दररोज एक वृक्षलागवड चळवळीस एक हजार दिवस पूर्ण…
मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबीर…
1986 साली शिवसांब बाबूराव घोडके यांचा पानभोसी ता. कंधार, जि नांदेड येथे जन्म झाला. वडील सरपंच घरी मळ्याची शेती असल्यामुळे लहानपणापासून वृक्षां विषयी त्यांच्या मनात जिव्हाळा तयार झाला. त्यामुळे शालेय शिक्षणानंतर बी. एस.सी. हॉर्टीकल्चर, एम. एस्सी. बॉटनी, बी.ए. समाजशास्त्र अशा पदव्या संपादन केल्या.साहजिकच 2008 मध्ये त्यांची वनरक्षक म्हणून नेमणूक झाली. ट्रेनिंगच्या काळातच त्यांनी प्रथम येऊन महाराष्ट्रराज्य प्रधान मुख्य वनंरक्षक यांच्या हस्ते त्यांचा गौरव झाला.
नागपूरमध्ये त्यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाचे उत्कृष्ट कार्य केले. त्यांची नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे बदली झाली. त्याठिकाणी वृक्षतोड आणि तस्करी बंद करून गुन्हेगारांना पकडून त्यांच्यावर न्यायालयात खटले भरण्याचे कार्य तर केलेच, त्याशिवाय वृक्षलागवड, संवर्धन वन्यजीव संरक्षणाचे कार्य प्रामाणिकपणे केल्यामुळे पुन्हा त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन त्यांचा यथोचित गौरव करण्यात आला.
आता त्यांची नौकरी कंधार तालुक्यात आहे. संपूर्ण तालुक्याचे कार्य करत असताना स्वतःच्या जन्मभूमीतही कांही तरी केले पाहीजे ‘निसर्ग सेवा गट पानभोसी’नावाचे दोन वाॅट्स ग्रूप तयार केले.आणि विचारांची देवाणघेवाण सुरू केली.त्यातून पुढे 1 जानेवारी 2022 रोजी दररोज एक वृक्ष लागवड चळवळ सुरु झाली.गावकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्यामूळे ती चळवळ फोफावत गेली.. खरे तर एखाच्या दिवशी दोनशे-तिनशेही झाडेही लावतात परंतू निदान एक वृक्ष लागवड चळवळ अखंडितपणे चालू आहे. गावकरी महापुरुषांचे जन्मदिवस कुणाचा वाढदिवस, पुण्यतिथी, लग्नाचा वाढदिवस अशा विविध निमित्ताने एकमेकांचा उत्साह वाढवून वृक्षलागवडीसह त्यांचे संगोपन केले जाते. वृक्षलागवडीमुळे जनतेची मने जुळत गेल्यामुळे लोकसहभागातून गावात सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका तयार केली गेली. त्यात अभ्यास करून अकरा जण नौकरीस लागलेही… वृक्षलागवड चळवळीला आज दि. 25/9/2024 रोजी एक हजार दिवस पूर्ण झाल्यामुळे निसर्ग सेवा गट पानभोसी तर्फे मोफत सर्वरोग -निदान व औषधोपचार शिबीर आयोजित करण्यात आले आहे,त्यासाठी नांदेडहून अनेक तज्ञ डॉक्टर्स येत आहेत. राजकारण्यांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या पानभोसी गावात इतके विधायक कामे होतात. हे केवळ वनरक्षक शिवसांब घोडकें तरूणामुळे आणि वृक्षलागवड चळवळीमुळेच.
शिवसांब घोडके या तरुणांचा गोरख चिंचेवर आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेत शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. राष्ट्रीय औषधी वनस्पती खरेदी व विक्री कार्यशाळेत निमंत्रित विषय तज्ञ म्हणूनही त्यांनी मार्गदर्शन केले आहे. लेखक शिवसांब घोडके यांनी ‘नांदेड जिल्ह्याची वनसंपदा : वृक्ष लागवड व संवर्धन’ हे पुस्तके लिहीली आहेत.. त्यांच्या दोन पुस्तकांचे प्रकाशन शासनाकडूनच लवकरच होणार आहेत.
खरं तर अशा वृक्षलागवड चळवळी गावोगावी होणे फार महत्त्वाचे आहे.. त्यासाठीप् प्रत्येकाला शिवसांब घोडेके यांच्या एवढ्या शिक्षणाची गरज सुद्धा नाही.. एखादा माणूस गावातून पेटून उठला म्हणजे हे सहजच शक्य होते. त्यासाठी हवी असती केवळ जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिकपणा एवढेच…
राजीव तिडके
वृक्षमित्र तथा स.शि.जि.प.हा.लोहा