शिक्षक महासंघाच्या *कार्याध्यक्षा आमदार मा.उमाताई खापरे* यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्याचे *शिक्षण संचालक (प्राथमिक) मा श्री शरद गोसावी* साहेब यांच्याशी राज्यातील खाजगी प्राथमिक शाळा, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित विषयांवर सकारात्मक चर्चा झाली होती. दिनांक 30 ऑगस्ट रोजी शिक्षण संचालक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या सहविचार सभेस शिक्षण उपसंचालक राजेश शिंदे, अधीक्षक अमोल पवार उपस्थित होते.यावेळी शिक्षक महासंघाचे *मुख्यसचिव* विठ्ठल उरमुडे
*राज्य संघटनमंत्री* कृष्णा हिरेमठ
*उपाध्यक्ष* ज्ञानेश्वर गायकवाड
*सहसचिव* राजेंद्र कोरे, विकास थिटे
*राज्य प्रसिद्धीप्रमुख* नंदकुमार हंबर्डे
*कार्याध्यक्ष* अन्सार शेख *सचिव* शेखर उंडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. या सहविचार सभेत शिक्षण संचालकांनी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आधार अवैध असलेले विद्यार्थी पडताळणी करून संच मान्यतेला ग्राह्य धरण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी दिले.