वंचितांच्या अंधार वाटेवरील सूर्यपुत्राचा भीमप्रकाश* भाग 25 वा

 

इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी चिकित्सक चिकित्सा करावी. अभ्यासात, बोलण्यात, लिहिण्यात संतुलित समतोल असावा. निपक्षपातीपणा असावा तर त्या बोलण्याला, लिहिण्याला, चिकित्सा करण्याला काही अर्थ असतो. केवळ कोणाच्या तरी सांगण्यावरून, काहीतरी ऐकूण, एखाद्या विषयी आपले मत प्रदर्शित करणे हा विचारवंताचा गुण नाही

द्वेषापोटी लिहिलेले पोटार्थी लिखान हे मालकाला खुश करू शकते पण जन्मानसात तुमच्या लिखानाला केराची टोपलीच जवळ करू शकते.. अभ्यासकांच्या मांदियाळीत तुमच्या विचारांना कोणी हुंगूनही पाहत नाही. तर्क हा तर्क शुद्ध करावा, सिद्धांत असे मांडावेत की त्याचे काही सामाजिक उपयोजन व्हावे. अलीकडे शुद्ध विचाराची, शुद्ध आचारची, करणी आणि कथनी एकसमान असलेली माणसे दुर्मिळ झालेली आहेत.. अलीकडे विचारवंत ग्रंथालयात कमी आणि धाब्यावर जास्त वेळ घालवितात. संध्याकाळच्या पेगची व्यवस्था म्हणून कोणाकडून तरी कोणाची तरी सुपारी घेतात आणि कलम कसाई होऊन निष्पाप माणसांवर चिखलफेक करून त्यांचे मुडदे पडतात….व्यवस्था परिवर्तन करू पाहणाऱ्या कोणास ही इथल्या बुद्धीजीविनी सोडले नाही. मग ते तथागत बुद्ध असोत, कबीर असोत, क्रांतिबा जोतिराव फुले असोत की डॉ. बाबासाहेब आंबेडकर असोत. या सर्वांना अपमानाचे कडू घोट प्यावे लागलेत… क्रांतिबा जोतिराव फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची धास्ती घेऊन चिपळूणकरांची निबंध माला प्रसिद्ध झाली आणि काळाच्या ओघात लुप्त ही झाली. क्रांतिबा जोतिराव फुल्यांची गुलामगिरी, शेतकऱ्यांचा असूड, ब्राम्हणाचे कसाब आज ही घराघरात वाचले जाते. फुल्यांचा निर्भीडपणा, बाणेदारपणा, चिकित्सक बुद्धिमत्ता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लाभली. काँग्रेसच्या स्थापनेवेळी महात्मा फुले जिवंत होते पण ते टोळक्यात सहभागी झाले नाहीत.

पुणे करार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील वैचारिक मतभेद जग जाहीर आहेत. मला मातृभूमी नाही हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विधान बापूंना अहंकारिपणाचे वाटले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हक्क अधिकार मागणे हे काँग्रेसला हेकेखोरपणाचे वाटले . हट्टवादी वाटले. मी म्हणतो ते मान्य करा, दिलं तेवढेच घ्या नाहीतर तुम्ही देश द्रोही, हेकेखोर, अहंकारी म्हणून हिनवून स्वतः उपोषणाला बसणे हे बापूचे सात्विक राजकारण. स्वतः ला नायक समजून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हेकेखोर, खलनायक, देशद्रोही म्हणून अपमानित करणे हे काँग्रेस जुने डावपेच आहेत. जे आता उगाळून, उगाळून बोथट झालेले आहेत. त्यांचं ऐकलं नाही की तुम्ही अमुक असे, तुम्ही तमुक तसे असा पढा वाचला जातो.कोणाच्या ध्यानी मनी नसलेल्या समाजाला जगवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्तेचे भागीदार केले याचे दुःख काँग्रेस जणांना कायम सातावीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गावेच्या गावे जागविली.

हे काँग्रेजनाचे पोटशूल
शांत होत नाही तोच ऍड बाळासाहेब आंबेडकर ही तांडे वाड्या जागवून त्यांना सत्तेचे भागीदार बनवीत आहेत. नको तो भागीदार जागा होत आहे. हा bjp काँग्रेस दोघांसाठी घातक गेम बाळासाहेब खेळत आहेत. ज्यांना सतरंज्या उचलण्याच्या पलीकडे काही महत्व नव्हते ते लोक जागृत होऊन सत्तेचा वाटा मागत आहेत. Bjp काँग्रेसला सतरंज्या उचलण्यासाठी माणसं मिळत नाहीत. म्हणून ह्या जागृतीचा जागर घालणाऱ्या व्यक्तीविशेषला लक्ष करून बदनामीचे सत्र सुरु करण्यात आलेले आहे. पहिल्यांदा बौद्ध वोट बँक बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेस कडून हिसकावून घेतली आता ST. OBC वोट बँक ही हिसकावून घेतली जाते की काय या भीती पोटी. अनेक षडयंत्रकारी कारनामे सुरु झाले. पहिल्यांदा बौद्ध समूहातील काही उच्चभ्रू लोकांना हाताशी धरून बाळासाहेब आंबेडकर कसे हिंदू आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झाला. त्यांनी *मुलाची मुंज केली* अशी अफवा उडवून दिली. पण ते लोकांना पटले नाही. उलट विचारवंत तोंडघशी पडले.

दुसरा आरोप असा झाला की बाळासाहेब आंबेडकर चड्डी घालून संघाच्या बैठकीला जातात. मी म्हटलं काही पुरावा द्या पण 1990 पासून मी वाट पाहतोय पण 2024 संपत आले तरी त्यांनी पुरावा अजून दिला नाही…
*Bjp ची B टीम*
2019 साली सर्व वंचित समुहाला सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. तीन तीन, चार चार लाखाच्या सभा होऊ लागल्या. वंचित समूहाचा प्रचंड प्रतिसाद मिळू लागला. पक्ष प्रवेशासाठी रांगा लागल्या. मग काँग्रेसवाले युतीची भाषा बोलू लागले. बाळासाहेब आंबेडकर यांनी युतीसाठी तयार झाले. त्यासाठी एक अट ठेवली. ती म्हणजे सतत हारत आलेल्या 12 जागा वंचित आघाडीला सोडा….. पण काँग्रेसला ही अट काही रुचली नाही. त्यांचं म्हणणं पडलं की अकोल्याची एक जागा आणि इतर एखादी जागा आंबेडकरांनी घ्यावी आणि काँग्रेसला पाठिंबा द्यावा… पण बाळासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसची ऑफर पटली नाही. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान
दोन लाख मते वंचित आघाडी कडे आहेत. सरासरी पाच लाख मतावर एक खासदार निवडून येतो. तर मग मतदार संखेच्या प्रमाणात सीट शेअरिंग व्हायला पाहिजे होती पण काँग्रेस ला भागीदार नको होता त्यामुळे त्यांनी गोलगोल गप्पा करीत दिवस घालविले मग बाळासाहेब आंबेडकर आपल्या तयारीला लागले. उमेदवाराची घोषणा करू लागले. तेव्हा काँग्रेस ने B टीम हा नवीन शब्द प्रयोग जन्मास घातला आणि आपप्रचार सुरु केला. लोकसभेतील एकमेव चेहरा असलेले अशोकराव चव्हाण चारिमुंड्या चीत झाले. हा पराभव काँग्रेसच्या भयंकर जिव्हारी लागला. वंचित मुळे आम्ही हरलो. म्हणून राजगृहाकडे तोंड करून बोंबा मारणे सुरु झाले. ते आजपर्यंत काही थांबले नाही. काँग्रेस पक्ष हा सत्तेच्या ऑक्सिजन चालणारा पक्ष आहे. सत्ता गेली की त्यांचा जीव कसविस होतो. याच काळात शरद पावर साहेबांचे एक स्टेटमेंट आले की बौद्ध तरुणांना पक्षात घ्या. त्याप्रमाणे वंचितच्या कार्यकर्त्यांना,उमेदवारांना उचलण्याचा धडाका सुरु झाला. यात काही गायक मंडळी, काही ठळक उमेदवार होते. त्यापैकी एक असलेले नांदेड चे डॉ. यशपाल भिंगे हे होत. Mlc चे आमिष दाखवून या मंडळीला पळविण्यात आले पण नियतीने त्यांचा तो डाव फसला. बिचारे इधर ना उधर बीच मे अधर झाले. त्या कलाकारांचे तर कार्यक्रम बंद झाले. अमोल मिटकरी साहेबांची एक पुरोगामी विचाराचा वक्ता जी इमेज होती ती धुळीस मिळाली. आता त्यांचे कुठेच व्याख्यानाचे कार्यक्रम होत नाहीत. Mlc मिळाली पण त्यांच्यातला एक उमदा वक्ता शहीद झाला.

पुढे असा आरोप झाला की ते मंदिरात जातात म्हणून त्यांनी पंढरपूरच्या मंदिर उघडा आंदोलनाचा फोटो पाठविला. म्हणाले….*म्हणून आम्ही प्रकाश आंबेडकर यांना विरोध करतो*
पण त्यांच्या या आरोपत ही काही दम नाही कारण कोरोना काळात ठप्प झालेले जनजीवन पूर्ववत चालू करण्यासाठी हे आंदोलन होते. जो तो आपला जीव वाचविण्यासाठी माजघरात लपून बसलेला असताना जीवाची पर्वा न करता बाळासाहेब आंबेडकर बाहेर पडून लोकांना हिम्मत दिली हातावर पोट असलेल्या मजुरांची चूल पेटावी म्हणून त्यांनी मंदिर उघडाआंदोलन सुरु केलं. सर्व केश कर्तनालाय बंद असल्यामुळे नाभिक समाजाची होणारी उपासमार टाळण्यासाठी केश कर्तनालाय चालू करण्याची मोहीम सुरु केली आणि हळू हळू जनजीवन सुरळीत झाले. लोक प्रचंड मोठ्या षडयंत्रकारी दडपनाखालून मुक्त झाले…..लोकनायकास शोभावी अशीच कामगिरी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली…
*काही विद्वान लोक म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर bjp च्या धावपट्टीवर खेळतात*
काँग्रेस च्या कार्यालयात ट्रेनिंग घेऊन वंचित वर तुटून पाडणारे विचारवंत हा आरोप करू लागलेत. चोर ते चोर आणि शीर जोर म्हणतात ते यालाच. अगदी सुरुवातीपासून संघ, bjp वर घणाघाती हल्ले करणारे बाळासाहेब bjp च्या धाव पट्टीवर खेळतात म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच म्हणव्या लागतील. संघाची शस्त्र पूजा बाळासाहेबांनी बंद पडली. संघाला संविधानाच्या कक्षेत आणा ही मागणी बाळासाहेबांनी केली. भागवत, मोदी, शहा यांना जेल मध्ये टाकण्याचे धाडसी वक्तव्य बाळासाहेबांनी केलं. आणि ते bjp ला बिनशर्त पाठिंबा देऊन, पहाटेचा शपथ विधी घेऊन आता डायरेक्ट सत्तेत सहभागी होऊन ही शेक्युलर? आणि संघ परिवारावर सडेतोड घाव घालणारे B टीम? गजब न्याय आहे….

आंबेडकर असे आटोपत नाहीत हे लक्षात आल्यानंतर एका जवाबदार व्यक्तीच वक्तव्य आलं की *आंबेडकरांचा बालेकिल्ला आंबेडकरवाद्याच्याच हाताने उध्वस्त करू*
आणि याच उद्देशाच्या पूर्तीसाठी काही पोटभरू आंबेडकर वादी हाताशी धरून आंबेडकरांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे कट कारस्थान सुरु झाले. यासाठी रिटायर्ड गँग राजगृहाचे उपकार विसरून कुरुक्षेत्रात एकट्या अभिमन्यूला घेरावे तसे ही रिटायर्ड गँग बाळासाहेबांना घेरू लागली. यांनी थेट फतवा काढला की वंचित बहुजन आघाडीला मतदान करू नका. काँग्रेस आघाडीला मतदान करा. यात त्यांचा फार मोठा स्वार्थ दडलेला आहे. काँग्रेसी मंत्र्यांच्या खुशामती करून यांनी जी माया जमवलेली आहे ती गमावण्याची आणि जेलची हवा खाण्याची पाळी येते की काय असे दडपण या मंडळीवरहोते. अनेक मंत्री जेलची हवा खाऊन आले काही अजून आतच आहेत तर मग आपण वेळीच सावध झाले पाहिजे आणि कसे ही करून काँग्रेसचे सरकार आले पाहिजे या हेतूपोटी सगळी कारस्थाने झाली. ही फतवा गँग अधिकारावर असताना कधीच समाजात मिसाळली नाही. गाडी, माडीत दंग अडलेले हे लोक केलीच तर कधी बामसेफला मदत केली पण भारिप आणि आता वंचितला . यांनी एक रुपया दिला नाही. *याला अपवाद काही इमानदार अधिकारी आहेत* जे आज ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आहेत……

पूज्य बापूजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर जसे अहंकारी,हेकेखोर, खलनायक, देशद्रोही वाटायचे तसेच आता बापूच्या चेल्यांना बाळासाहेब अहंकारी, हेकेखोर वाटू लागले. बाळासाहेब हे बौद्ध धर्म द्रोही, आंबेडकर द्रोही कसे आहेत हे पटवून देण्यासाठी विचारवंत मंडळीला काम मिळाले. आता हे विचारवंत.. इकडून तिकडून कसे तरी पीएच.डी मिळविली आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनंतर आम्हीच…. असे माहीम भटा सारखे वेगळ्या विश्वात वावरू लागले. कोणी गावाकडच्या चार दोन गोष्टी पुस्तकात छापल्या आणि अण्णाभाऊ नंतर आम्हीच……. एकाला ही दुसरा फकिरा उभा करता आला नाही….
एक विद्वान विचारवंत तर B टीम असल्याचा गजब तर्क लावला आहे. यांचा तर्क असा आहे की संघ परिवारातले लोक श्रद्धेय हा शब्द वापरतात आणि तुम्ही ही 2019 पासून श्रद्धेय बाळासाहेब म्हणायला लागलेत म्हणून तुम्ही B टीम आहात. बापरे हा तर गजब तर्क आहे?
माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब आंबेडकर यांना सुरुवातीपासूनच श्रद्धेय म्हणतात. मी पहिल्यांदा सुरेशदादा गायकवाड यांच्या तोडून 1995 साली हा शब्द ऐकलं. हे म्हणतात 2019 पासून……
बरं एखादा शब्द संघवाले वापरतात म्हणून तो शब्द संघाचा झाला का? संघांचे लोक महाराष्ट्रात आई म्हणतात आम्ही माय म्हणतो. आता आमची पोरं आई, मम्मी म्हनू लागलेत. मायला आई म्हणतात म्हणून तुम्ही संघी आहात असे म्हणाल उद्या….

यांना फॅसिस्ट राज येईल म्हणून काँग्रेस चे राज आणायचे आहे. आम्ही म्हणतो तुम्ही दोघे ही फॅसिस्ट आहात
. एक सापनाथ तर एक नागनाथ…. तुम्हा दोघांना ही घालविण्यासाठी आम्ही वंचितांना जगवतोय.
आणीबाणी हा फॅसिस्टचा प्रकार नव्हता? रात्रीतून समाजवादी सरकार बरखास्त करणे हा फॅसिस्ट प्रकार नाही?डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्यविधीसाठी जमीन मिळू न देणे हा फॅसिस्ट वाद नाही? खैरलांजीत अपराध्याची पाठ राखण करणेआणि आम्हाला नक्सली म्हणून झोडपने हा फॅसिस्ट वाद नाही?
नागपुरात आदिवाशाचे गोवारी समाजाचे मुडदे पडणे.. हा फॅसिस्ट प्रकार नाही?
T. N. शेषण यांच्या सारख्या ईमानदार अधिकाऱ्याचे पंख कापणे हा फॅसिस्ट वाद नाही?

बाबू जगजीवनराम यांचे राजकीय आयुष्य बर्बाद करणे फॅसिस्ट वाद नाही?
असे शेकडो किस्से सांगता येतील….. बरं फॅसिस्ट वाद कोण रोखणार? कधी काळी इकडे होते ते सगळेच तिकडे शिफ्ट झाले आणि तिकडचे इकडे शिफ्ट झालेत. काँग्रेसवाला bjp मध्ये गेला की संघी होतो आणि bjp वाला इकडे आला की जादूची कांडी फिरववी तसे तो शेक्युलर होतो. काँग्रेस वाला bjp मध्ये गेला की धुतल्या तांदळा सारखा शुद्ध होतो आणि bjp वाला काँग्रेस मध्ये आला की शुद्ध लोकशाही वादी, गांधी वादी होतो संविधानवादी होतो….

नुसती बनवा बनवी चालू आहे. कोणीच संविधान वादी नाही न लोकशाही वादी………………
सारेच एकामाळेचे मनी आहेत…
या दोघांनाही न मानणारा देशभरात खूप मोठा वर्ग आहे. तो नोटा च्या माध्यमातून आपला राग व्यक्त करतो…
हार जीत होत राहील. आपल्या कडे बहुपक्ष पद्धती आहे. सर्वांना निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे.
अमुक एकाने निवडणूक लढवू नये तमुक एकाने निवडणूक लढवावी असा सल्ला देणे. आपल्याच माणसाचे पाय खेचणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण आहे…..

 

गणपत गायकवाड नांदेड
9527881901

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *