Post Views: 64
नांदेड – शहरात संपन्न झालेल्या भारत किसान आंदोलनास सप्तरंगी साहित्य मंडळाने पाठिंबा दिला. किसान जन आंदोलन भारताचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी कासलीवाल यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या धडक मोर्चास सप्तरंगी साहित्य मंडळ महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष प्रज्ञाधर ढवळे तसेच संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांच्या आदेशानुसार आणि यशोधरा महिला मंडळ नवीन कौठा नांदेड येथील ज्येष्ठ महिला सुशिलाबाई दिग्रसकर, पंचफुलाबाई ढवळे, गयाबाई जोंधळे, धोंडूबाई दुंडे, कसबे बाई पुष्पाबाई आदींच्या उपस्थितीमध्ये नांदेड दक्षिण सप्तरंगी साहित्य मंडळाचे अध्यक्ष राहुल हैबते, समन्वयक सचिन कांबळे, मुख्य समन्वयक मनोज जोगदंड, सचिव सिद्धार्थ कांबळे, कार्याध्यक्ष जळबा सोनकांबळे, सभासद गौतम दवणे, देविदास वाघमारे, राघोजी हानवते, भैय्यासाहेब दुंडे, संगम आढाव आदी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भारत किसान जन आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.