नवरात्री स्पेशल.. सातवा दिवस रंग .. निळा ( Royal blue )

 

निळा कान्हा आणि या निळ्या रंगामागे Royal हा शब्द आहे..
जो Loyal आहे तोच Royal असतो.. ज्याची भक्तांवर निष्ठा तो कृष्णच ना.. कृष्णाची अर्जुनावर निष्ठा होती म्हणुनच गीता ऐकवायला त्याने त्याची निवड केली.. युध्दात अर्जुनाचा पुत्र अभिमन्यु मारला जातो त्यावेळी बाप म्हणून तो हवालदिल होतो .. तो कृष्णाला म्हणतो , आता मी युध्द करणार नाही.. मी कोणालाही मारणार नाही..माझा मुलगा मारला गेल्यावर बाकी सगळ्याना मारुन मला काय मिळणार आहे ??.. मला पाप लागेल.. यांच्या पत्नी विधवा होतील.. वंशवृध्दी होणार नाही.. मला काहीही करायचं नाही.. त्याचं सगळं बोलणं ऐकल्यावर कृष्ण अर्जुनाला म्हणतो , तुला तुझ्या मुलाला भेटायचे आहे का ??.. मी भेटवुन देतो.. तो त्याच्या मुलापाशी म्हणजे आत्म्यापाशी घेउन जातो आणि म्हणतो , हा तुझा मुलगा .. जेव्हा अर्जुन अभिमन्युला हाक मारतो तेव्हा तो म्हणतो , कोण तुम्ही ??.. मी तुम्हाला ओळखत नाही.. तो म्हणतो ,

बेटा तु माझा पुत्र आहेस.. त्यावर तो म्हणतो , आपण अनेक जन्म पिता पुत्र होतो.. पण आता मी तुम्हाला ओळखत नाही.. मी भगवंताचा अंश आहे.. तेव्हा मात्र अर्जुन विचारात पडतो. हे माझं , ते माझं फक्त म्हणायला आहे. इथे आपणही आपले नाहीत तर इतरांचा प्रश्नच उरत नाही.. फक्त आपण आपल्या भगवंतावर निष्ठा ठेवायची आणि तो सांगेल तसं करायचं.. Royal असताना Loyal असणं किती गरजेचे असतं हे कृष्ण त्याच्या कृतीतुन दाखवुन देतो.. राजेशाही थाट कधीही संपु शकतो पण निष्ठा कधीही कमी होत नाही.. कृष्णकमळ हे त्याचच प्रतिक तर नाही..काल आपण कृष्णाच्या आवडीचं प्राजक्त पाहिलं आणि आज कृष्णकमळ..ही फुलही त्याच्या भगवंताशी लॉयल आहेत..

सुर्य त्याच्या वेळेत उगवतो आणि मावळतो.. पाऊस ठरवुन दिलेल्या वेळेत पडतो.. थंडीही तशीच आणि उन्हाळाही.. पक्षी , प्राणी ठरलेल्या कालावधीत प्रजननासाठी एकत्र येतात आणि त्यातून विरक्तही होतात.. मांजरी पहा पिल्ले मोठी झाली की त्या त्यांना सोडून देतात.. म्हणजेच काय तर प्रत्येकजण भगवंतासोबत लॉयल आहे.. त्याने घालून दिलेल्या नियमांनुसार प्रत्येकजण वागतो.. आता नवरात्रात येणारी फुलं आपल्याला वर्षभर पुन्हा कुठेही दिसत नाहीत.. आंबा उन्हाळ्यात येतो.. आवळे हिवाळ्यात येतात.. प्रत्येकजण शिस्तीत रहातो..

फक्त आपण रॉयलही नाही आणि लॉयलही नाही कारण हा कृष्णाचा गुणही आपल्याला घ्यायचा नाही.. रोज नवीन gf/ bf .. रोज नवीन नाती.. कमीटमेंट नाही.. इमोशंस नाहीत प्रेम नाही.. नियम नकोत.. बंधने नकोत..
ऱॉयल प्रत्येकाला रहावं वाटतय पण लॉयल नाही आणि इथेच खरी गडबड होते..
सोच बदलो..
#SonalSachinGodbole
#Animal communicator
#Sonalcreations my youtube channel
#SexEducation as a counseller
#Proudtobeatranswoman book
#Beyondsex novel
#fantacies_and_beauties_in_sex novel
#Anira novel
#Indradhanu book
#13000km my journey..book
#Sexsercise
#Love
#Romantic
#स्पर्श
#extra_marritial_affair
#MarathiActress
#socialworker
#premavarbolukahi चारोळ्यासंग्रह
#Abhisarika काव्यसंग्रह
#counseller
#Nutritionist

 

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *