कंधार प्रतिनीधी ( संतोष कांबळे )
अतिक्रमणाच्या नावाखाली तेरा वर्षांपूर्वी तत्कालीन जिल्हाधिकारी श्री इतर परदेशी यांनी कंधार शहरातील संपूर्ण बाजारपेठ दिली होती. तेव्हापासून कंधार शहरातील व्यापारी हा पाल टाकून व्यापार करत होता. कोणत्याच राजकीय पुढाऱ्यांनी व्यापाऱ्यांना थारा दिला नसल्याने व्यापाऱ्यांनी प्रा. मनोहर धोंडे यांच्याकडे जागा मिळवून देण्यासंदर्भात मागणी केली होती. हा विषय घेऊन प्रा. मनोहर धोंडे यांनी जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांच्याशी भेटून जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. दि ८ ऑक्टोबर रोजी कंधार शहरातील या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये नगरपालिकेच्या वतीने संत नामदेव महाराज मंगल कार्यालयात ड्रा करण्यात आला यामध्ये अडीचशे व्यापाऱ्यांना लॉटरी लागली आहे. यामुळे शहरातील व्यापाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला आहे
कंधार नगरपालिकेच्या मालकीच्या रिकाम्या जागेत व्यापाऱ्यांना दहा बाय पंधरा ची मोकळी जागा तीन वर्षाच्या भाडेतत्त्वावर देण्याचा नगरपालिकेच्या वतीने घेण्यात आला होता या संदर्भात महिन्यापूर्वीच समोरील दुकानासाठी सव्वा लाख व पाठीमागील दुकानासाठी एक लाख रुपये अशी भरणा करून घेण्यात आले होते. यासाठी शहरातील 433 व्यापाऱ्यांनी पैसे भरले होते. दुकानाची संख्या कमी असल्याने या जागेचा ड्रॉ करण्यात आला. यामध्ये अडीचशे लोकांना ड्रॉप मध्ये लॉटरी लागली असून पन्नास वेटिंग यादीत निवड करण्यात आली आहे. समोरून दुकानासाठी एकूण 392 अर्ज आले होते तर पाठीमागील जागेसाठी केवळ 43 अर्ज आले होते. समोरील भागात फक्त 43 दुकान असल्याने 392 चिट्या काढुन 43 व्यापाऱ्यांची निवड करण्यात आली आहे . तर पाठीमागील जागेत 207 व्यापाऱ्यांना ड्रॉमध्ये लॉटरी लागली आहे.
संत नामदेव मंगल कार्यालयामध्ये या ड्रॉची सोडत पारदर्शक पद्धतीने सोडवण्यात आली. नगरपालिका प्रशासनाच्या योग्य ती दक्षता घेऊन हा ड्रॉ पारदर्शक करण्यात आला. या ड्रॉसाठी स्वतः जिल्हा सह आयुक्त गंगाधर ईरलोड,तहसीलदार रामेश्वर, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र ठेवरे, नायब तहसीलदार चामनेर मॅडम, बोकारे पुंडलिक, अभियंता दीपक झाडे, सतीश वरफडे, शेख आझर, राजेश जोंधळे, राकेश जोंधळे, गोविंद लुंगारे, सतीश बडवणे, यासह अनेक कर्मचारी या प्रक्रिया सहभागी होते.
मी व्यापाऱ्यांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. मी कोणताही आमदार किंवा खासदार नसलो तरी मला कायद्याचा अभ्यास असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक भागात मोठे प्रकरण मी हाताळले आहेत. कंधारच्या व्यापाऱ्यांचा विषय माझ्यासाठी खूप छोटे होता.या कामात श्रेय घेण्यासाठी अनेकांनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला मी पुरून उरलो आहे. ज्या व्यापाऱ्यांना आज ड्रॉमध्ये दुकाने भेटले नाही अशा व्यापाऱ्यांनी नाराज होण्याची गरज नाही मनोहर धोंडे यांच्या पाठीशी असून येणाऱ्या काळात त्यांनाही मी न्याय मिळवून देणार आहे. व्यापाऱ्यांना दुकाने मिळावे हीच माझी भावना होती श्रेय घेण्याची मला गरज नाही या कामाचे कोणाला श्रेय घ्यायची त्यांनी खुशाल घ्यावे. व्यापारी बांधवानो तुम्ही ज्या पद्धतीने एकजूट दाखवली त्याच पद्धतीने येणाऱ्या काळातही एकजुटीला दाखवा आपल्याला अनेक लढाया लढून कंधारचा विकास करायचा आहे. सदरील दुकाने हे तीन वर्षासाठी असले तरी तुम्हाला कायमस्वरूपी कसे करून द्यायचे ते मी बघेल
प्रा. मनोहर धोंडे, सेवा जनशक्ती पार्टी पक्षप्रमुख