नांदेड –
भारतीय संविधानाने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा दिला. तेंव्हापासून १४ सप्टेंबर हा राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा केला जातो. हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा आहे. तसेच ती विशाल सागरासारखी आहे. त्यात भारतातील सर्वच प्रादेशिक भाषा आणि बोलीभाषा समाविष्ट झाल्या आहेत असे प्रतिपादन येथील ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे यांनी केले. यावेळी ज्येष्ठ कवी पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, गंगाधर ढवळे यांची उपस्थिती होती.
येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने आॅनलाईन पद्धतीने राष्ट्रीय हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, शाळा, महाविद्यालये, बँका, विविध क्षेत्रातील संस्था, चित्रपट, गाणी, वृत्तपत्रे, आकाशवाणी, साहित्य आदी माध्यमातून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार होतो. आगामी काळात साहित्य मंडळाची व्याप्ती वाढविण्यासाठी सप्तरंगी हिंदी साहित्य मंडळाचीही शाखा काढण्यात येईल असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात ज्यांनी हिंदी भाषेला समृद्ध केले अशा मुंशी प्रेमचंद, भारतेंदु हरिश्चंद्र, मैथिलीशरण गुप्त, निराला, राहुल सांस्कृत्यायन, महादेवी वर्मा, नागार्जुन, अज्ञेय, मुक्तिबोध, हरिवंशराय बच्चन, सुमित्रानंदन पंत आदी साहित्यिकांचे स्मरण करण्यात आले. सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास धुतराज यांनी केले तर हा कार्यक्रम आॅनलाईन प्रसारित करण्यासाठी मारोती कदम, शंकर गच्चे, प्रशांत गवळे, बाबुराव पाईकराव, रुपाली वैद्य वागरे यांनी सहभाग घेतला.