Date with श्रीकृष्ण..

 

हा संपूर्ण आठवडा कृष्ण वीक म्हणुन आपण साजरा करतो.. मी आई सुध्दा याच महिन्यात झालेय.. नटसम्राटचा विश्वविक्रम सुध्दा ऑगस्टमधेच केलाय..काल दुपारी मी माझ्या कृष्णासाठी दहीपोहे केले होते .. दहीपोहे मिटक्या मारत खाताना पाहून त्याच्या सावळ्या रुपात मी कधी गुंतले ते कळलच नाही.. मला दही पोह्यात हिरवी मिरची आवडते म्हणुन ५/६ मिरचीचे तुकडे त्यात घातले होते त्यातली एक मिरचीतुकडा त्याच्या दाताखाली आला आणि त्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून माझ्याही डोळ्यात पाणी आलं .. मला रडताना पाहून तो मात्र हसु लागला आणि म्हणाला , तिखट लागलं म्हणुन नाही रडलो मला पहायचं होतं तुझ्या डोळ्यात पाणी येतं का .

 

किती खोड्या रे तुझ्या.. त्याने खाल्लं की त्याचं उष्ट खायला मला नेहमी आवडतं .. मला माहीत आहे की राधेला हे आवडणार नाही पण तिची माफी मागून सावळ्या हरीवर चोरुन प्रेम करण्याची मज्जा मला कायम अनुभवायची असते.. दही पोहे मटकावताना त्याचं मोरपीस असं काही वाऱ्याने हलत होतं की ते पाहून वाटलं आज ह्याच्याच सोबत डेट करावी.. जरा लाजत , घाबरत , मुरडत मी त्याला माझी भावना बोलून दाखवलीच.. प्रश्न असा होता कि याला कॉफी चालत नाही मग डेटवर नेउ कुठे ??.. त्याच्याजवळ जाऊन बसले आणि म्हटलं, मला तुझ्यासोबत डेट करायची आहे रे पण ठिकाण तु ठरव.. तु नेशील तिथे मी येइन असा शब्द त्याला दिला आणि त्याच्या उत्तराची वाट पहात बसले..

कृष्णासोबत डेटला जायचं म्हणुन गोपीड्रेस कपाटातुन बाहेर काढला.. मोत्याचे दागिने काढले.. सगळी तयारी करुन बसले.. याच्याकडुन काहीही उत्तर येइना.. काल मी ठरवलच होतं , आज डेटला न जाता झोपायचच नाही.. याचा जन्मही रात्री १२ चा म्हणजे हा निशाचर आणि रात्री ९ वाजले की माझे डोळे मिटायला लागतात. काल मी मात्र ठरवले होते , काहीही झालं तरी झोपायचं नाही .. दहीपोहे खाऊन हा हरी सुस्त झोपला होता आणि रात्री १० वाजता मला म्हणाला , तुला खरच माझ्यासोबत डेट ला यायचय ??.. मी सांगेन तिथे येशील ??मी क्षणाचाही बिलंव न करता हो म्हटलं.. त्याने त्याच्या बोटावर मला बसवलं आणि गाईच्या गोठ्यात घेउन गेला.. मला म्हणाला , बस इथे.. त्याने बासरी काढली आणि वाजवायला सुरुवात केली.. त्याचबरोबर सगळ्या गाई त्याच्या अवतीभवती फेर धरु लागल्या.. त्या बासरीच्या सुरात मीही मंत्रमुग्ध झाले.. त्याच्या सौंदर्याकडे वेड्यासारखी पहात राहिले.. माझी झोप गेली.. खूपच फ्रेश वाटत होतं.. सगळी मरगळ गेली आणि गोठ्याबाहेर पहाते तर काय , मोर पिसारे फुलवुन नाचत होते… रात्र असून सगळीकडे प्रकाश दिसत होता.. झाडं , वेली आनंदाने बागडत होत्या..

माझ्या चेहऱ्यावरील आनंद पाहून त्याने मला विचारलं , याआधी तु अशी डेट केली होतीस का ??.. मी म्हटलं, कृष्णा हे कसं शक्य आहे.. तुला तर सगळच माहीत आहे..आम्ही कॉफीला जातो .. गप्पा मारतो कधी कधी त्यात कोणाविषयी बोललं जातं .. मग त्याने मला विचारलं , तुम्हाला त्या डेटमधुन काय मिळतं ??.. मी म्हटलं आनंद मिळतो.. त्यावर कृष्ण म्हणाला , इथेही आनंद मिळाला का ??.. मी म्हटलं , अरे रोजच्या पेक्षा करोडोपट मिळाला त्यावर कृष्ण म्हणाला , तु लेखिका आहेस ना ,मग सांग पाहु रोजच्या आनंदापेक्षा इथे जास्त आनंद का मिळाला ??.. मी म्हटलं तुझ्यासारखा सखा सोबत आहे म्हणुन.. त्यावर तो म्हणाला , रोज ज्यांना तु भेटतेस तेही तुझे प्रिय मित्रच आहेत की.. त्यानंतर मात्र मला उत्तर सापडलं नाही ,,पुढे कृष्ण म्हणाला , मी सांगतो .. मन लावून ऐक.. माझ्या बासरीने अनेक गाई सुखावल्या.. काहीना प्रसूती वेदना होत होत्या त्या थांबल्या कारण त्या माझ्या बासरीत आणि माझ्या नावात रमल्या.. अनेक मोर सुखावले.. तेही आनंदाने नाचु लागले.. इथे गोठ्यात असलेले लाखो करोडो जीव या बासरीत रममाण झाले.. म्हणजेच काय आपल्या डेटमुळे करोडोना आनंद मिळाला आणि तुझ्या रोजच्या डेटमुळे फक्त तु आणि तुझा मित्र सुखावतो आणि तोही फक्त त्या क्षणापुरता..

सोनल एक लक्षात ठेव आपली प्रत्येक कृती ही इतरांना आनंद देणारी असावी.. आपण स्वतः जगत असताना आपल्याला इतरांनाही जगवायचय.. तुझ्या कुठल्याही डेटमधे तु स्वार्थ ठेवु नकोस.. प्रत्येक कर्म हे माझ्यासाठी कर.. त्यातुन कशाचीही अपेक्षा ठेवु नकोस.. सगळ्याना सोबत घेउन पुढे जा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुला तुझा कृष्ण दिसेल…माझ्यासोबत इथून पुढे वेगळी डेट करायची तुला गरजच भासणार नाही.. प्रत्येक चांगल्या गोष्टीत , चांगल्या ठिकाणी मी आहे .. मला उद्या पुन्हा दहीपोहे देशील ना गं ??असं म्हणून तो तिथून निघून गेला.. जातांना त्याने माझ्या हातात एक चिट्ठी ठेवली .. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी पहात राहिले.. आजूबाजूला पहाते तर मी माझ्याच घरात होते म्हणजेच काय तर त्याने माझ्यासाठी नंदनवन घरातच तयार केले होते.. भानावर आले आणि चिठ्ठी उघडली तर त्यात लिहीले होते.. अशीच लिहीत रहा…

……. निशब्द…
#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *