राष्ट्रहित हेच सर्वतोपरी …प्रताप पाटील चिखलीकर

 

कंधार

एकात्म मानववाद आणि अंत्योदय चे प्रणेता पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे सम्पूर्ण जीवन राष्ट्राला समर्पित करनारे होते पंडित दीनदयाल उपाध्याय हे महान विभूती होते, ज्यांनी अपले कार्य आणि विचाराच्या माध्यमातून समाजला देशासाठी रचनात्मक काम करण्याची प्रेरणा दीली. त्यांचे विचार राष्ट्रहित सर्वतोपरी हे ध्येय समोर ठेवून केलेले कार्य होते असे प्रतिपादन माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रमावेळी केले.

दि २५ ऑक्टोंबर रोजी कंधार येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीच्या अनुषंगाने आयोजित अभिवादन कार्यक्रमास माजी खा प्रतापराव पाटील चिखलीकर ,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड,भाजपा तालुका अध्यक्ष किशनराव डफडे, माजी नगराध्यक्ष जफरबाउद्दिन हे उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना चिखलीकर म्हणाले की त्यांनी भारताला एक सशक्त आणि समतामूलक राष्ट्र बनवण्याची विचारधारा सोबत अंतिम टोकावर उभे असलेल्या प्रत्येक व्यक्तिच्या जीवनला सक्षम बनविण्यासाठी आपले सर्वस्व समर्पित केलें.उपाध्याय जी कडून आलेली “एकात्म मानववाद” चे दर्शन आज ही भारतीय जनता पार्टी च्या विचारधारेचा आदर्श आहे.असे ते या वेळी म्हणाले.

यावेळी भाजप विस्तारक अड गंगाप्रसाद यन्नावार ,शहराध्यक्ष निलेश गौर ,सरचिटणीस मधुकर डांगे, चेतनभाऊ केंद्रे , प्रभाकर केंद्रे, प्रदीप मंगनाळे, रजत शहापुरे, सय्यद अमजद ,मोहम्मद जफर,समीर चाऊस, बाळू धुतमल, अड सागर डोंगरजकर,राजकुमार केकटे, यांच्या सहकार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *