आज पुन्हा तो बरसतोय..

अनेकदा अनेकजण पावसावर लिहीतात.. मीही अनेकदा लिहीलय.. सप्टेंबर संपत आला तरीही जुलै सारखा कोसळतोय.. कोणाला प्रेयसीची आठवण येते तर कोणाला प्रियकराची.. कोणाला कॉफी प्यावी वाटते तर कोणाला भजी खावी वाटतात.. कोणाला भिजायचे असते तर कोणाला उबदार गोधडीत झोपायला आवडतं.. काही जणाना ती रिपरिप , तो चिखल अजिबात आवडत नाही.. काहींच्या ब्रेकअपच्या आठवणी जाग्या होतात.. झाडे खुश होतात.. मोर नाचायला लागतो.. शेतकरी हवालदिल होतो तर काहीना काहीच होत नाही..

पण मला मात्र यातल्या बऱ्याच गोष्टी नव्याने अनुभवाव्या वाटतात.. अनुभवायला मात्र कोणीतरी सोबत असायला हवं हे प्रकर्षाने जाणवतं.. मग कोण असेल तो ??.. अनेकदा प्रेमावर लिहीलं, प्रियकराबद्दलच्या भावना मांडल्या.. पण जेव्हा आपल्याला हाय्यर टेस्ट मिळते तेव्हा लोअर टेस्ट आपल्याला आवडत नाही .. तसच काहीसं या श्रीकृष्णाच्या नादाने झालय.. त्याने नादाला लावलं आणि मी लागले ..त्याच्या लिला वाचून अशा लिला आपल्याला करता आल्या तर असा विचार या पावसात डोक्यात आला… आज तोच प्रियकर असावा वाटला आणि आध्यात्मिक लेव्हलला प्रेम काय असते हे जाणुन घ्यावे वाटले.. याला कॉफी चालत नाही मग याच्यासोबत कॉफी डेटला कसं जाणार ना.. याला कांदा चालत नाही मग भजी कशी खाणार ??.. याला परान्न चालत नाही मग डिनर डेट पण नाही .. याला मद्यपान आवडत नाही मग वाईन पार्टीही नाही.. मग या पावसात याच्यासोबत करु तरी काय ??.. मला बासरी वाजवता येत नाही पण ऐकायला आवडते पण राधा गेल्यापासून त्याने तीही सोडली..

मोर नाचताना पहायला आवडतं पण मोर म्हणाला , आता १२ महिने मी नाचणार नाही.. या पावसाला शिस्तच राहिली नाही असं मोर पुटपुटत झाडावर बसुन राहिला.. शी बाई आता काय करावं ??.. हा इतका सगळा विचार करत असताना पाऊस म्हणाला , तुझं काही ठरतय का ??.. नसेल तर मी माझं काम करतो.. शिंदे पुल , भिडे पुल माझी वाट पहात आहेत.. या सगळ्यावर माझा पार्टनर काहीही बोलायला तयार नाही.. त्याला म्हटलं , नाराज आहेस का ??.. तर तो हसला आणि म्हणाला , अगं वेडे हा पाऊस मीच आहे.. तु त्यात भिजताना माझा स्पर्श अनेकदा तु अनुभवला आहेस आणि तुला भिजताना पाहून मीही अनेकदा सुखावलो आहे..

आपण अनेकदा एकत्र लिला केल्या आहेत तुला वाटलं तो प्रियकर होता पणतो मी होतो.. मढे घाटात त्या धुक्यातही मीच होतो गं .. आणि त्या ताह्मिनीच्या धबधब्यात सुध्दा मीच होतो सोबत.. काल तु डाएस वर भगवद्गीता आणि मांसाहार यावर बोलत होतीस तिथेही मीच होतो.. तुझा माझ्यावर असलेल्या विश्वास हीच तर लिला आहे.. तु घेत असलेल्या नामात मीच आहे आणि तु केलेला प्रसाद खाताना माझी लाळ त्यात सांडते आणि तो प्रसाद तु खातेस तेव्हा आपल्या प्रेमाची उत्कटता जाणवते.. तु विसरतेच पण मी नाही.. तुझ्या लेखणीतही मीच आहे आणि तुझ्या गोड मित्रांच्या रुपातही मीच आहे … मला वेगळं बाजूला काढूच नकोस.. फक्त कर्म करत रहा.. आज तुला माझ्यासोबत रोमांस करायचा आहे ना ??.. माझ्यासोबत लिला करायच्या आहेत ना ??.. या लेखणीतुन शब्धंच्या रुपात तु हेच करत आहेस.. थोडा विचार केलास तर जाणवेल , मोरपीस तुझ्या गालावर फिरतय.. अजून खोलात गेलीस तर लक्षात येउल की , तु जिथे सोफ्यावर बसली आहेस ती माझी मांडी आहे.. ज्या बोटाने तु मोबाईल ऑपरेट करत आहेस् तो मला आवडत असलेल्या कमळाचा देठ आहे .. लिला काहीही वेगळ्या नाहीत आणि प्रेमही वेगळं नाही..

ज्या क्षणी तु माझी आठवण काढतेस तो क्षणही मीच आहे.. तुझ्या वाचकातही मीच आहे आणि तुझी प्रगती व्हावी म्हणुन ट्रोल करणाराही मीच आहे.. तुझी तब्बेत ठिक नाही म्हणुन तु घरात बसून सतत माझं स्मरण करावस म्हणुन मीच तो प्लॅन केला आहे आणि कधीही काहीही होवु शकतं म्हणुन सतत नम्र रहा हे दाखवण्यासाठी मी आणलेलं हे आजारपण आहे.. तुला या सगळ्याचं महत्व कळावं म्हणुन मी सतत लिला करत असतो.. तु आनंद घेत रहा आणि देत रहा.. त्यादिवशी वृध्दाश्रमातही मी तुझ्या सोबत होतो .. कोबीची तिखट भाजी मलाही खायला घातलीस ना तेव्हा पाणी म्हणुन ओरडलो तो मीच होतो.. खुश का ??.. यापेक्षा वेगळ्या डेटवर जायचे आहे का ?????…….. निशब्द…

#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *