अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ: सूरज चव्हाण* मराठी बिग बाॅस सिझन- 5 चा विजेता

 

 

जर आपली जीभ गोड असेल तर जगाचं आपल्यावर प्रेम होईल. जर आपले डोळे चांगले असतील तर आपलं जगावर प्रेम होईल. म्हणून मनुष्य हा जिद्दीने आपल्या ध्येयापर्यंत परिश्रम घेऊन जाऊ शकतो.आपल्या मनातील सभ्यपणा, खरेपणा केव्हाही आपणांस जिंकून देऊ शकतो.नेहमी परोपकाराच्या भावनने वागावे.चांगले बोलावे,राहावे. सूरजनी सांगितलेले लग्नाचे महत्त्व मी देवीच्या पुढे फक्त हार घालून लग्न करणार? असं त्यांनी प्रांजळपणे सांगितले. मला साधी मुलगी आवडते. ती डोक्यावर पदर घेणारी असावी. या त्याच्या बोलण्या तून भारतीय संस्कृतीची जाणीव करून दिली आहे. त्याची नाळ ग्रामीण भागाशी जोडलेली आहे. ग्रामीण भागातील मोढवे गावचा मुलगा परंतु त्याच्या अभिनयाने सर्वांचाच तो जीव की प्राण झाला.
आज त्याच्या गावांमध्ये 200 किलो फुलांचा हार त्यांच्या गळ्यात घालून त्याचे स्वागत करण्यात येत आहे.
ना तो लोकप्रतिनिधी ना तो एखादा मोठा ऑफिसर पण लोकांची मने कशी जिंकली त्यांनी हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून जीवनात कोणालाही कमी लेखू नका? त्यांना कमी समजणारे आज माना खाली घालून बसले आहेत.त्यांच्या शरीराकडे पाहू नका.अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन हे सुद्धा दिसायला कुरूप होते परंतु त्यांचे ज्ञान अगाध होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना अभिनयाने वेड लावलेलं व्यक्तिमत्व म्हणजे सूरज चव्हाण होय. साधी राहाणी, गोड वाणी,वेश असावा बावळा पण,अंगी नाना कळा अशी त्याची वर्तणूक.खरोखरच याची प्रचिती त्याच्याकडे पाहून आली.
अठरा विश्व दारिद्र्य असलेल्या सामान्य घरात सूरज चव्हाण यांचा जन्म झाला. आई- वडील तो लहान असताना मरण पावले.आत्याने सांभाळ करून वाढविले.मरीआई देवीच्या ओट्यावर भाविकांनी आणून ठेवलेले नैवेद्य, फोडलेल्या नारळाचे तुकडे खाऊन तो जीवन जगत होता. या पोटाची खळगी भरण्यासाठी अहोरात्र कष्ट करावे लागतात. मजुरीने अनेक जणांच्या शेतीत काम केले हे करत असतानाच हातात मोबाईल आला.आणि काय बघता बघता संधीचं सोनं करून टाकले.जीवनात प्रत्येक व्यक्तीला सुख मिळेलच असे नाही. परंतु बारामती जवळील मोढवे गावात हा भूमिपुत्र पाहता पाहता अभिनयाच्या जोरावर महाराष्ट्रातील लोकांच्या गळ्यातील ताईत बनला.
नुकतेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आणि सुरज चव्हाण मराठी बिग बॉस- 5 चा विजेता ठरला. आणि एका पेक्षा एक मोठे कलाकार बिग बॉस मध्ये आपले नशीब आजमवण्या साठी आले होते. परंतु सूरज चव्हाणचा प्रामाणिकपणा त्याच्यावर झालेले लहानपणाचे संस्कार, बोलण्याची लकब हे पुढे जाण्यास महत्त्वाचे ठरले. 70 दिवस बिग बॉसच्या घरात मोठमोठ्या कलाकारासोबत राहत असताना त्यांनी केलेले कार्य, घराची साफसफाई अभिमानास्पद आहे.

