प्रा .डॉ.भगवान वाघमारे.(आण्णा)म्हणजे गरजवंताचा आधारवड

आमच्या सर्वांचे लाडके आण्णा.अतिशय संयमी शांत अभ्यासू असलेले मनमिळाऊ स्वभावाचे दिलदार व दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले.लाखो दिलो की धडकन हजारो मित्रांच्या प्रेमात असलेले.एक ज्येष्ठ विचारवंत . सुप्रसिद्ध लेखक. साहित्यिक. शिक्षण महर्षी. आमचे मार्गदर्शक. प्रेरणा स्थान आधारवड.प्रेरणा स्रोत.सर्वस्व आमच्या कुटुंबाचे डॉक्टर.आणि देव छोट्याशा खेड्या गावात जन्म घेऊन शिक्षणाचे विचार धारा पेरणारे आमचे आण्णा. गोगदरी गाव एक छोटस खेडे गाव आहे.डोंगर दरी मध्ये वसलेलं गाव आणि आणि आमच्या गावचा इतिहास पाची पांडव या नावाने प्रसिद्ध असलेलं गोगदरी या गावामध्ये प्रा डॉ.भगवान वाघमारे सर यांचा जन्म झाला .आणि अतिशय हलाखीची परिस्थिती असताना सुद्धा Bsc चे शिक्षण श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे पूर्ण केलेत गोगदरी ते कंधार पाई रोजच येणं जाणं करीत आपले शिक्षण पूर्ण करून प्रा डॉ.बनले आमच्या साठी एक प्रेरणा निर्माण करून दिली आणि आमच्या घरात अनेक प्राध्यापक .शिक्षक . मेडिकल .इंजिनिअरिंग सामाजिक कार्यकर्ता निर्माण केले.ते म्हणजे एक देवमाणूस प्रा. डॉ .भगवान वाघमारे आमचे आण्णा.

अतिशय कष्ट करून आपले शिक्षण पूर्ण केले.पोटाला उपासी तापाशी राहून शिक्षण पूर्ण केले.आत्ता समाजामध्ये परिवर्तन घडून अनत आहेत.आमच्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आहेत.आणि महाराष्ट्र भर ओळख असलेले आमचे आण्णा .खूप मेहनत करून आपले शिक्षण कशा प्रकारे पूर्ण करता येते एक छोटस खेडे गाव असून त्यात अनेक प्रकारचे लोक राहतात पूर्वी प्रत्येकाची हलाखीची परिस्थिती होती .रोजगार कराव किती आणि खाव किती अशी परिस्थिती होती अशा परिस्थितीत सुधारणा करणे म्हणजे एक देवमाणूस म्हणजे आमचे आण्णा.बसव शिव लहू फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ यांच्या परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करून .आण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.आण्णा तुम्ही नामवंत हो.गुणवंत हो बुद्धिवंत हो कीर्तिवंत हो. शीलवंत हो. ज्ञानवंत हो. मला लढा मान्य आहे रडगाणे नाही या विचाराचे पाईक असलेले आमचे आण्णा.हातात काठी घेण्या पेक्षा हातात पाठी घेता आली पाहिजे असे समुजत घालून शिक्षणाचे महत्व पटवून देणारे आमचे आण्णा. हक्क मागून मिळत नाहीत त्यासाठी झगडावे लागते झगड ण्यासाठी शक्तिशाली समाज कमकुवत व दुबळा ठरतो म्हणूनच बळी हा बकरीचा दिला जातो सिंहाचा नाही या विचाराचे पाईक आदरणीय आण्णा शून्यातून विश्व निर्माण करणारे. कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो असे महत्त्व पटवून आम्हा सर्वांना सांगणारे . नाव ठेवणे सोपे आहे परंतु नाव कमावणे कठीण आहे. असे मोलाचा संदेश आम्हा सर्वांना देणारे आमचे आण्णा. समाज कार्य करण्यात अग्रेसर असलेले. समाजाला पण खूप वेळ देतात या वयामध्ये सुद्धा समाजकार्य शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय मोलाचे मार्गदर्शन करतात आपलं सर्वस्व अर्पण करून सामाजिक शैक्षणिक कौटुंबिक कार्यात अतिशय तन-मन धन लावून कार्य करत आहेत.

कोणाची कितीही अडचण असो त्या अडचणीला धावून जाणारे कसलाच विचार न करता तो अडचण सोडवणार म्हणजे सोडवणारच असे आमचे देव माणूस आमचे अण्णा लिहिण्यासाठी शब्द अपुरे पडतात एवढा जनसमुदाय च्या माध्यमातून आमच्या अण्णांनी विश्व निर्माण केलेला आहे . शरीर. मन बुद्धी यांचा विकास म्हणजे शिक्षण. पैसा प्रॉपर्टी कोणीही कमवतो पण समाजामध्ये मान मिळवणारे आमचे अण्णा सामाजिक बांधिलकी जपून ठेवणारे.आण्णा आई माझा गुरु आई कल्पतरू

…………………………………. माणूसकी.. आई मुलाच्या अभ्यासाच्या खोलीत गेली तर पुस्तकाच्या कपाटात जाणारी मुंग्यांची रांग दिसली कपाट उघडले तर एका पुस्तकाच्या मागील बाजूस दोन चपात्या पडल्या होत्या. मुलगा शाळेतून आला. आईने विचारले, तुझ्या पुस्तकांच्या कपाटात चपात्या रे कशा,? मुलगा शर्मिंदा झाला. पण धैर्य एकवटून तो म्हणाला,”आई ग, माझ्या ना भोजनाच्या ताटातील दोन चपात्या समोरच्या म्हाताऱ्या भिकारणीला रोज देत असतो. पण काल ती आलीच नाही. तिच्यासाठीच्या या चपात्या आहेत.”आई रागावली तर नाहीच. पण मुलाला तिने शाबासकी दिली. या माणुसकीच्या नात्याचे विचाराचे पाईक आमचे अण्णा आदर्श व्यक्तिमत्व… अण्णा तुमच्या कार्यास माझा कोटी कोटी प्रणाम आणि वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

 

 

शुभेच्छुक.. किशोर भिवाजी वाघमारे गोगदरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *