कंधार : कंधार शहरातील अंतर्गत विकासासाठी लोकनेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून 14 कोटी 17 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या निधीतील अनेक कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. खा. डॉ.अजित गोचडे यांच्या हस्ते पार पडणाऱ्या या भूमिपूजन सोहळ्याला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
लोहा – कंधार विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षापासून सदैव तत्पर असणारे नेतृत्व म्हणून माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे पाहिले जाते. चिखलीकर यांच्या पुढाकारामुळे लोहा , कंधार शहरातही सर्वांगीण विकास होत आहे. याच अनुषंगाने कंधार मधील अनेक अंतर्गत विकास कामे करण्यासाठी चिखलीकर यांच्या प्रयत्नातून 14 कोटी 17 लाख रुपयांच्या कामाचा भूमिपूजन सोहळा आणि लोकार्पण सोहळा आज पार पडणार आहे. या कामात कंधार येथील शांतिदूत गोविंदराव पाटील चिखलीकर उद्यान विकसित करणे. ३ कोटी. मानसपूरी ते संगुचीवडी इजिमा १०८ (मानसपूरी ते बेलाची महादेव) सीसी रस्ता करणे. ५ कोटी.कंधार येथील वीरमाधव नगर ते भगवान बाबा मंदिर सभागृहापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे. १ कोटी ४७ लक्ष. कंधार येथील स्वप्नभूमी नगर येथे संभाजी केंद्रे ते वारे त गव्हाने यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे. १ कोटी १ लक्ष. कंधार येथील जलशुद्धीकरणाची सुधारणा व बळकटीकरण करणे. ५५ लक्ष. कंधार येथील खडंकी देवी मंदिर, स्वामी समर्थ मंदिर, विजय गड येथील बौद्ध विहार सभागृह व भगवानबाबा मंदिर, साईबाबा मंदिर, सुलेमान शहा दर्गा येथे संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे. १ कोटी ५ लक्ष. कंधार येथील सिद्धार्थ नगर अंतर्गत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे, ७० लक्ष . प्रभाग क्र. १ मध्ये निवृत्ती वाघमारे, मुंडे, पोचीराम वाघमारे ते निरजगावे व प्रभाग क्र. ७ मध्ये डॉ. फाजगे ते डॉ. कागणे, डॉ. केंद्रे यांच्या हास्पिटल पर्यंत सीसी रस्ता करणे, १ कोटी ३० लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे ,अॅड.श्री. किशोर देशमुख ,दिलीप कंदकुर्ते , महिला मोर्चा चित्राताई गोरे, संजय देशमुख , देविदास राठोड, प्रवीण पाटील चिखलीकर , प्रणिताताई देवरे-चिखलीकर ,बाबुराव केंद्रे, रामराव पवार, बाबुराव गंजेवार, अनुसयाताई केंद्रे ,बाबुराव गिरे सुनील कांबळे , व्यंकट मामडे ,अॅड.श्री. कोळनुरकर , मा.मा.गायकवाड, मधुकरराव डांगे , गंगाप्रसाद यन्नावार , जफरोद्दी बाहोद्दीन, किशनराव डफडे, सुधाकर कौसल्य , अब्दुल अडूळ, शिवाजीराव लुंगारे, मा.अॅड.श्री.बी. के. पांचाळ, अॅड. श्री. दिगांबर गायकवाड, स्वप्नील लुंगारे , भगवानराव राठोड, जफरउल्ला खान, बालाजी पवार,बाळु महाजन, भगवानदास व्यास, उत्तमराव जाधव, दगडूभाऊ सोनकांबळे , मनोहर तेलंग, सचिन पा. चिखलीकर, श्रीमती अनिताताई कदम, शैलेश बोरलेपवार, विक्रम मंगनाळे, दिनकर जायभाये, ज्येष्ठ पत्रकार डॉ. रामराव सदावर्ते आदींची उपस्थिती राहणार आहे.