प्रा. डॉक्टर भगवान वाघमारे, प्रोफेसर आणि विभाग प्रमुख वनस्पतीशास्त्र संशोधन आणि पदव्युत्तर विभाग, महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा हे नियत वयोमानानुसार आज 30 सप्टेंबर 24 रोजी अवकाश प्राप्तीकडे जात आहेत. त्यानिमित्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित आहे त्यानिमित्त… त्यांच्या कार्याचा आढावा माझे अण्णा माझे हिरो
…. डॉ. उत्तमराजा वाघमारे
जगातील सर्व उत्कृष्ट अण्णा -काकू कुणाचे तर ते फक्त माझेच! लहान मुलाप्रमाणे माझीही समजूत आहेच, तेही तेवढीच सहजिकच आणि स्वाभाविकच! आज मी अण्णा विषयी दोन शब्द लिहायला बसलो आणि काही गोष्टीच्या आणि बऱ्याच काही जाणीवांचा कल्होळ मनाच्या गाभाऱ्यात निर्माण झाला.
आम्ही सगळे वाघमारे गोगदरीकर एकोप्याने आणि आनंदाने राहायला शिकलो ते फक्त अण्णाच्या आणि काकूंच्या संस्कारामुळेच वातावरण प्रतिकूल असो की अनुकूल त्याच काय? तेही दिवस जातील हा अण्णाचा सल्ला पण दुःखाने कोलमडून जायचे नाही आणि सुखाने खुरणे जायचे नाही, सुखदुःखाला सोबत करूनच यशस्वी जीवनाची वाटचाल करायची असते. अगदी त्याचप्रमाणे आमच्या कुटुंबातल्या नात्यामधला उडीसा आणि एकोप्याचा प्रत्यक्ष नुकसान खरा चांगल्या वाईट कलानुरूप स्वतःमध्ये बदल घडवत त्या वेगाने जुळवून घेत पुढे चालते राहायला हवं या विचाराने आम्ही सातत्याने स्वतःला घडवत सतत पुढे जात राहिलो. या प्रवासात संघर्ष संपलाच नाही तरी नव्या उमेदीने जीवनाकडे वळायला लागलो हा शहाणपणा आमच्यात निर्माण होण्याचे श्रेय माझे अण्णा काकू आणि आजी त्या पलीकडे बरचं काही, ते सर्व आजीमुळेच घडू शकले. आजीचे त्याग -समर्पण कुठल्याच मोजपट्टीमध्ये मोजता येत नाही.अण्णाच्या शैक्षणिक सामाजिक जीवनात अण्णाला प्रचंड संघर्ष करावा लागला. संघर्ष शिवाय पदरात काहीच पडत नाही हे म्हणजे माझी आजी सोनामाई ह्यांच्या मुळेच. आजी ही अन्नाच्या पाठीशी भक्कमपणे आयुष्यभर झाडासारखी उभी राहिली, आजीची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती आणि सामाजिक क्षेत्रातल्या काही मान्यवरांची तेवढ्याच तोला- मोलाची अण्णाच्या जीवनात नेत्यांच्या यशस्वीतेत फक्त फक्त आजीच ती कायम झाडासारखी अण्णाच्या पाठी उभी राहिली. तिची कणखर वृत्ती आणि तिच्या कष्टातून अण्णाला बळ मिळत राहिले. आजही कायम अतूट असणारी आणि एकमेकात गुंफलेली सगळी नाती आजही कायम आहेत ते अन्न आणि काकूंच्या मुळेच आणि त्यांच्यामध्ये वसलेल्या एकोप्याच्या भावनेमुळेच. अण्णा हे आमच्या कुटुंबाची काळजी घेणारे कुटुंब आहेत . ही जबाबदारी आजही धीरगंभीरपणे सार्थ ठरवतात. कुटुंब कसे एकत्र ठेवावे? कुटुंबाला कसे संचलित करत पुढे न्यावे खर तर हे अण्णांच्याकडून शिकता येते. मी लहानाचा मोठा त्यांच्याकडे झालो. चांगल्या वाईट कौटुंबिक परिस्थितीत जीव की प्राण म्हणून ते आम्हाला जपतात आणि आम्ही अण्णाला जपत आलो आहोत. आमच्या संपूर्ण पाहुण्याच्या नात्या-गोत्यातील सर्वांची शैक्षणिक जबाबदारी आणि त्यानंतर नोकरीचे नियोजनही अण्णा सहजपणे हाताळतात. आमचे नात्यागोत्यासहित संपूर्ण कुटुंब पूर्ण सुशिक्षित आहे नव्हे तर उच्चविद्याविभूषितही आहे ते फक्त न फक्त काकू अण्णा या आदर्श माता-पित्यांच्यामुळेच,
अण्णांचा जनसंपर्क प्रचंड दांडगा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात त्यांनी त्यांची हक्काची माणसं निर्माण केलेली आहेत. एक आठवण विसरून जायची म्हणून जानेपूर्वक नमूद करतो जेव्हा मी आठवी नववी वर्गात शिकत होतो तेव्हा अण्णाची विद्यापीठाच्या वेगवेगळ्या प्राधिकरणातील वेगवेगळ्या कमिटीवर नियुक्ती व्हायची आणि अण्णा सातत्याने कमिटीच्या माध्यमातून विविध महाविद्यालयात जायचे….. त्या माध्यमातून त्यांनी शैक्षणिक भरिव असे कार्य केलेले आहे त्यातून एक अभ्यासू, निस्वार्थी नियमाला बांधील असलेला व्यासंगी प्राध्यापक म्हणून आणण्याची ओळख शिक्षण क्षेत्रात झालेली आहेच. त्याचबरोबर सामाजिक कार्यात त्यांनी स्वतःला वाहूनच घेतलेले आहे हे महाराष्ट्राला माहित आहे. अण्णांनी वेगवेगळ्या समाजातील गरीब होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना अनेकदा सर्व अर्थाने मदत केलेली आहे विशेषत्वाने त्यांचा जन्म ज्या समाजात आणि ज्या घरी कुटुंबात झाला. त्या गरीब समाजाच्या विद्यार्थ्यांत त्यांनी कायमचा ऋणानुबंध निर्माण केलेला आहे. मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिकणारी विद्यार्थी असोत, की स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे शिकणारी असोत त्याही पुढे जाता सावित्रीबाई पुणे विद्यापीठ, पुणे येथे शिकणारी असो त्यांनी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठातील गरजू आणि संपर्कात आलेल्या विद्यार्थ्यांना त्या-त्या विद्यापीठाच्या अंतर्गत असणाऱ्या अडचणी सोडविल्याच त्याही शिवाय आर्थिक आणि मानसिक आधारही महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलेला आहे. त्यातून काही डॉक्टर्स, इंजिनिअर, प्राध्यापक झालेली मी जवळून बघितलेले आहे नि त्यांचा आणि माझा आजही स्नेहबंध कायम आहे. डॉ. प्राध्यापक भगवान वाघमारे अर्थात आमच्या अण्णा हे बोलकी सुधारक नसून ते कृतीतून लहुजी फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ यांच्या विचाराचा वारसा जपतात मी आवरितपणे सामाजिक कार्याच्या माध्यमातून चालवताना मी जवळून पाहिलेला एक साक्षीदार आहे. कुठल्याही कुटुंबातील नात्याला कायम एकसंघ ठेवणारं सूत्र म्हणजे अण्णा- काकू म्हणजे कायमचे हे समीकरण घट्ट घट्ट असावं कधीच न तुटणार आणि कधीच न संपणार अण्णाला भावी जीवनासाठी दीर्घायुष्य लाभो दीर्घायुष्य लाभो 🌹 🌹