नांदेड – राज्यातील टॉप टेन शाळांपैकी एक शाळा म्हणून परिचित असलेल्या बाबानगर इथल्या महात्मा फुले हायस्कुलच्या खेळाडूंनी जिल्हास्तरीय स्पर्धामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या शाळेच्या खेळाडूंची सहा प्रकारच्या खेळामध्ये विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नांदेड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या स्पर्धामध्ये या शाळेच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. सायकलिंग आणि बॉक्सिंग मध्ये सोनाक्षी सोनसळे, धनुर्विद्यामध्ये स्वयंम कांबळे, स्वराज कांबळे, प्रतीक फाजगे, अजिंक्य फाजगे टेबल टेनिस मध्ये राज एंगडे, सोहम पवार , रजत सूर्यवंशी ,सिद्धांत नरवाडे , कार्तिक नरवाडे, अर्थव गुर्जर , गौरव इरमलवार, वरद शिवणगावकर , प्रज्वल कोंढेकर, विराज मुंढे , रिया अनलदास, अक्षरा साठे, खुशी अटकोरे बुद्धीबळ स्पर्धेत ऋतुजा जाधव, ऋतुजा कदम , श्रद्धा धोपटे , अक्षरा मुत्तेपवार , श्रद्धा वायबसे , आरुषी मोरे , रणवीर केंद्रे , सर्वेश वानखेडे , मधुरा राखेवार , मंथन भुस्सा तर कराटे स्पर्धेमध्ये तृप्ती भोळे यांनी घवघवीत यश प्राप्त केले असून सांघीक आणि वैयक्तीक खेळ प्रकारात सदरील खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
खेळाडूंच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण , उपाध्यक्षा माजी आ. सौ अमिताताई चव्हाण, सचिव माजी पालकमंत्री डी पी सावंत, सहसचिव डॉ. रावसाहेब शेंदारकर, खजिनदार ऍड उदय निंबाळकर , कार्यकारिणी सदस्य नरेंद्र चव्हाण , पांडुरंग पावडे, सौ. श्वेता पाटील , मुख्याध्यापिका सौ एस.आर.कदम , पर्यवेक्षक ए आर कल्याणकर, सौ. व्ही आर देशमुख, सौ. जे सी महाराज , क्रीडा शिक्षक एस. एन. स्वामी, आर.पी. कऊटकर शालेय समितीचे अध्यक्ष डॉ राम वाघमारे, कार्यालयीन प्रमुख किशोर ठाकूर , साहेबराव मावले , ग्रंथपाल जी जे जाधव आणि शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.