नवरात्री स्पेशल.. सहावा दिवस रंग ..लाल..

माझा आवडीचा रंग.. एक एक गुण लिहीत शेवटी *मी* पर्यंत येउन पोचले.. मी हे लिहीलं , मी हे केलं , माझ्यामुळे हे झालं, मी होते म्हणुन संसार झाला, सगळीकडे हा *मी* डोकावतो आणि माझीच लाल म्हणत आपण सगळं क्रेडीट घेउन मोकळे होतो.. अगदी कालचाच एक किस्सा सांगते.. काल इस्कॉन मंदिरात जाताना आमच्या सोसायटी ग्राउंडपाशी देशपांडे काका भेटले.. वय वर्षे ८४ . आजही 90% केस काळे.. फक्त दृष्टी थोडी अधु उत्तम तब्बेत… मला म्हणाले , सोनल आज साडी नेसून कुठे निघालीस??? मी म्हटलं , काका मंदिरात निघालेय.. चला येता का तुम्ही ??.. तर ते म्हणाले , मी देवाला मानत नाही.. सरकारने भरपूर देउन ठेवलय.. भरपूर पेंशन आहे.. म्हणजेच काय तर ते सरकारी नोकरीत होते आणि सरकारमुळे मला सगळं काही मिळतय हे त्यांना सुचित करायचं होतं.. मी म्हटलं, ह्या सृष्टीची निर्मिती भगवंताने केली म्हणुन आपण सगळे आहोत.. वयाच्या ८४ व्या वर्षी सुद्धा त्यांना भगवंताला क्रेडीट द्यावे वाटत नव्हते.. कृतज्ञता व्यक्त करायची त्यांची इच्छाही दिसली नाही.. आणि हे आणि असे अनेक किस्से जागोजागी पहायला मिळतात..

श्रीकृष्णाने गीतेमधे म्हटलय , ह्या सृष्टीचा निर्माता मी आहे , हा सुर्य मी आहे.. पाणी मी आहे .. प्रत्येक गोष्ट मला अर्पण करुन खा.. प्रत्येक कर्म माझ्यासाठी करा… तुमच्या प्रत्येकाच्या हृदयात मीच आहे.. हा समुद्रही मीच आहे.. ही पृथ्वी मीच आहे.. हे प्राणी , पक्षी मीच आहे.. झाडेही मीच आहे.. गीताही मीच अर्जुनाला सांगितली.. मीच ज्ञान दिलं म्हणुन ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करु शकले मग आपल्याला इथेही हा प्रश्न पडु शकतो कि , कृष्णही सगळं मी केलं असच म्हणतो की , मग आपण म्हटलं तर काय फरक पडतो ??.. हेच आपल्याला समजून घ्यायचे आहे आणि कृष्णाचा हाच गुण आपल्यात उतरवायचा आहे.. आपण जेव्हा मी म्हणतो , तेव्हा शरीराला म्हणतो.. आपण शरीराला महत्व देतो.. माझ्या हाताने मी लिहीले.. माझ्या पायाने मी चालले पण जेव्हा माझे हात किवा माझे पाय म्हणतो तेव्हा मग मी कोण ?? हा प्रश्न आपल्याला पडायला हवा तो पडत नसल्याने इथे गर्व , अहंकार येतात आणि जेव्हा कृष्ण मी केलं म्हणतो तेव्हा तो आत्म्याने केलं असं म्हणतो.. इथे शरीराचा काहीही संबंध नाही .. इथे गर्व नाही.. अहंकार नाही .इथे जात नाही.. धर्म नाही.. इथे फक्त आणि फक्त आत्मा आणि परमात्मा दोघेच आहेत .. जेव्हा हा भाव माझ्यात येइल तेव्हा माझ्यात इगो अजिबात रहात नाही.. मी कायम म्हणते , श्रीकृष्ण माझ्याकडून लिहून घेतो यामुळे काय होतं , गर्व माझ्याकडे फिरकत नाही.. आणि अहंकाराला जवळ जागाही नाही.. आपल्या प्रत्येक गोष्टीचं क्रेडीट आपण त्याला देउन टाकलं की मी *मी* रहात नाही.. मी च्या जागी असतो तो फक्त *तो* .. किती सहज सोप्पं आहे ना.. लगेच जमणार नाही पण प्रयत्न करायला सुरुवात करा.. आपण आतून शांत होतो.. नम्र होतो.. आपल्या मनात सतत कृतज्ञतेचा भाव येतो.. आपण प्रत्येक माणूस कर्म न करता एकही क्षण जगु शकत नाही पण त्याचं श्रेय त्याला नक्कीच देउ शकतो..
भगवंताच्या मुखातून आलेला मी आणि आपल्या मुखातून आलेला मी या दोन्हीत खुप छोटा फरक आहे फक्त समजून घ्यायची गरज आहे.. हेच गीतेचं सार आहेआणि गीता हेच जीवनाचं गमक आहे..
वाचकांची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *