*कंधार प्रतिनिधी संतोष कांबळे*
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला कंधार येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पोक्सो कायदयान्वये १० वर्षे सश्रम कारावासाची आणि ५ हजार रुपयांचा दंडाची शिक्षा ठोठावली.
३ सप्टेंबर २०१९ रोजी पीडित मुलगी ही आरोपी सुनील सुवर्णकार यांच्या घरी टी.व्ही. पाहण्यासाठी गेली असता तिच्यावर आरोपींनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला असे पिडीतेने तिच्या वडीलास सांगितले. वडिलांनी पोलीस स्टेशन माळाकोळी या ठिकाणी सदरील घटनेची फिर्याद दाखल केली होती. सदरच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन माळाकोळी या ठिकाणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक आश्रोबा घाटे यांनी तपास करून कंधार येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोष आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.
सदरील केसमध्ये सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले आहे. सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपीस पोस्को कायद्या अंतर्गत १० वर्षे सक्त मजुरी आणि ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. यातील आरोपी मागील पाच वर्षापासून जेलमध्ये असल्यामुळे तो कालावधी वजा करण्यात आला आहे. सदरील शिक्षा कंधार येथील जिल्हा न्यायाधीश-१ यांनी १० रोजी दिली आहे. सदरील प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून अड. महेश कागणे व शैलजा पाटील यांनी काम पाहिले व त्यांना पैरवी अधिकारी दीपक शेळके यांनी सहकार्य केले.