अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील चळवळीतील कार्यकर्ते श्री सुनील खंडाळीकर सर यांचं चिंतन एका कार्यकर्त्याचे आणि तरंग अंतरीचे या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवार दि 01 सप्टें 24 रोजी लातूर येथे होणार आहे. त्यानिमित्ताने तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक , विचार शलाका त्रैमासिकाचे संपादक प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन्ही कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन पुस्तक प्रकाशन संयोजन समितीतर्फे करण्यात आले आहे.
सकाळी ठीक 11 00 वाजता येथील शिवाजी चौकातील हाॅटेल अंजनीच्या सभागृहात सदरील पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा श्री दादासाहेब पौळ गुरुजी असणार आहेत. जेष्ठ विचारवंत आणि संपादक डॉ नागोराव कुंभार आणि ग्रामीण कवी शंकर वाडेवाले हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित राहणार आहेत. जेष्ठ साहित्यिक आणि समिक्षक प्रा निशिकांत देशपांडे, प्रसिद्ध कवी शिवाजी मरगीळ परभणी, विद्रोही कवी काॅम्रेड अंकुश सिंदगीकर उदगीर आणि अंनिसचे लातूर जिल्हा कार्याध्यक्ष मा श्री अनिल दरेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुस्तक प्रकाशन सोहळ्यानंतर लगेचच प्राचार्य डॉ नागोराव कुंभार यांचे साहित्य व साहित्यिक यांची लोकशाहीसी बांधीलकी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यास आणि व्याख्यानासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीचे रामकुमार रायवाडीकर,प्रा डॉ सुशिलाताई पिंपळे – नारनवरे, सुधीर भोसले, सचिन औरंगे, गणपतराव तेलंगे,वलीसाहेब शेख, माया सोरटे, अण्णाराव सुर्यवंशी, बाबुराव श्रीमंगले आणि प्रा प्रभाकर तिडके यांनी केले आहे.