अहमदपूर ( प्रा भगवान आमलापुरे ) येथून जवळच असलेल्या सिध्दी शुगर अॅण्ड अलाईड इंडस्ट्रीज , उजना आज रविवार दि 13 आक्टों 24 रोजी मोफत सर्व रोग निदान व औषध वाटप, रक्तशर्करा तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळी ठीक 11 00 वाजता सुरू होणाऱ्या या शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक बाळासाहेब जाधव, माजी मंत्री, महाराष्ट्र राज्य आहेत. उद्घघाटक श्री अविनाश भैय्या जाधव, व्यवस्थापकीय संचालक, सिध्दी शुगर तर अध्यक्षस्थानी श्री पी जी होनराव, उपाध्यक्ष सिध्दी शुगर असणार आहेत.
यावेळी धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अॅण्ड चॅरिटेबल हाॅस्पिटल, उदगीर येथील एम डी ( आयुर्वेद ), किंवा एम एस ( आयुर्वेद ) हे तज्ञ डॉक्टर्स या शिबिरासाठी उपलब्ध असणार आहेत. शिबिरात वात, श्वास , पोटाचे, स्त्रियाचे, त्वचा,दाताचे विकार ; जीवन शैलीजन्य आजार आणि अन्य आजारावर उपचार केला जाणार आहे.
डॉ विजय कवठाळे, डॉ संगमेश्वर दाचावार, डॉ महेश जाधव, डॉ संतोष मानकरी, डॉ आयुब पठाण, डॉ ऋषिकेश पाटील, डॉ अतुल खडके, डॉ नेहा पाटील, डॉ सुप्रिया पाटील, डॉ रमेश पेंडारकर, डॉ मंगेश मुंडे, डॉ उषा काळे, डॉ पुष्पा गवळे, डॉ रविकांत पाटील, डॉ अमोल पटणे, डॉ नामदेव बनसोडे, डॉ सचिन टाले, डॉ योगेश सुरनर आणि डॉ मल्लिकार्जुन बिरादार उपस्थित राहणार आहेत. या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.