*वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग 21 वा

 

एकदा एका वाघोबा सोबत एका गाढवाने वाद घातला..वाद असा होता. गाढव म्हणाले, “*गवत पिवळे असते.”*
वाघोबा म्हणाले,”*गवत हिरवे असते, निबरले की पिवळे होते.”*
गाढव म्हणाले गवत पिवळेच असते. वाघोबानी खूप समजावून देण्याचा प्रयत्न केला पण शेवटी गाढवं ते गाढवं. वाद खूप वेळ चालला. वाघोबा म्हणाले,”*चल आपण वनराजाला विचारू.”*
गाढव म्हणाले, “*चल”*
दोघे वनराजकडे गेले. दोघांनी ही आपापली बाजू पटवून दिली. सिंहाने एक थापड वाघोबाला लागावली आणि म्हणाले,”*गवत पिवळेच असते जा “* गाढव वाघोबाला वाकोल्या दाखवून उड्या मारत निघून गेले… नंतर वाघोबानी विचारलं, “*महाराज,आपणास तर माहीत आहे गवत हिरवे असते नंतर ते वाळले की पिवळे दिसते, तरी तुम्ही मलाच का मारलं?*
“* तुला याच्यासाठी मारलं की तू मुर्खासोबत वाद घातलंस.. वाद विवाद हा शहाण्या समजदार माणसांसोबत करावा ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्याशी वाद कशाला घालवा?
सद्या अशीच काही परिस्थिती आहे. महाराष्ट्रात रसदी टमरेल विचारवंताचे काही ठिकाणी पीक आलेलं आहे. हे सुपारीबाज घे सुपारी अन भूक दुपारी असा सपाटा लावलेला आहे. तसे पाहता आमचे आणि या टमरेलांचे काही देणे घेणे नाही. बिचारे टमरेल आपल्याच आई बहिणीची खेड्यापाड्यातून वाड्यावरच्या लोकांनी केलेल्या बेईजतीचे भांडवल करून पुस्तकाच्या पानापानावर त्यांच्या इज्जतीचा बाजार मांडून त्यावर मालकाकडून शाबासकी मिळाविलेले धन्य ते साहित्यिक,धन्य ते साहित्य…आणि धन्य ते पुरस्कार……..
आम्ही भांडतोय ते रंग बदलणाऱ्या दुटप्पी काँग्रेस नेतृत्वाला…. मात्र हे मधेच डोमकावळ्या सारखे डोकावतात. आम्ही एखादा वार केला की लगेचच यांच्याच बुडाला आग लागते अन अंगाचा जळफळाट करून घेतात… आम्ही म्हणतो काँग्रेस रंग बदलू आहे. कधी ती धर्म निरपेक्ष असते तर कधी सॉफ्ट हिंदू असते. कधी संविधानाचे रक्षण करू म्हणते तर कधी आरक्षणाचे अबकड करू म्हणते कधी नोकऱ्या देऊ म्हणते अन खाजगीकरण, उदारीकरण करते. इकडे बाबरीचे संरक्षण करू म्हणते अन तिकडे बाबरी उध्वस्त करणाऱ्यांना वाट मोकळी करून देते. नामांतरात शेकडोचा प्राण घेते आणि मुंबईत बसून नामांतर केलं ही चूक झाली म्हणते तर कधी आरक्षणामुळे नालायक लोकांची भरती होते म्हणते….. म्हणून आम्ही रंग बदलती काँग्रेस दुटप्पीआहे म्हणतो तर त्या गाढवा प्रमाणे यांना एकच भास होतोय की काँग्रेस पालनहार, काँग्रेस आपली रक्षक आहे. काँग्रेसने गांधीवाद सोडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारला आहे. आता काँग्रेसच आपल्या दहा पिढ्याचे जीवन सुखी करणार आहे.. किती ही सांगा ते आपलं एकच धरून बसलेत. काँग्रेस एके काँग्रेस….
आमच्यामुळे त्यांचा चारशे पारचा मनसुबा फेल झाला म्हणून कोणी टिरी बडवून घेत असेल तर तो त्यांचा गोड गैरसमज आहे. कोणाला पडायचे कोणाला निवाडायचे हे वर ठरलेले आहे. इकडचे काही दिग्गज पडायचे, तिकडचे काही दिग्गज पडायचे आणि EVM विरुद्ध असलेला जनाक्रोश मोडीत काढायचा. लोकांचे लक्ष डायव्हर्ट करायचे. अख्खा भारत EVM च्या विरोधात आंदोलन करताना एकही काँग्रेसवाला ठाम भूमिका घेतला नाही. ‘तेरीभी चूप मेरीभी चूप असं चालू आहे सारं. आमच्या मुळे वंचित हारली म्हणून काहींना गुदगुल्या होत आहेत. पण दादा मी म्हटलं होत मला 17 c आणि EVM चे आकडे जुळवून दाखवा मग मी सांगतो वंचितची मते कोणी चोरली. गरीबाची शेती उध्वस्त करण्याचा काँग्रेसवाल्यांना जुना अनुभव आहे. पीक कापून नेली दाद कुणाला मागणार? सरपंच त्यांचाच, पोलीस पाटील त्यांचाच, ग्रामसेवक त्यांचाच, तलाठी त्यांचाच. सारे मिळून गरीबाची शेती खुडून नेतात. आता EVM मधून आमची मते चोरली आणि आपसात वाटून घेतली… आम्ही जिंकलो,आम्ही जिंकलो, वंचित हारली, प्रकाश आंबेडकर हरले म्हणून आनंदोत्सव चालू झाला…
आता विधानसभा येत आहेत.संसदेत EVM च्या विरोधात मालकाला तोंड उघडायला सांगा.. नाहीतर ते 160 पार जाऊ शकतात मग तुम्ही बसाल दोन्ही हातावर तेल टाकून……. वंचितच्या नावाने #####
राजकीय आरक्षण तर दहा वर्षांनी बंद होणार होते ना? बाकी सगळीकडे नाकेबंदी करून राजकीय आरक्षणाला मुदत वाढ का देत असतील हे राजकारणी?

राजकीय आरक्षणातून दलाल सालगडी निर्माण होत असतील तर असले आरक्षण घेऊन काय……?
खैरलांजी, हातरस सारख्या घटना खुलेआम घडत असतील, जातीजातीत कलागती लावण्यासाठी आरक्षणातील अबकडची भाषा होत असेल आणि आरक्षित जागेवरून निवडून आलेले सालगडी….. शेपटी घालून मालकाचे जोडे चाटत असतील तर असे आरक्षण नकोच ….

पाकीट मारून माया
जमविलेल्यानी उगीचच काँग्रेस आणि वंचित च्या वाद विवादात पडून आपली असलेली नसलेली….. घालून बसू नये…माझं घ्या माझं घ्या. ओझं झालं फेकून द्या….
विचारवंतांनी समस्त मानव जातीला उत्कर्षाचा विचार द्यावा. तत्वज्ञान सांगावे.पोटाची खळगी भरण्यासाठी एखाद्या राजकीय पक्षाची दलाली करावी, प्रचार करावा हे विचारवंतांना शोभत नाही. अण्णाभाऊ होऊन एखादा फकिरा पुन्हा उभा करता येईल का त्यासाठी चिंतन करावे. अन्याय अत्याचारावर जोतिबाचा असूड ओढता येईल का ते पाहावं. हे सारे राहिले बाजूला अन निघाले खेकड्या सारखी एकमेकांची तंगडी ओढायला….. एकमेकांना शिव्याशाप द्यायला. यामुळे तुम्हाला एखादी mlc मिळेल पण राजगृहाशी केलेल्या गद्दारीमुळे समाज तुमच्या तोंडावर थुंकल्याशिवाय राहणार नाही. समाजात तोंड काढायला जागा उरणार नाही. उजळ माथ्याने तुम्ही आता फिरू शकणार नाहीत. दिसाल तिथे लोक थुंकतील तुमच्यावर

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *