कंधार ;
अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटीच्या 37 व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा पालक मंत्री नांदेड मा.ना.अशोकराव चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस आघाडीचे अध्यक्ष सौ. चारुलताताई टोकस,माजी आमदार सौ.अमिताताई चव्हाण, माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक कार्यकर्त्या
तथा माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी बहदरपुरा ता. कंधार येथील आरोग्य केंद्रातील कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा वर्कर्स व गावातील नागरिकांना मास्क व सॅनिटायझर चे वाटप करून फवारणीसाठी सोडियम हैपोक्लोराईड औषध दिले.
अखिल भारतीय महिला काँग्रेस कमिटी ची स्थापना तत्कालीन माजी पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांच्या नेतृत्वाखाली 37 वर्षांपूर्वी करण्यात आले याच पार्श्वभूमीवर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आज ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत आहे या काळामध्ये आरोग्य कर्मचारी, परिचारिका भगिनी,आशा वर्कर,अंगणवाडी सेविका,मदतनीस आपल्या जिवाची पर्वा न करता जनतेची सेवा करत आहे त्यांच्या सुरक्षेसाठी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी मास्क सॅनिटायझर व फवारणी साठी औषध दिले.
याप्रसंगी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी गावातील नागरिकांना असे आवाहन केले की आज सबंध भारत देशामध्ये महाराष्ट्र मध्ये कंधार व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणु चा प्रादुर्भाव वाढला असून यासाठी इथून पुढील काळामध्ये नागरिकांनी अत्यंत सतर्क राहून आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे यासाठी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडणे बाहेर जात असताना मास्क चा वापर करणे वारंवार हात धुणे समाजिक आंतर बाळगणे इत्यादी
शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून माझे कुटुंब माझ्या कुटुंबाची जबाबदारी याप्रमाणे आपण संरक्षण करावे असे आवाहन यावेळी सौ.वर्षाताई भोसीकर यांनी केले यावेळी तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हनमंथराव पाटील पेठकर, प्राचार्य सौ राजश्री शिंदे, डॉक्टर लक्ष्मीकांत पेठकर, डॉ.सौ. पेठकर सौ.चंदेल मॅडम, सचिन पेटकर,तुळशीराम पालीमकर, बाबू गायकवाड, परिचारिका भगिनी, आरोग्य केंद्रातील कर्मचारी, अंगणवाडी सेविका,मदतनीस, आशा वर्कर गावातील नागरिकांची उपस्थिती होती.