नांदेड( प्रतिनिधी):-
१९ वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे २९ सप्टेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना ‘शब्द कुंज प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येणार आहे. यात नांदेड जिल्ह्याच्या दोन रणरागिण्या साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या
सौ. रुचिरा बेटकर आणि सौ. अंजली मुनेश्वर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे अध्यक्ष स्थान प्रा .पी .एस .पाटील तारळे खुर्द (राधानगरी) हे भूषवणार आहेत तर उद्घाटन कवी डॉ रामचंद्र गोविंद चोथे (अकिवाट) यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख पाहुणे म्हणून मा.साहेबराव बळीराम खरे परिमंडळ वन अधिकारी ठाणे, मुंबई. यांची उपस्थिती राहणार आहे.तसेच प्रमुख उपस्थितीत कवी अशोक मोहिते, भाऊसाहेब कांबळे ममदापूर, आणि चित्रपट टिव्ही नाट्य अभिनेते सुशिल डवर कुडाळ यांची राहणार आहे. कविसंमेलन अध्यक्ष कवी दादासाहेब शेख रत्नागिरी हे आहेत.संमेलनाचे आयोजक कवी सरकार इंगळी असून सुत्रसंचलन सौ अर्पणा भंडारी कोल्हापूर हे करणारं आहेत. याचबरोबर कोल्हापूर, सोलापूर ,नांदेड, बार्शी, मुंबई, ठाणे, सांगली ,धाराशिव इत्यादी ठिकाणावरून पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि कवी उपस्थित राहणार आहे.