धर्मापुरी : येथील पुरातन श्री क्षेत्र मलिक्काअर्जुन मरळशिद्ध देवस्थान येथे काल दि 26 आॅगस्ट 24 रोजी सकाळी ठीक 11 00 वाजता शिवसंत काशिमाता उमरीकर यांच्या 31 व्या श्रावणमास अनुष्ठानाची सांगता झाली. याची सुरुवात दि 05 आॅगस्ट 24 रोजी सकाळी झाली होती.
यानिमित्ताने सकाळी ठीक 09 ते 11 00 वाजता शि भ प मोहनराव कावडे गुरुजी यांचं प्रसादावरील शिवकिर्तन झालं. नागनाथ प्रकाशराव , ( तम्मा ) खानापुरे यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.पुजा आणि आरती सौ कोमल अभिषेक खानापुरे यांनी केले.
शि भ प मोहनराव कावडे गुरुजी म्हणाले की, सन्मार्गाने चालल्यावर मरळशिद्ध हे पावनारं जाग्रत देवस्थान आहे. किर्तन हे नवविधा भक्तीपैकी एक प्रकार आहे. माणसाचं अंतःकरण साफ करणारा झाडू आहे. त्यामुळे सफाई आणि सच्चाई महत्त्वाची आहे. 100 रू कमी कमवा पण लेकरं संस्कारी बनवा.
परमार्थात सुख तर प्रपंचात साधनं आहेत. आपण गुरुचा विचाररुपी प्रसाद घ्यावा.असेही ते म्हणाले. यावेळी बेलदरा येथील विठ्ठल तुम्बवाड आणि भजनी मंडळ आली होती. श्रावणमास अनुष्ठान सांगता यशस्वीतेसाठी ग्राम पंचायत सदस्य कैलास बागमारे, विश्वनाथ बागमारे, चंद्रकांत रणबावरे, मनोज कापसे ,अमोल गिराम राधाकिशन रणबावरे आणि नागनाथ सावकार एकाळे यांनी परिश्रम घेतले .