*अनंत चतुर्दशी निमित्त ७५ पूरग्रस्तांना लायन्स इंटरनॅशनल ने पाठविलेले १८ वस्तूंचे सहायता किट लॉयन्स् क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष शिवाजी पाटील,झोनल चेअरपर्सन शिवकांत शिंदे, प्रोजेक्ट चेअरमन धर्मभूषण ॲड.दिलीपभाऊ ठाकूर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले असून योग्य वेळी मदत मिळाल्याबद्दल पूरग्रस्तांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.*
नांदेड मध्ये आलेल्या भीषण महापूरा मुळे शेकडो लोकांचे अतिशय नुकसान झाले. घरात पाणी शिरल्यामुळे नित्योपयोगी साहित्य वाहून गेले. अन्नधान्याची नासाडी झाली. लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया, पूर्व प्रांतपाल जयेशभाई ठक्कर, रिजनल चेअरमन रवी कडगे यांच्या पुढाकारातून लायन्स इंटरनॅशनल ने दहा हजार डॉलरचा तातडीचा निधी मंजूर केला. त्या निधीतून प्रत्येकी पंधराशे रुपये किमतीचे किराणा सामान,भांडे, कपडे व छत्री असलेले किट तयार करण्यात आले आहे. प्राथमिक स्वरूपात या किट वाटपाचा शुभारंभ यापूर्वीच मनपा आयुक्त डॉ. डोईफोडे आणि लायन्स प्रांतपाल गिरीश सिसोदिया, उपप्रांतपाल प्रथम आश्विन बाजेरिया, उपप्रांतपाल द्वितीय राहुल औसेकर, प्रांत सचिव रितेश छोरिया, रीजनल चेअर पर्सन रवी कडगे, कॉर्डिनेटर ॲड. दिलीप ठाकूर,पूर्व प्रांतपाल जयेश ठक्कर, दिलीप मोदी, नारायण कलंत्री,ॲड.प्रवीण अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला होता. तयार केलेल्या किट लायन्स क्लबच्या विविध शाखे मार्फत वाटप करण्यात येत आहेत. गुजराती हायस्कूल येथे लायन्स क्लब नांदेड सेंट्रल च्या वतीने किट वाटप करण्यात आले. यावेळी प्रास्ताविक करताना दिलीप ठाकूर यांनी पूर आल्यानंतर सलग पाच दिवस वाटप करण्यात आलेल्या लायन्सच्या डब्यासह इतर उपक्रमाची माहिती दिली.यावेळी शिवाजीराव पाटील, शिवकांत शिंदे यांची समायोचित भाषणे झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लायन्स सचिव गौरव दंडवते यांनी तर आभार कोषाध्यक्ष दीपेश छेडा यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्लब सदस्य लक्ष्मीकांत कळणे ,अमित वाघमारे ,सुबोध बोंबीलवार ,ओमप्रकाश कामिनवार, प्रवीण जोशी, सुरेश शर्मा, अरुणकुमार काबरा, कामाजी सरोदे, विजय वाडेकर,प्रसाद जोशी,सविता काबरा यांनी परिश्रम घेतले. यावेळी अनेक पूरग्रस्त उपस्थित होते. सर्वजण गणेश विसर्जन मिरवणुकीत व्यस्त असताना देखील लायन्सने आपल्या सेवा धर्माचे पालन करत योग्य वेळी योग्य मदत दिल्याबद्दल लायन्स परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.