आई-वडिलांबद्दल त्यांनी बोललेले उद्गार काळजाला भिडतात. त्यांनी व्यसनाधीनता.तंबाखू ,गुटखा याबद्दल जो संदेश दिला तो संपूर्ण देशातील युवकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे.जी बोलीभाषा ओठात आहे तीच त्याच्या पोटात आहे. म्हणून संपूर्ण देशाला विचार करण्यास लावणारे त्यांचे गोलीगत शब्द ऐकून आपण निशब्द होतो. त्याच डायलॉग ऐकून आपण सुद्धा खळखळून हसतो. हौसाने केली बायको, ती निघाली सायको, पण काय करणार? तीच माझी गोलीगत बायको.आज प्रत्यक्ष मी सूरज चव्हाणचे जीवन चरित्र उघड्या डोळ्यांनी पाहून आश्चर्यचकित झालो. आत्याने त्याचा सांभाळ केला त्या बिग बॉसच्या घरात आल्याबरोबर पायाला स्पर्श केले. केवढा हा मनाचा मोठेपणा. आणि वडीलधाऱ्यांचा मान ठेवला हे आपल्याला आजच्या पिढीला सांगायचे आहे. तो रोखठोक बोलतो. आजूबाजूला बोलत नाही. देव देवता विषयी आदर करतो. तीस वर्षे वय असलेला हा युवक आज कोट्यावधी लोकांच्या मनात आहे.

*पाखरा आजाद केलं तुला* असं म्हटल्या नंतर डोळ्याच्या कडा ओल्या होतात. झापुक झुपूक हा मराठी शब्दाचा गोडवा आहे.माय मराठी भाषेने आपल्या अलंकारातून आपलं सौंदर्य सर्वासमोर ठेवले. गुलूगुलू ,हळू हळू मुळूमळू, तुरूतुूरू हे शब्द कसे मनाला गुदगुल्या करतात असे गोलीगत हा शब्द सूरज चव्हाणने फार पुढे आणला. चित्रपट अभिनेते अक्षय कुमारनी सूरजचा डायलॉग बोलू शकले नाहीत.ही त्यांची अभिनयाची खास बाब आहे. आपण आज प्रसार माध्यमावर पाहत आहोत. सूरजने अभियानाच्या क्षेत्रामध्ये आलेल्या संधीच प्रत्यक्ष सोनं करून टाकले. मुंबई येथे बिग बॉसच्या घरात नेण्यासाठी त्यांना त्यांच्या मित्रांनी मरीआईच्या ओट्यावरून उचलून घेऊन गेले.खुदा देता आहे तो छप्पर फाडके असे
आपण ऐकतो. आज हजारो बेरोजगार हिंडत फिरत आहेत. तरीही सूरज चव्हाण सारख्या व्यक्तीला बिग बॉसच्या घरात जागा मिळाली. तेथे अनेक जणाला त्यांनी अभिनयातून, वागणुकीतून मागे टाकून विजेता ठरला.त्याला स्वत: वापरण्यास कपडे नव्हते. लोकांनी त्याला दिले.

यावरून आपल्याला त्याची गरीबी कळते.अनेक चित्रपट निर्माते, दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटाची ऑफर दिली, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, चित्रपट अभिनेत्री जेनेलिया रितेश देशमुख यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. पॅडी अर्थात कांबळे यांनी त्यांचे पालकत्व स्वीकारले, सुरजला मिळालेली ट्रॉफी त्याने अगोदर पॅडीना आणून दिली हेच त्याच्या मनाचा मोठेपणा आहे.

हे सर्व कशामुळे झाले तर मानवी जीवन जगताना प्रामाणिकपणा महत्त्वाचा आहे. जिद्द समोर ठेवून तुम्ही जर कार्य करीत राहिलात? तर ध्येय तुम्हाला दूर नाही,
अशी तुम्ही झेप घ्या, की दिशा तुम्हाला शरण येतील. या निमित्ताने आजच्या तरुणांनी अभिनय कलेकडे वळावे. आपल्यातील उपजत गुणाचा वापर करून घ्यावा.आपली भाषा समृद्ध करावी. आकाशाला हात टेकले तरी पाय जमिनीवर असू द्यावेत.अशी अमृत वाणी त्यांच्या मुखातून निघत आहे .झापुक झुपूक, नाही तर बुक्कीत टेंगूळ. तुमची इज्जत करणारा शोधा. वापर करणारा नाही. उत्कर्ष शिंदेने सूरज चव्हाणवर एक छान गाणं गायले आहे.सूरज चव्हाणचे खूप खूप अभिनंदन आणि पुढील कार्यास विठूमाऊली प्रतिष्ठान कडून मन:पूर्वक शुभेच्छा.

 


शब्दांकन
*प्रा. बरसमवाड विठ्ठल गणपतराव*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *