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगरपरिषदांना दिल्या जाणाऱ्या निधीतून या स्मारकाच्या व सभागृहाच्या कामाला मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पासाठी साधारणतः ७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. शनिवारी आयोजित भूमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून बंजारा समाजाची एक मोठी मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी पूर्ण केल्याने समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *