सामान्य विचारसरणी आणि असामान्य व्यक्तीमत्व..

आपण प्रत्येकजण एका ठरावीक चष्म्यातुन आयुष्याकडे पहातो कारण आपली जडणघडण ही अशीच झालेली असते.. त्या चौकटी बाहेर जाऊन आपण वेगळा विचार करतच नाही.. ठरावीक वयात शिक्षण , मग लग्न , मुलं , संसार, पेंशन, बॅंकेत ठरावीक अमाउंट यापलीकडे आपली उडी जातच नाही.. आपले पालक तसेच वाढलेले असतात.. त्यामुळे आपल्यालाही ते तसेच वाढवतात आणि त्यातच आपण धन्यता मानतो.. निरोगी असावं . इतकी वर्षे जगावे अशा ठरावीक संकल्पना आपल्या डोक्यात असतात पण या सगळ्याला छेद देत काही मंडळी अगदी वेगळा विचार करतात.. आयुष्य कमी असलं तरी चालेल पण ते भरभरून जगायचं आणि काहीतरी वेगळं करुन आपलं अस्तित्व जपायचं.. ज्ञानेश्वर माऊलीच पहा ना.. अवघ्या १६ वर्षात ज्ञानेश्वरी लिहीली आणि त्यानंतर समाधी घेतली.. त्यांनी ८० वर्ष जगण्यापेक्षा अशा रुपात कायमस्वरूपी जगणं पसंत केलं.. अशी अनेक उदाहरणे अनेक क्षेत्रात आपल्याला पहायला मिळतात पण आपल्याला चौकट मोडून विचार न करता येत असल्याने आपण काही व्यक्तीवर फक्त टिका करतो.. खरं तर टिका करण्यापेक्षा टिका लिहायला यायला हवी.. या दोन्हीत फरक आहे बरं का मित्रांनो..

आताच अगदी गेल्या आठवड्यात सोशल मिडीयावर एका व्यक्तीबद्दल बोललं गेलं ती व्यक्ती म्हणजे बिगबॉसमधे वाइल्डकार्ड मेंबर जे मिस्टर इंडीया आणि मिस्टर युनीव्हर्स आहेत.. बिगबॉसमधे खेळतांना त्यांना दुखापत झाली आणि त्यांचा हात फ्रॅक्चर झाला त्यावर लगेच लोकांनी ताशेरे ओढायला सुरुवात केली.. फोफसं शरीर, ताकद नाही त्याला , मिस्टर इंडीया कसला हा तर फुसका इंडीया अशा पध्दतीच्य कमेंट वाचनात आल्या.. तसं पहायला गेलं तर निसर्गाच्या विरूध्द जाऊन शरीरावर अत्याचार केले की कालांतराने शरीर बोलायला लागतं ..

आता सलमानलाही उठता बसता त्रास व्हायला लागला आहे पण अशी मंडळी या सगळ्याचा विचार न करता त्यांच्या धेय्यपुर्तीसाठी प्रचंड मेहनत घेतात आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतात.. कदाचित इतर सभासंदांपुढे ते शरीर फुसकं असेलही पण ज्या पध्दतीने त्यावर मेहनत घेतली जाते ते खायचे काम नक्कीच नाही.. यामागे किती कष्ट असतील याची आपण कल्पनाही करु शकत नाही.. नॉर्मल व्यक्ती जी निसर्गाच्या विरूध्द न जाता नियम फॉलो करुन दैनंदिनी करत असते ती अधिक कणखर असतेच.. त्या व्यक्तीकडे इम्युनीटी पण चांगली असते.. घरचा आहार घेणारा , रोज व्यायाम करणारा हा निरोगी असतोच हेच सत्य आहे.. पण काहीतरी कमवायला काहीतरी गमवावे लागते हेही तितकच खरं… ही मंडळी अशा पध्दतीने हेल्थ गमावून आपली स्वप्नं पूर्ण करतात आणि हा सर्वस्वी त्यांचा चॉइस असतो.. त्यामुळे आपण टिका न करता अशा वेगळेपणाला किवा मेहनतीला सलाम करु शकतो ..आणि आपण तेच करायचं असतं.. टिकाटिप्पणी करणं खूपच सोप्पं आहे ..

आपल्या विचारांची दिशा ही कायमच उच्च असायला हवी.. उद्या मी ज्या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणुन जाणार आहे तिथेही लेडी बॉडी शो आहे .. स्त्रीयांना तर हे अजूनच अवघड असावं .. तरीही त्याही त्यांचं वेगळेपण जपत स्वतःला सिध्द करायला तयार आहेत..
सोच बदलो.. देश बदलेगा..
#SonalSachinGodbole

#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *