लोकहितासाठी ची चळवळ. कष्टकऱ्यांना न्याय देण्यासाठी व समाजहिताची लढाई .स्वबळावर जिंकण्यासाठी रामचंद्र जी भरांडे साहेबांनी निर्माण केली. जंग ठोकुनी मैदानात उतरण्याची हिम्मत केली .अंतर्मनाची माणसामाणसात जोडणी करून. दोस्ती जिवाभावाची वाढवण्यासाठी ची तळमळ उभी केली .लखलखत्या तलवारीची लेखणी करून. नवनिर्माण वास्तव जीवनावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्याची ताकद निर्माण केली ,
.
या सर्व मुद्द्यांचा सारांश म्हणजे लोकस्वराज्य आंदोलनाचे उभारणी होय त्यांच्या लढ्यात शोषित वंचित पीडित अन्यायग्रस्त सुशिक्षित बेरोजगार कामगार वीट भट्टी कामगार ऊसतोड कामगार मजूर दार सामील आहेत तसेच विद्यार्थी उच्चशिक्षित तरुण डॉक्टर प्राध्यापक इंजिनीअर वकील उद्योजक शिक्षक शासकीय कर्मचारी महिला कर्मचारी लढाऊ महिला या लढ्यात सामील आहेत हे लोकस्वराज्य आंदोलनाचे सर्वात मोठे भांडवल आहे त्यात विद्यार्थी हा चळवळीचा कणा आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी या लढ्यात सामील आहेत शिक्षणापासून वंचित असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम लोकस्वराज आंदोलनानी केले आहे अर्धवट शिक्षण घेऊन सोडलेल्या तरुणांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी चे मार्गदर्शन लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून झालेले आहे लोकस्वराज्य आंदोलनात काम करणारे तरुण डॉक्टर वकील प्राध्यापक शिक्षक इंजिनियर पोलीस उद्योजक सामाजिक कार्यकर्ते आणि स्वाभिमानी व्यक्तिमत्व लढाऊ कार्यकर्ता प्रखर वक्ता हे सर्व व्यक्तिमत्व लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून घडत आहे लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून घडत असताना.
असंख्य तरुण सोबत येत आहेत.ज्यांना सत्य कळते..जे गुलामगिरीच्या विरोधात लढतात असेच स्वाभिमानी लोक संघर्ष करू शकतात असे लोक लोकस्वराज्य आंदोलनात मोठ संखेने सहभागी होत आहेत.. लोकस्वराज्य आंदोलन ही चळवळ विद्यार्थी घडविण्याचे एक साधन आहे संघटनेचे विद्यार्थ्यांसाठी एक ब्रीदवाक्य आहे लढत लढत शिका आणि शिकत शिकत लढा लढणारा जिंकतो आणि मागणारा मरतो मुक्याना बोलते करण्याचे व्यासपीठ म्हणजे लोकस्वराज आंदोलन होय.
आंधळ्यांना मार्ग दाखवण्याचा रस्ता म्हणजे व लोकस्वराज्य आंदोलन होय स्वाभिमानाची लढाई म्हणजे लोकस्वराज्य आंदोलन होय.मेहनतीच्या जोरावर कष्टाची भाकर खाऊन केवळ एखाद्या जातीसाठी नसून 59 जातीचा न्याय हक्कासाठी लढणारी एकमेव संघटना म्हणजे लोकस्वराज्य आंदोलन होय त्याचं प्रमुख मागणी अनुसूचित जाती आरक्षणाचे वर्गीकरण झाले पाहिजे हे मागणी घेऊन संघटना गेल्या वीस वर्षापासून काम करत आहे. त्यात मोर्चे धरणे ,आंदोलन मुक मोर्चा, ठोक मोर्चा ,उघडे मोर्चे ,हलगी मोर्चे ,पदयात्रा सत्याग्रह, हिवाळी अधिवेशन व पावसाळी अधिवेशन वर काढलेले मोर्चा आरक्षण परिषद ,शिक्षण परिषद ,विद्यार्थी परिषद ,महिला परिषद ,यात लाखो संख्याचा जमावलेला जनसमूह .
हिवाळी अधिवेशन नागपूर येथे झालेला लाठी चार्ज या सर्व कामाची दखल घेऊन नांदेड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी त्यांना नऊ लाखाची गाडी देवून चळवळ गतीमान करण्यासाठी सुभेच्छा दिल्या..हे सर्व माझ्या मते मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे.. आता झाले गेले सर्व मतभेद विसरून तरुण पिढीला एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे आज तरुणांच्या हाताला काम नाही बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले आहे समाजावर अन्याय अत्याचाराचे प्रमाण हे पण कमी झालेलं नाहीये म्हणून तरुण पिढीने एकजिनसी होऊन बुद्धीजिवी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावे आणि लोकस्वराज्य आंदोलनाच्या माध्यमातून लढा देन खूप गरजेच आहे.
लोकस्वराज आंदोलन हे संघटन नसून माणसाला माणूस बनवून अन्याय अत्याचाराविरुद्ध वाचा फोडण्यासाठी निर्माण केलेली लढाऊ सैनिकी फोर्स आहे .आणि समाजहित जपणारी सामाजिक संस्था आहे .आता अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरण 1000000 दहा लाख सह्यांचे निवेदन या उपक्रमाचे दमदार सुरुवात झाली असून अनेक मान्यवर समाज बांधवांनी सहभाग नोंदविण्याचे मोठ्या प्रमाणात काम करावे आणि संघटनेला गती द्यावी ही नम्र विनंती.
*गजानन भीवाजी वाघमारे गोगदरीकर*
*9503871528**
लोकस्वराज्य विद्यार्थी आंदोलन नांदेड*.