मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करणार – रिसनगाव येथे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते कब्बडी सामन्याचे उदघाटन

 

प्रतिनिधी =लोहा तालुक्यातील मौजे रीसनगाव येथे महालक्ष्मी सनानिमित्त भव्य कबड्डीच्या खुले सामन्यांचे उद्धाटन लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे व त्यांच्या सौभाग्यवती सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांनी कबड्डीच्या सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देऊन सर्व खेळांडुंशी हस्तांदोलन करुन सामन्याचे टॉस करुन कबड्डी सामन्यांना सुरुवात करण्यात आली. यावेळी रीसनगाव ग्रामपंचायत च्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रथम आमदार श्यामसुंदरजी शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांचे रीसनगाव नगरीत जंगी स्वागत करण्यात आले.यावेळी सर्वप्रथम आमदार श्यामसुंदर शिंदे व सौ.आशाताई शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी बोलताना आमदार शिंदे म्हणाले की, मैदानी खेळामुळे तरुणांचा शारीरिक विकास होतो मतदारसंघातील नवतरुण खेळाडू घडले पाहिजेत व मतदारसंघाचे नाव राष्ट्रीय पातळीवर झाले पाहिजे यासाठी मैदानी खेळाडूंना प्रोत्साहन देऊन मैदानी खेळासाठी यापुढे भरीव निधी उपलब्ध करण्याचा माझा प्रयत्न राहील असे आमदार शिंदे म्हणाले .

याप्रसंगी सरपंच प्रकाश शेषेराव पवार व कार्यक्रमाचे अध्यक्ष शेकाप चिटणीस , मोहन पा.गुंड, खरेदी विक्री संघ उपसभापती श्याम अण्णा पवार , बोरगांव चे सरपंच प्रतिनिधी पुंडलिक पाटील काँग्रेस लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार , माळाकोळी पोलीस स्टेशन उपनिरीक्षक धोंडे मॅडम, शेकाप लोहा तालुका अध्यक्ष नागेश हिलाल , संचालक खरेदी विक्री संघ सुधाकर सातपुते,रमेश राठोड ग्रामसेवक रीसनगाव,भिमराव नाईक,उपसरपंच बाबासाहेब बाबर , हरणवाडी सरपंच भरत निकीतवाड , गोविंद पा.पवार,परसराम हाबगुंडे, गणेश राठोड, गोविंद जाधव,सिद्धेश्वर कोकाटे तलाठी सज्जा रीसनगाव,नागरगोजे सर,प्रकाश हाबगुंडे,विशाल पा.कौशल्य,कोडगे सर,भागवत सर,सह कबड्डीचे खेळाडू व परिसरातील नागरीक, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *