भारतास जोडण्याचं काम हिंदी भाषेने केले. प्रा डॉ चिलगर पी डी

 

 

धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )

हिंदी भाषेने भारतास जोडण्याचं महत्त्वाचे काम केले आहे. म्हणून आपण सर्वांनी मिळून तिचा सन्मान केला पाहिजे . असे प्रतिपादन प्रा डॉ चिलगर पी डी यांनी केले.
ते येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात दि 19 सप्टे 24 रोजी आयोजित हिंदी दिवस समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करत होते. प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांची प्रमुख उपस्थिती होती. हिंदी विभाग प्रमुख प्रा डॉ चाटे टी व्ही व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दिप प्रज्वलन करण्यात आले.

पुढं बोलताना ते म्हणाले की हिंदी भाषा भारत को जोडणेवाली भारत की धडकण है. संसार की सबसे सरल भाषा हिंदी हैं. पर अहम से लेकर भाषावाद हैं. हिंदी तकनीकी भाषा बन गयी है. आनंदाची गोष्ट म्हणजे अलीकडे हिंदीला राजाश्रय मोठ्या प्रमाणात मिळाला आहे. आता ती लवकरच विश्वभाषा बनावी. असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. हिंदी भाषेचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी हिंदी दिवस समारोह साजरा करण्यात येतो आहे. असं सांगून प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांनी समारोप केला. प्रास्ताविक आणि आभार प्रा जंगिटवार व्ही आर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *